..तू

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 April, 2010 - 00:12

बोलशी खोटे जरी तू
क्षण दिलाश्याचा तरी तू

वेदना गोंजारली मी
"मागलीपेक्षा बरी तू"

धीर हा दु:खास जात्या
सल बनून मित्रा उरी तू

यातना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू

भाग्य भाळी, रेघ हाती
ते खरे का ही खरी तू ?

चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू

जी क्षणी बदलेल जग हे
बोल गझले, ती परी तू

तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू

गुलमोहर: 

ही गझल बहुदा दोनेक वर्षांपुर्वी तुमच्या आवाजात ऐकल्याचे स्मरते....

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

व्वा!!!

वेदना, छत, मरणा छानेत. मन अरी पण वोके. (बाकी सपाट! मी 'कुणाच्याही' 'चुका' दाखवत फिरत नै, लोकांचे तरीपण पाय ओढले जाऊन दुखतात म्हणे :P, ते पण कितीतरी काळ दुखतच राहतात म्हणजे काय म्हणावं! बरं, सुधारीत आवृत्ती अपेक्षित. छोटा बहर घेतलास आता मेहनत लागेलच :))

नचिकेत, सॉल्लिड मेमरी. चिन्नू, माझ्या चुका दाखवणे थांबवले तर मग दुखणं वाढेल. आवृत्ती सुधारेन. पुन्हा एकदा गझलेच्या नादास लागेन म्हणतो. वैभव सर, कार्यशाळा केव्हा घेताय ?

कौतुक.... सरी शेर मस्त.. त्या शेर मुळेच ही ऐकल्याचे आठवत आहे.. कोजागिरी च्या कार्यक्रमाला ...

जीवना शरपंजरी तू >>> हा सुटा मिसरा पण आवडला

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू>>>व्वा..मस्त!!
छान गझल!

बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू >>>>> मला आवडला हा.

तुझं बरंच लिखाण वाचायचं राहून गेलंय हे लक्षात यायला लागलंय..>>> अगदी अगदी दक्षे! Happy