त्रिवेणी ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 March, 2011 - 02:55

भेटू रे नक्कीच...., तू म्हणाली होतीस !
संध्याकाळ झालीय आता...., आयुष्याचीसुद्धा....
.
.
मी अजून एक ’जिंदगी’ मागवावी म्हणतोय ....
........................................................................................................

दिवस मावळतीकडे झुकायला लागलाय
थोड्या वेळात शशीकराचे आगमन होइल..
..
...
काय फरक पडतो म्हणा? तशीही तू येणार नाहीसच......
.........................................................................................................

सतारीच्या तारा जुळवल्या आणि मल्हाराला साद घातली
त्या सुरात मीच बेभान झालो, पण श्रोते नि:शब्द ....
..
...
डोळे उघडून पाहीलं...., त्यांच्या डोळ्यात मल्हाराने हजेरी लावलेली
.........................................................................................................

थोडा मुड चेंज.... Wink

सुर्याचे सोनेरी पुत्र पृथ्वीवर उतरायच्या आधीच...
मी दचकून जागा व्हायचा....
.
.
चाळीतल्या नळावर आया-माया जमलेल्या असायच्या ना!
..........................................................................................................

बायकोची आठवण आली की सगळे म्हणतात..
काही म्हणा पण शेजारच्याचीच बर्री.....
..
...
माझ्यासाठी तू, मामलेदारच्या मिसळीवरची तर्री...!! Wink
...........................................................................................................

विशाल

गुलमोहर: 

धन्स Happy

सतारीच्या तारा जुळवल्या आणि मल्हाराला साद घातली
त्या सुरात मीच बेभान झालो, पण श्रोते नि:शब्द ....
..
...
डोळे उघडून पाहीलं...., त्यांच्या डोळ्यात मल्हाराने हजेरी लावलेली >> ही सर्वात अप्रतिम त्रिवेणी.. Happy
बाकी ठिक ठिक आहेत. Happy