कविता

टुकू टुकू पाय

Submitted by Rohan_Gawande on 15 March, 2011 - 04:33

ही कविता माझ्या आत्याची आहे. साधारण सत्तरीतली माझी आत्या छान लिहिते, ती घरी गुणगुणत असतांना मी रेकॉर्ड केली.. अमरावतीतील खेड्यातल्या बोलीभाषेत आहे...
जाशी रेकॉर्ड केली तशी टाकतोय, सांभाळून घ्या..

टुकू टुकू पाय..

कलयुगाची कशी गती आली,
बुढा बुढी म्हने आपली पंचाईत झाली,
बुढा म्हने बुढीले मुकाट्यान ऱ्हाय,
अव टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय,नाई तं तुया जीवाची होईन वाय वाय.

बुढी म्हने पोरासाठी नवस केले किती,
काय सांगू बाई माया जीवाची गती,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..

बुढी उठली पायटी हाती घेते फडा,
बुढा म्हने ची बिन इच्या जिवाले मोठा वळा,
पायटीच टाकते शेणाचा सडा,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ग्राऊंड झिरो

Submitted by नादखुळा on 15 March, 2011 - 02:09

किती सोसायचं?
किती लढयाचं?
घटनात्मक बदलांनाही आव्हानं देऊन,
पुन्हा पुन्हा तेच करायचं?
आणि म्हणे 'लोकशाही' सारखं शस्त्र नाही,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साधं पारदर्शीसुद्धा वस्त्र नाही.. !

तोच टाहो तीच चीड तोच संताप,
जन्मास कारणी असूनही जीव घेणाराही तोच बाप,
माणुसकीच्या नात्याला वरवर गोंजारलं कि,
मग लाळ गाळीत चळणार्‍यांच्या या जातीला,
साधा इमानही नाही अन वाकल्यावर सुबक दिसावी अशी कमानही.. !

माझं आहे तेच तुझं आहे असं म्हणणारे,
आज चढाओढीचा २४/७ खेळ खेळतात,
तुझ्यावाचून माझे अडणे ठरलेले तरीही,
इतभर अंतराला उगा ढांगेतून लांघतात..

गुलमोहर: 

क्षणभर जिंदगी

Submitted by सत्यजित on 15 March, 2011 - 01:33

रंगेबिरंगी वरुन, गुलमोहर मध्ये टाकतो आहे...

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

आता कविता माझ्या नजरेतुन.....

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

गुलमोहर: 

किती दिवस

Submitted by वैभव देशमुख on 15 March, 2011 - 01:30

किती दिवस धरून ठेवशील केसांमधे काळा रंग
किती दिवस लखाकेल तुझं गोरं गोरं अंग

किती दिवस डोळ्याखालची काळी वर्तुळं टळतील
किती दिवस गाली तुझ्या लाल फुलं फुलतील

किती दिवस राहील तुझ्या देहामधे दरवळ
किती दिवस खेचशील वासनांची वर्दळ

किती दिवस काळजाचा आवाज तुला येणार नाही
किती दिवस जीव तुझा आरशाला भिणार नाही

...वय तुझ्या अंगावर दाट जाळं विणेलच
मी खोटं बोलत नव्हतो हे तुला कळेलच....

- वैभव देशमुख

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्सुनामी

Submitted by harish_dangat on 15 March, 2011 - 00:20

जिथे कधी घरे होती
थडग्यांचा ढीग आहे
जिथे माणसे होती
मुडद्यांची रीघ आहे

धरती खायला उठली
पाण्यानेच बुडवीले
तक्रार कुठे करावी
आभाळाने तुडवीले

पापी वा पुण्यवान
कोणीही सुटले नाही
काल जे झोपी गेले
आज उठले नाही

नियतीची सुड घेण्याची
ही युक्ती नामी आहे
मानवाच्या संहाराची
ही एक त्सुनामी आहे

-हरीश दांगट

गुलमोहर: 

त्सुनामी

Submitted by वर्षा.नायर on 14 March, 2011 - 14:13

पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस त्सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो

गुलमोहर: 

यावे तरी तु का समोर

Submitted by निनाव on 14 March, 2011 - 13:24

यावे तरी तु का समोर
जवळ मज नसतांना
तहानले मन माझे
नयन हे भिजतांना

अजुनच कमी होते अंतर
तु दूर होतांना
आठवेस तु अधिकच
मी तुज विसरतांना

शब्द अबोल करणारे
वियोगात मी लिहितांना
कंठी दाटून येतात
ह्रदयातुनी उतरतांना

का असावी अशी ही वेदना
न दिसे कुणास दुखतांना
श्वासही करते परके मला
तु जवळ नसतांना!

गुलमोहर: 

आठवणी ... !!

Submitted by प्रकाश१११ on 14 March, 2011 - 11:39

आठवणी असतात मनात दडलेल्या
येतात अचानक
नकळत मनाच्या काठावर
अलगद पावलांनी
नि येतात समोर
अनाहुतपणे.....

आठवणी कधीकधी भासाच्या
कधीकधी त्रासाच्या
मनात रुजलेल्या
पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या
घट्ट खोल मुळांच्या

काही आठवणी नाजूक
प्रेमाच्या
अलगद मोरपिसी आठवणीच्या
अल्लड पाउस नि
तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या
गरमागरम चहाच्या

आठवणी नाही होत कधी शिळ्या
नाही उडत त्याचा रंग
त्या असतात रंगीत
आंबट चिंबट
मस्त चवीच्या …!

आपले जुने मातिचे घर
आठवणीतून अलगद येते वर
ती श्रावणातील सकाळ
परीक्षेचा पेपर
तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर

गुलमोहर: 

जवान - तुम्हा साठी

Submitted by निनाव on 14 March, 2011 - 11:35

माझ्या सेनेतील प्रिय जवान,
आज येते आहे तुमची मज आठवण,
आठ्वत आहे तुमचे एक एक बलिदान..
आम्हास फार करता येत नाही तुम्हा साठी
तेंव्हा करतो आहे हा एक छोटा सा प्रयत्न

जेंव्हा लागते आग तेंव्हाच होतो चटक्यांचा भास
आठवतात तेंव्हाच सर्व देव, अन लागते पुण्याई ची कास

तुम्ही रुप संकटमोचनाचे, सर्वत्र-सर्वदा तुमचा वास
झोपेतही अमुचा तुम्हा वर विश्वास इतुका अमाप

न चुकता बघतो आम्ही राजपथ ची शान
फडकतो ध्वज, फुगते छाती, कर्म तुमचे उंचावते मान

गुलमोहर: 

गुंडुली आहेत का इथे?

Submitted by जर्दाळू on 14 March, 2011 - 10:40

चुकून दिसलीस पण दिसून चुकलीस

"इयँओव"

भेदरलेले तपकीरी डोळे
लुसलुशीत कान
ओंजळीत मावशील एवढी होतीस
अन शेपटी सोनेरी

घाणेरड्या बशीतून दूध काय
शिळी पोळी काय

गलेलठ्ठ

"अहो प्स प्स करू नका,
तिच नाव ठेवू"

मनी, मावशी सगळे पर्याय एकमताने बाजूला

हं! एकच मत चालायचं त्यावेळी
हिचच मत फक्त

आताही एकच मत चालत
माझच फक्त
ही नाही राहिली आता

तर नाव
म्हणे आदराने बोलवायला हव
आपली पोरे परगावी
ही बिचारी बघेल आपल्याकडे
म्हणून आदर
मांजरीला पगार नसतो ना
टायमिंगपण नसत

गुंडुली

अहो गुंडुली म्हणायच म्हणे

बर बुवा

ही अ‍ॅटॅकने गेलेली पाहिल अन स्वतः गेली गाडीखाली

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता