हे असं होत कधी कधी..
होत राहणारं.
कधी आभाळ फाटणार,
तर कधी जमीन भेगाळणार, ...
या झालेल्या हानीचे मोजमाप करता येते,
एकूण नुकसान चित्रबद्ध करून सहानुभूती मिळवता येते.....
वगैरे.. वगैरे.
पण सृष्टीचे नियम सगळीकडे सारखेच असतात, अस नाही.
तुझ्या माझ्या नात्याला कुठे वेगळे मापदंड आहेत ?
चरे इथे ही आहेत, भेगा इथेही आहेत.
फक्त झालेल्या हानीचे मोजमाप शक्य होत नाही,
सगळीच खंत शब्दबद्ध करता येत नाही.
....
चालायचच..
म्हणून ती त्सुनामी परवडते.
एकदाच काय ते होत्याचं नव्हतं होते.
गाव रिकामं झालंय
इतके ओळखीचे चेहरे
तरिही एकटेपणा
संवाद करायला
तो एक शब्द हवाय....
'मित्रा'
सवयीच्या गप्पा,
तोच तो आवडीचा कट्टा...
तीच ती छेडाछेडी
त्या उगीचच्या खोडी...
हम्म, अन आता हा दुरावा,
सगळे पक्षी दूर उडून गेलेत.
माझं गाव तिथंच आहे.
कुण्णाशी बोलायला मनच नाहीये,
कुणी काही बोलायला आलं तरि
माझ्याकडे कुठला विषयच नाहीये.
इकडे आलात तर नक्की भेटा,
गाव रिकाम झालंय.......
अजून त्याची नाही चाहूल
रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततचि ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल
नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल
दर्पणी बघता तूचि तिथे रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल
समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल...
भेटू रे नक्कीच...., तू म्हणाली होतीस !
संध्याकाळ झालीय आता...., आयुष्याचीसुद्धा....
.
.
मी अजून एक ’जिंदगी’ मागवावी म्हणतोय ....
........................................................................................................
दिवस मावळतीकडे झुकायला लागलाय
थोड्या वेळात शशीकराचे आगमन होइल..
..
...
काय फरक पडतो म्हणा? तशीही तू येणार नाहीसच......
.........................................................................................................
सतारीच्या तारा जुळवल्या आणि मल्हाराला साद घातली
दुखः काय असतं, सुखा: च्या विरुध्द?
हासायचं सोडुन मि का रडतो?
हे क्रुर श्वास मि का घेत रहातो?
हे सगळं आसंच होणार होतं का?
एकमेकांना अपला सहवास इतकाच मिळ्णार होता का?
प्रश्ण असंख्य असतात, उत्तर एकाचंहि का नसतं?
थांबव ना मला,
हे विचार थांबव,
हे श्वास थांबव
ए॓क सुरी घे धार धार,
आणि कापुन दुर कर
हे दुखः माझ्यापासुन
मि हळु-ह्ळु तरंगु लागलोय
शांतपणे म्रुत्युला कवटाळु लागलोय
कसं सांगु तुला, मि आतुन कुजु लगलोय
छातितल्य ठोक्यांचा प्रश्नच उरत नाही
मनगट दुखतय, पण काळजाईतकं नाही
रक्त अता वाहतय, डोळ्यातल्या पाण्या सारखच
मि असं का केलं, का असा विचार केला मि?
कुठे गेली सगळी माणसे
नाहिच कसे कुणी मज दिसेना?
तो पान वाला पण दिसत नाहिये आज
ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन
विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे
ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे
बाजार ही रिकामेच दिसते आहे आज
कुणास ठाउक का?
न ते आवाज न ते गोंगाट
सगळे संपले कि..विकले गेले आज?
तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला
असायचा एक -बस-थांबा
तो ही दिसत नाहिये मला
प्रवासी गेले आहेत निघुन
कि संपले आहे प्रवास?
डोंबारीच दिसत आहेत फक्त आज
ओसाड रस्त्यांवर मला
तोल सांभाळतांना हसत आहेत
का त्या दोरी चीच आहे कास?
मारुन पाहिल्या हाका त्यांना
पण कुणी काही बाहेर येईना
जात नसेल का माझा आवाज
विश्वरुप दर्शन घडले
तुझ्याच ठायी समर्था
कोटी कोटी देव दिसले
तुझ्याच ठायी समर्था
स्वामी समर्था स्वामी समर्था
तुझ्याच रुपी कृष्ण दिसला
तुझ्याच ठाई विठू सावळा
तुझ्याच ठाई विष्णु वसला
तुझ्याच रुपी शंकर भोळा
हिमगिरी श्री स्वामी दिसला
गंगा तीरी श्री स्वामी दिसला
पंढरपुरी श्री स्वामी दिसला
गिरीनारी श्री स्वामी दिसला
वटवृक्षाच्या सावलीत तू
कधी दिसशी वनात
कधी बसशी जलावर तू
कधी दिसशी महालात
कधी होशी अदृष्य तू
कधी स्वयं रुपात
कधी दिव्य रुपात तू
कधी प्रखर तेजात
सहा अक्षरी मंत्र तुझा
मंत्र पवित्र करी देहा
सहा अक्षरी ध्यास तुझा
ध्यास जीवा लागला हा
मंत्रमुग्ध जीवनाला
मि तुझा विचार करतो
आणि तु मला जोडलि जातेस
तडफडणारं शरीर आणि
कातडि खाली वेदना देतेस
ताणलं नाही गं मि
लांब पर्यंत पसरत गेलो
माझं मन तुला सांगण्या साठी
भांडलो नाही गं मि
मान-अपमान विसरत गेलो
तुला परत मिळवण्या साठी
पण जे तुझ्यापशि सुरु झालं नाही
ते तुझ्यापशि संपलं ही नही
शेवटी राहीलं ते एकटे पण
आंधार्या विहिरी सारखं
घाबरवणारं, चिडवणारं
खोल नेउन बुडवणारं
डोळे उघडुन पाहिलं
तु दुरावताना दीसलिस
ते हि पाठमोरी फिरलेली
आणि हे पाठमोरेपण रहिलं मझ्याकडे
कायमचं...
च्या मारी...
खुळखुळा झालाय मेंदूचा नुसता !
मांसाचा एवढासा गोळा,
काय काय बसवायचं त्यात?
काय-काय जाणुन घ्यायचं?
कशा-कशाचे अर्थ लावायचे......?
नैतिक-अनैतिकतेच्या बाष्कळ गप्पा...
तथाकथित इतिहासाचे
सांप्रत अर्थहिन ठरणारे संदर्भ...
सद्सद्विवेकबुद्धीचे नसते घोळ...
त्यापेक्षा परवाची त्सुनामी बरी
तिने फक्त (?) माणसे मारली !
साला, आमच्या नशिबी
रोजच इथे कसकसले विस्फ़ोट...
आणि
मुळापासून हलवून टाकणारे भावनिक भुकंप..
प्रत्येक क्षण घेवून येतो एक नवा धक्का,
जे नशिबवान असतात ते संपतात त्यातच !
बाकीच्यांच्या नशिबात मात्र ...
आयुष्यभर दयामरणाच्या लढाया लढणं,
आयुष्याची दोरी
हे सजीवसंख्येचे नियमन करणार्या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे “जीवन” तुझे असले तरी
“मी” तर “माझा” आहे ना?
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून...
माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी आहे
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण...
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे