Submitted by वर्षा_म on 20 December, 2010 - 04:54
आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21972
======================
तन अथांग फार
त्यात भुखही लहरी,
पोटभर खाउनी
पुन्हा भुकेने बावरी !
तन उत्तुंग हिमाद्री
प्रतिबिंब आळशांचे,
व्यायामानेही ना वितळे
अंग चरबीच्या थरांचे !
तन झाले वटवृक्ष
जणू फोफावल्या पारंब्या,
झाले हे विशाल
जमा पोटावर लाद्या !
तना या काय म्हणावे
खुप झाल्या उपमा,
बेढब कुरुपतेला
नाही कशाचीच तमा !
गुलमोहर:
शेअर करा
<<व्यायामानेही ना वितळे अंग
<<व्यायामानेही ना वितळे
अंग चरबीच्या थरांचे !<<
वर्षे...

कै च्या कै
कै च्या कै
व्यायामानेही ना वितळे अंग
व्यायामानेही ना वितळे
अंग चरबीच्या थरांचे !>>>
जमले आहे!
जमले आहे!
वर्षे जमले हो
वर्षे जमले हो
सुंदर.... मस्त जमलेय...
सुंदर.... मस्त जमलेय...
वर्षे...वाटच बघत होते. म्हटलं
वर्षे...वाटच बघत होते. म्हटलं अजून कसं नाही पडलं विडंबन.
मूळ कवितेपेक्षा विडंबनच जास्त आवडलं....अगदी जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलास.:डोमा:
वर्षा मस्त गं ! >>>तन उत्तुंग
वर्षा मस्त गं !
>>>तन उत्तुंग हिमाद्री
प्रतिबिंब आळशांचे,
व्यायामानेही ना वितळे
अंग चरबीच्या थरांचे !
तन झाले वटवृक्ष
जणू फोफावल्या पारंब्या,
झाले हे विशाल
जमा पोटावर लाद्या !<<<
आमच्यावर अशी जाहिर टिप्पण्णी ? निषेध ! निषेध !! निषेध !!!
धन्यवाद रुणुझुणू , अवल
धन्यवाद

रुणुझुणू , अवल