विडंबन

पोलिस

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 October, 2010 - 01:40

प्रेरणास्थान - (http://www.maayboli.com/node/20437)

वाटतो जरी विनम्र मी वरुन,
माज पोसलाय आत भरभरुन

'लाटले' उघड कसे करायचे?
आय लपवितो करास घाबरुन

घेतली असंख्य सौख्यसाधने
साम, दाम, दंड, भेद वापरुन

कोण साव ? कोण चोर ? प्रश्न हा...
मी सलाम ठोकतोच बावरुन

फोल कल्पना......... इथेच एसिबी,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

नोकरी कशी बरे तरायची ?
लाच मागतो जनास चाचपुन

सोड रे चिरीमिरी अशी मना
'हात मार एकदाच' सावरुन

गुलमोहर: 

सांग सांग भोलानाथ...

Submitted by मन-कवडा on 1 October, 2010 - 20:02

सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय?
मैदानात तळे साचून कलमाडी बुडेल काय?
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ वेटलिफ्टींगची स्पर्धा होईल काय?
वजने उचलताना छत खाली पडेल काय?
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ भोलानाथ, खर सांग एकदा
डास चावून सगळ्यांना डेंग्यू होईल का रे यंदा
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ, कलमाडी पुंगी वाजवेल काय
CWG Village मध्ये साप डोलेल काय?.
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ, माकडांनाच पोलिस करतील काय
पंतप्रधानांना सॅल्यूट मारायला उभे करतील काय?.
सांग सांग भोलानाथ.........

सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय?..
मैदानात तळे साचून कलमाडी बुडेल काय

गुलमोहर: 

कोणता अजेंडा घेऊ हाती...(विडंबन )

Submitted by shashank pratapwar on 30 September, 2010 - 05:42

कंपनीतली वैतागवाडी पाहुन सहज टाईमपास केला....

प्रोजेक्टच्या गाडीला मिळेना वाट हो
साचले requirement चे धुके घनदाट हो
आपुलीच माणस आपुलीच मीटिंग
onsite साठी करू कशी सेटिंग
टीयलाSSSSSS कोणता अजेंडा घेऊ हाती...

आजवर ज्यांची पाहीली चालाखी भलताच त्यांचा डेव्ह होता...
पुरी झाली आता उगा re-factoring मोड्युलात माझा कोड होता..
वाचावया शिव्या म्हणुनिया किती मुके बिचारे माने डोलावती
कमीट केले किती वाटते रे भीती
टीयलाSSSSSS कोणता अजेंडा घेऊ हाती...

छळछावणीत व्यर्थ हे राबण उभ्या उभ्या संपवून जाई..
तोंड मूक मूक माझ बघुनी उमगल की क्रेडीट कलीग खाई..

गुलमोहर: 

शुमाकर जाह्ल्याचे feeling...(विडंबन)

Submitted by shashank pratapwar on 27 September, 2010 - 03:33

विनायक उजळंबे याची माफी मागुन...
ही मुळ कविता
www.maayboli.com/node/17515

आताशा गाडी पळवताना
दडपण वाटायचे बंद झाले आहे
रस्ते तसेच बांधतात सगळीकडे..
गतीरोधक तेवढेच असतात सगळीकडे..
एका हायवे वरुन दुसर्‍या हायवे वर जाताना..
रेस खेळल्यासारख वाटतय
मला कळत नाही ..
हे शुमाकर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय ?

ट्रॅफीकमध्ये चालवताना गतीची अपेक्षा करु नको..
पोलीस गेला सांगुन...RTO त ठेवले लिहुन...
त्याचा सांगायला ..यांचा रुपांतर करायला..काय जातं..
असं गाडी चालवायच म्हणलं तर पायी चालण सोपं होतं...
आयला कळत नाही हे anti शुमाकर feeling कुठून आलंय?

गुलमोहर: 

मी नाही प्रोजेक्ट केला

Submitted by वर्षा_म on 27 September, 2010 - 00:57

घड्याळात वाजले नउ
मायबोली उघडा पाहु
नविन लेखन पहाण्यात एक तास गेला Happy
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दहा
एक बीबी पेटला पहा
वाद घालण्यात एक तास गेला Biggrin
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले अकरा
जिगांना केलेय बकरा
मुक्ताफळे उधळण्यात एक तास गेला Angry
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले बारा
विंपुचा झालाय मारा
विपु विपु खेळण्यात एक तास गेला Rofl
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजला एक
प्राचीने लिहीला केक
रेसिपी वाचण्यात एक तास गेला Proud
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दोन
हा नविन आयडी कोण
डु आयडी ठरवण्यात एक तास गेला Uhoh

गुलमोहर: 

धोंडू आणि धोबंग

Submitted by निमिष_सोनार on 24 September, 2010 - 11:44

एका अज्ञात ठीकाणी खलबतं चालली असतात-

मलईखा पोरा:
छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई. नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी केले. मग हाऊस फुल्ल झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला.

अर्रर्र बास खान:
आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या.

मसल्स खान:
हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अ‍ॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला.
मग मी अनेकांना "वान्टेड" होतो.

गुलमोहर: 

वसा

Submitted by कौतुक शिरोडकर on 24 September, 2010 - 03:08

प्रेरणा - http://www.maayboli.com/node/19971

(बेफिकीरजी, 'माकडाच्या हाती कोलीत' ही म्हण माहीत असेलच तुम्हाला.)

काय सांगू तुला कसा आहे ?
सिंह वर, आत मी ससा आहे

शक्य नाही पदोन्नती आता
'बॉस' ही एक अवदसा आहे

खे़ळतो तोच जो बुकी असतो
पीचवर पाकचा ठसा आहे

काल होता प्रभावही माझा
आज नुसताच वारसा आहे

माणसे सर्व चांगली दोस्ता
फक्त वाईट लालसा आहे

आपल्यासारखेच सारे हे
ओळखा, कोण आरसा आहे ?

मी जरा घेत चाललो आहे
शुद्ध हरपेल..... भरवसा आहे

गुलमोहर: 

वाटणी

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 September, 2010 - 05:27

प्रेरणा - http://www.maayboli.com/node/19468

'जाणत्या'ची चांगली ही रीत नाही
साठलेला का गहू वाटीत नाही ?

रोज सोसे जन कळा.. चतकोर मागे
हाय ! भरले उदर ते लज्जीत नाही

'वाटण्या त्याच्या करा लोकास'.. किंतू
न्याय हक्का भीक हे घालीत नाही

'धान्य आणिक प्रश्न'.... यांना एक कळते
'सडवणे' .. बाकी दुजे माहीत नाही

तोड पाण्याचा जयांना खेळ लाभे
'ते फुकट देतील' हे, गणतीत नाही

(डॉक्टर, पटलं तर 'हो' म्हणा. नाहीतर सोडून द्या.)

गुलमोहर: 

रावण

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 September, 2010 - 03:32

(हे तापात केलेले विडंबन आहे. कुणाच्या भावना दुखावल्यास कृपया कळवावे. शुद्ध असल्यास नक्कीच डिलिट करण्यात येईल. बाकी आमची प्रेरणा तुम्ही शोधालच. नेहमीच का लिंक द्यायची ? कधी कधी गझलाही वाचा राव !!!)

गाजावाजा करून मोठा आला रावण
ऐश अभीचे धरुनी कर अवतरला रावण

संसाराची अक्कल ना त्या 'बीरा'ला घर
'जंगल जंगल चड्डी पहने' ओला रावण

पाण्यामध्ये ती वेडी खेळत बसलेली
'बहने-बहने' आळवता भिरभिरला रावण

राम बिचारा जुन्या पुराणा थापत बसला
सीता भारी हुशार म्हणते, "माझा रावण"

मणि रडताना गालावर रत्ने ओघळली
हरला, खचला, धडपडला, आपटला रावण

गुलमोहर: 

काय रे देवा.......... माझ्या भारताचे काय होणार ?

Submitted by Pranav_Kulkarni on 26 August, 2010 - 17:32

कविता वाचताना संदीप खरेच्या “काय रे देवा” या कवितेचा ठेका अणि चाल मनात ठेवा.

संदीप खरे ---माफ करा..

काय रे देवा.......... माझ्या भारताचे काय होणार ?

काही दिवसांपूर्वी मनमोहन सरकारला २ वर्ष पूर्ण झाली।
५ वर्षही अशीच पूर्ण होणार !!!!!!
मग परत निवडणुका,त्यात मग अमाप पैसा( काळा) आणि एकमेकांचे रुसवे फुगवे निघणार..
सामान्य माणूस हे सगळे बंद डोळ्यांनी बघणार
हे नेहेमीचेच आहे अस म्हणून सोडून देणार..
काय रे देवा......... माझ्या भारताचे काय होणार ?

मग कुणी एका राजकारणी वा पक्षाला सामान्य माणूस या शुल्लक गोष्टीची उगीचच चिंता,आस्था वाटणार

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन