काकाक

गोळाबेरीज

Submitted by इब्लिस on 22 July, 2013 - 13:39

अध्यक्ष महोदय, सन्माननिय व्यासपीठ व माझ्या बंधू भगिनिंनो.
माझ्या पहिल्या कवितेच नांव आहे, 'गोळाबेरीज'

मास्लो च्या पिरॅमिडचे
पास्त्यासारखे बारीक लांब धागे
ओकॅमच्या वस्तर्‍याने चिरून..
माझ्या मेंदूच्या चरबीत फ्राय करून
मलाच सर्व्ह करताना
तो मठ्ठ काळा बैल
अंधारातून माझ्यावर म्यांऽव करून गुरकावतोय
असं उगीचच मला वाटत रहातं..
बैलाच्या गाडीला स्वत:ला जुंपून भीमप्रयत्नांनी ओढून नेलेला तो पास्ता
स्वतःच हादडत असताना बकासूर बनून
डँबीस असा भारतिय माणुस
अधुन मधून ठोऽ करीत
माझ्यावर लहान सहान अतिरेकी हल्ले करीत रहातो,
केविलवाण्या भगव्या पट्ट्या कपाळावर बांधून,

प्रिय रक्तवारुणी

Submitted by धनश्री on 14 February, 2013 - 12:11

अमेय२८०८०७ च्या या http://www.maayboli.com/node/41029 कवितेला झब्बू म्हणून ही कविता पाठवत आहे.
काव्यलेखनाच्या प्रांतात आम्ही हौशी कलाकार आहोत. अगदी र ला र आणि ट ला ट जोडून ओळी बनवणारे!! तरी तुमच्या प्रतिसादांची वाट पाहते. Happy

असो तुमची स्कॉच,
आम्हाला तर बुवा प्रिय रक्तवारुणी
थोडी मधुर, थोडी तुरट,
भरपूर जुनी, गर्द अरुणवर्णी

घेता एक घुटका,
गुलाब फुलती मनी,
कशाला हे बाकीचे लोक
उगीच पितात पाणी??

या वारुणीचा स्पर्श होता
विसरु आम्ही विराणी
एक एक घुटक्यासरशी
दिव्य तळपते अमृतवाणी

अशीच कृपा राहु दे सखये
नाही दूर लोटणार राणी
थोडा अंमल अजून चढू दे
स्फुरतात ही आनंदगाणी

येत जा देऊन थोडी कल्पना.... (तरीही गझलचं)

Submitted by लाजो on 15 June, 2012 - 09:34

येत जा देऊन थोडी कल्पना
त्रास तुझा इथे सार्‍या जना...

आग लावणे काम हे तुझे असे
बाफ पेटती इथे विना-कारणा...

नांव दुजे घेऊनी संचारसी
त्रस्त करणे हीच तुझी कामना...

बंड झाले, उपाय थकले या क्षणी
कोण करी आता तुझा सामना...

दुर्लक्ष जरी शस्त्र असे 'लाजो' म्हणे
तरिही मुश्किल 'दु'सदस्या रोकना :फिदी:....

म्हणुन...

येत जा देऊन थोडी कल्पना
आगबंब आणण्याची करू योजना.....

शब्दखुणा: 

...मी डास आहे...

Submitted by लाजो on 28 May, 2012 - 19:57

ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर Proud

...मी डास आहे...

डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...

ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...

इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे

आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....

शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....

शब्दखुणा: 

'काकाक' दुर्लक्ष निषेध कविता !!!!

Submitted by नानुभाऊ on 28 April, 2012 - 06:06

नमस्कार!

गेल्या काहि दिवसात 'काकाक' कडे झालेल्या दुर्लक्ष वजा अन्यायाचा तीव्रं निषेध नोंदवून हि 'काकाक' पोस्ट्त आहे! Proud

व्रुत्त नसेल, पण 'व्रुत्ती' पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे Happy

चुभुद्याघ्या! धन्यवाद! Happy

===================================================================

लहान तोंडी घेई 'नानु' मोठा-मोठा घास म्हणे !
काल मनाला झाला माझ्या थोडा-थोडा त्रास म्हणे!

'माबो'लीवर काय लिहावे ? कुठे लिहावे ? कळेच ना!
'काकाक'च मग उरला आता एकच माझा ध्यास म्हणे!

जमतच नाही मजला तुमचे ' लगा लगागा लगा लगा'
'लगा लगागा लगा लगागा, असे फक्त बकवास म्हणे!

शब्दखुणा: 

तुझ्या आणि माझ्या भोजनाची ती वेळ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 October, 2010 - 01:11

आशुचँप, मित्रा ... तुझ्या " तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ" या नितांत सुंदर कवितेला माझा आचरट झब्बू Proud क्षमस्व Happy

तुझ्या आणि माझ्या जेवणाची ती वेळ
उदर होते अधीर फुकटच्या खादगीसाठी
हाताला सोडवत नव्हती वाटी बासुंदीची
अन भज्यांचीही तापली होती रंध्रे
साखरभात केशरी हिंदकळत होता जरासा.....

वर्षानुवर्षे भुकेल्या क्षुब्ध उपाश्यासारखी
जेव्हा सभ्यता, शुचिता गेली होती संपून
जबरी मम पोटाला पडत होते विळखे
पेटलेल्या जठराग्निच्या हावरट सर्पांचे

ताटातल्या वाटीतली मलई सोडून,
कविता करायला सवड होती कोणाला
अधीर झाली होती गात्रे आणि ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काकाक