शेवटचा श्वासही माझा...
ध्यानी मनी माझ्या....
ध्यास तुझाच असावा.....
शेवटचा श्वासही माझा...
हसवून तुला जावा...
ध्यानी मनी माझ्या....
ध्यास तुझाच असावा.....
शेवटचा श्वासही माझा...
हसवून तुला जावा...
रंगो की दुनिया, तरंगो की दुनिया..
किसी शायर के भिगे लब्जों की दुनिया..
किसी के कांपते नर्म होंठो की तो..
किसी के गर्म बाहो की दुनिया..
किसी के लिये चार दीवारें ही सही..
किसी के ऊंचे मकानो की दुनिया..
कोई जिये पल पल मरके यहां..
किसी के चंद लम्हो की दुनिया..
किसी के लिये बहारें ही सही..
किसी के उजडे इरादों की दुनिया..
कही नटखट इतराती बच्चीसी ये..
कही आग उगलते तुफानों सी दुनिया..
कोई कहे लोग रहते यहां..
कोई कहे दिल जुडते यहां..
कोई कहे इंन्सान बसते यहां..
कही पे नामर्द लोगों की ये दुनिया..
कही बारीश के मौसम मे पडे सुखे सी ये..
किसी के भीगी आंखो से टपकते आंसु ओंकी ये दुनिया..
अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
मी बघताच वीज भिरभिरते अंगभर
जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात
लाजाळुच बसते जशी अंग दुमडून
चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून
उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन
उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून
असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग
पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन
जणु यावी कशी चाल गाण्याची चालुन
आरस्यातली छवी यावी बाहेर निघुन
गझल उतरावी माझी नश्यात भिजुन
आलीस पौर्णिमे ची रात्र मज दिसून
आज असे वाहिले वारे, नाहीच बघीतले तिनं वळुन
हात सुटले नकळत अमुचे, मन माझे हाय गेले जळुन
न दिसली ती तिथे ही, मी गेलो कठिण वाटा पार करुन
सुख माझे एवढेच मनी, होतो मी गेलो सर्व तिला हरून
भरकटलोच तिचा शोध घेत मी, असा आलो लांब निघुन
टाकता पाउल पुढे, पाउलखुणा गेल्या मागच्या मिटून
एकत्रच होतो आम्ही निघालो , हातात हात धरून
सुटले हात तुझे जेथे प्रवास माझे तिथे गेले संपुन
चांदण्या राती पाहाता वाटे असे
उशीत मी चंद्रच व्हावे तुझे
कुशीत तुझ्या बनावे तरंग
हसणार्या लाटाच नदीत जैसे
तुझ्या नजरांत बोलतात ती पाने
माझ्या प्रेमाच्या गातात ती गीते
तुझ्या श्वासांत आहे अशी जादू
मोहतात चाफ्याची कोमल फुले
येताच तु जीवन होते संमोहीत
घेतो मन माझे वसंता चा झोके
पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी
दिसतात मज नुसते तुझेच चेहरे
मिठित माझ्या यावीस तु असे
मध पाण्यात विसावे जैसे
बहरावे जीवन माझे तुज परि
तारुण्यास लागावे मोहोर जैसे
सारख्याशी सारखा तो कोण होता?
थेट माझ्या सारखा तो कोण होता?
पाच वर्षे व्हायची नाहीत कामे
पाय धरतो सारखा तो कोण होता
चेहरा माझा जरा पाहून घे तू
आड येतो सारखा तो कोण होता?
जीवना रे सांग ना मेल्यावरी ही
जन्म घेतो सारखा तो कोण होता?
वाट वळणाची तसे आयुष्य माझे
पायवाटे सारखा तो कोण होता?
मयुरेश साने ...दि..११-मार्च-११
एकांत....
रात्री तळ्यातल्या पाण्याचा
मला वाटतो हेवा
किती छान एकांत!!
असा आपल्याला हवा.
अर्थ तुझ्या श्वासांचा
जरा कुठे उमगतो
सेकंड शिफ्टचा मन्या
धड़ धड़ जिना चढ़तो
चौपाटीचा दगड
बरा अस वाटल
पोलीसाचा दंडूका
पाहून काळीजच फाटल
चिम्ब चिम्ब पावसात
जाव जरा भिजायला
दापोलीची आत्या
येते चार दिवस रहायला
चंद्र रोज हसतो
मनात येउन बसतो
पण आयुष्याच्या झिम्म्याचा
ताल जरा चुकतो
उमेश वैद्य २०११
आई माता ममतेची गुलाब कळी,
कधीच होत नाही तिची माया शिळी,
घेते ती काळजी जेव्हा पडतो आजारी,
करत नाही ती बड्बड शेजारीपाजारी,
वेळेस रागावते आंजारते-गोंजारते,
तिची प्रत्येक गोष्ट हवीहवीशी वाट्ते,
सुंदर नि साधे आहे तीचे रुप्,
तीच्या हातातली जादु छानच खुप,
तिला मिळायला हवा मोठा पुरस्कार,
कारण ती आहे सुंदर जीवन शिल्पकार.
सगळेच संपून गेलेले असते
ती धडपड ...
जागरणे ....
धावपळ ...
धडधडणे ....!!
नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा
आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू
न कळत ....न जुमानणारे ...!
सगळे बधीर ..!!
ते क्षण ….
ते वातावरण ....
सगळे सुन्न... अबोल ...
अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...!
एका नंतर दुसर्याचे
घनघोर टाहो....
जशी एकाला जांभइ आली की दुसर्यालापण
नियंत्रणाच्या बाहेरचे हे सर्द क्षण ..
सगळे एकत्र
शांत अबोल ध्यान लावून
निर्वात पोकळीतले
मिट्ट अबोल क्षण ...!!
खिडकीवरची चिमणी उगाचच चिवचिवत
दुखाची जाणीव ओढून घेत असते
दहा फुटावरून उडणारा कावळा
उगवतानाचा सुवर्णरंग, मावळतानाचा फिकट लालिमा तुझ्याचसाठी आहे,
नाही फक्त खिन्न अंधार.
उमललेली फुले, पाकळ्यांचा सुगंध तुलाच अर्पिलेला आहे,
नाही फक्त शुष्क निर्माल्य.
झाडांची गार सावली, सुखवणारे जलौघ तुझ्याचसाठी तिष्ठत आहेत,
नाही फक्त रणरणणारे ऊन्ह.
ऋध्दी-सिध्दी, शांती-प्रसन्नता तुझ्याच दासी आहेत,
नाही फक्त भयाण निराशा.
विफलता वैताग, बददुवा शिव्याशाप दुस-या कुणासाठी असतील,
माझ्या सदिच्छा मात्र फक्त तुझ्याचसाठी आहेत!