कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान

Submitted by स्वप्ना_तुषार on 10 December, 2010 - 05:20

कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान
कपडे काढून दावी डोले शोले
कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान
बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥

एक एक बाई नवी , फॅन गाई गीत
एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥

कधी अ‍ॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास
एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥

चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस
आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥

हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान
वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥

गुलमोहर: 

छान आहे विडंबन.

ह्या निमित्तानं माणिकबाईंच्या आवाजातलं मुळ गाणं पुन्हा ऐकलं. गोड शब्द , सुंदर, साधी-सोपी चाल आणि माणिकबाईंचा मधुर स्वर ! कातिल !!

धन्स परेशजी मी पण कालच रेडियोवर हे गाण ऐकलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळला.
धन्स वर्षा,शुकु.

छान विडंबन. पण संगीता बिजलानी, सोमी अली नाराज झाल्या असतील हे वाचून. त्यांना पण न्याय आणि जागा द्या की.

अरे हो भरत मी विसरूनच गेले की त्या दोघींना ...आता पुन्हा नव्याने त्यांच्या आठवणी जाग्या कराव्या लागतील

मस्तच..

हेवा वाटतो या (मु) सलमानाचा.
अवांतर : अजहरउद्दीन, अभिषेक बच्चन आणि हिमालय यांच्यात काय समान धागा आहे ?