फक्त

Submitted by शोभा१ on 21 May, 2012 - 06:04

फक्त शब्दाची मजा सांगते मी इथे,
जास्त नाही ’फक्त’ काही शब्द लिहिते इथे ll १ ll

सांगतो, एकमेका ’फ़क्त’ आराम कर,
नशिबी असे परी ’फक्त’ तू काम कर ll २ ll

फक्त चहा, फक्त नाश्ता, फक्त स्वयंपाक कर,
फक्त मुलांचा अभ्यास घे, अन फक्त नोकरी कर ll ३ ll

फक्त स्वच्छता कर, अन फक्त बाजारहाट कर,
फक्त बिले तू भर, अन, फक्त हिशेब कर ll ४ ll

मुलांला सांगतो आम्ही, फक्त अभ्यास कर,
फक्त स्कॉलरशीप, अन फक्त स्पर्धा कर ll ५ ll

फक्त क्लास, फक्त, गाणे, फक्त व्यायम कर,
फक्त, नाच, फक्त प्रत्येक कला आत्मसात कर ll ६ ll

फक्त शब्दाने किती केली जादू ही अशी,
फक्त शब्दाने लहान वाटती लाखोंच्या राशी ll ७ ll

म्हणून तुम्हीही सदा ठेवा लक्षात, ’फक्त’
फक्त, फक्त, असे नेहमी घोका मनात फक्त, ll ८ ll

कविता आवडली.... तुम्ही ''फक्त'' कविता न लिहिता... अजून बरंच काही लिहावं ही माझ्याकडून एक ''फक्त'' विनंती.

सर्वांना धन्यवाद!. Happy
तुम्ही>>>>>>>>>>वै.बु, हे ’तुम्ही ’ कस काय आल? Uhoh
''फक्त'' कविता न लिहिता... अजून बरंच काही लिहावं ही माझ्याकडून एक ''फक्त'' विनंती.>>>>>>>>>>सुचतचं नाही ना. हीच ’फ़क्त ’ समस्या आहे. Sad