पोंग्याभूत

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 12 May, 2012 - 15:42

स्वप्न पडल एक निराळ, माझ्या भुताला त्यात मी पाहिलं.......
भूत म्हणल माझ मला, मरायच्या आधी पोंगे खायचं राहील.....
भटकायला लागली माझी आत्मा फक्त पोंग्यांसाठी बरका....
थरार निर्माण झाला माझ्या भुताचा, हे पोंगे भूत बरका...
पोंग्याभुताला सगळीच घाबरली गल्लीतली पोर्ह माझ्या
पोंग्याभुताला मज्जा आली, पोंग्याभूत बनलं राजा...
पोंग्याभूत खायचं पोंगे जे मी लहानपणी खायचो...
शाळेच्या जवळच्या वरल्या गल्लीत कुठेतरी राहायचो...
शहरात आ ल्यावर माझे खायचे सुटले होते पोंगे...
उगीच घेतली होती मी शहरीपनाची भकास सोंगे...
स्वप्नातलं भूत माझ, माझ्या लहानपणीच रमल
राहिलेल्या माझ्या हौशींना पुरं करत सुटलं...
दप्तर घेवून पोंग्याभूत शाळेत जावून बसल...
गुरुजी गेले पळून, पोंग्याभूत खुद्कून हसलं...
पोंग्याभुताने मग गोट्यांचा एक डाव मांडला...
शाळेतल्या पोरांना घेवून राजा-राणी खेळला...
पोंग्याभुताने मग माझ्या गण्याला बदडून काढला...
गण्याने लहानपणी मारल्याचा भुताने बदला घेतला...
(क्रमशः)

जर कुणाला हा प्रश्न पडला असेल कि हि कविता क्रमशः कशी? तर खास सांगतो, पोंग्याभूतावर अख्खं पुस्तकच लिहिलंय आपण. म्हटल करून टाकू एखादं वर्ल्ड रेकॉर्ड च्यामारी....!!!