त्सुनामी

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 March, 2011 - 03:33

हे असं होत कधी कधी..
होत राहणारं.
कधी आभाळ फाटणार,
तर कधी जमीन भेगाळणार, ...
या झालेल्या हानीचे मोजमाप करता येते,
एकूण नुकसान चित्रबद्ध करून सहानुभूती मिळवता येते.....
वगैरे.. वगैरे.
पण सृष्टीचे नियम सगळीकडे सारखेच असतात, अस नाही.
तुझ्या माझ्या नात्याला कुठे वेगळे मापदंड आहेत ?
चरे इथे ही आहेत, भेगा इथेही आहेत.
फक्त झालेल्या हानीचे मोजमाप शक्य होत नाही,
सगळीच खंत शब्दबद्ध करता येत नाही.
....
चालायचच..
म्हणून ती त्सुनामी परवडते.
एकदाच काय ते होत्याचं नव्हतं होते.
पण तुझ्या माझ्यातली त्सुनामी..
जीव घेते
पण जिवंत ठेवून,
प्रत्येक वेळी.

गुलमोहर: 

पण तुझ्या माझ्यातली त्सुनामी..
जीव घेते
पण जिवंत ठेवून,
प्रत्येक वेळी. >> Sad

का रे इतका निराश? Sad

कविता आवडली असं तरी कसं म्हणू?
वास्तव आहे हे प्रत्येक नात्याचं....
खर्‍या त्सुनामीतूनही लोक तरून निघतात, आणि अशा अवघड नात्यातूनही वाट काढतात.. शेवटी सगळीच तडजोड... Sad

पुलेशु!!

व्वा ! कौतुक जबरी लिहिलीस कविता.

दक्षिणा, अगदी बरोबर आहे. पण ती 'त्सुनामी' ठरवणारे हि आपण अन कौतुकच्या कवितेतली त्सुनामी ठरवणारे हि आपणंच गं.

पण तुझ्या माझ्यातली त्सुनामी..
जीव घेते
पण जिवंत ठेवून,
प्रत्येक वेळी.............. व्वा... मनातली खदखद बाहेर पडलीय.

Happy

विशालभौ, रिव्हिजन सुप्पर आहे पण वर्जन चेंज झाल्याची खंत. Proud तुझ्याकडून एक अपेक्षा.
विषय सुचवतो बघ. "अखेरचा प्रश्न" या विषयावर एक मुक्तछंद लिही. वेळ तुला हवा तेवढा अन मांडणी तुला हवी तशी. फक्त शेवट तेवढा कसा करायचा ते ठरव तु.

कौतूक...

कविता हा माझा प्रांत नाही, त्यामूळे या प्रकारापसुन कायम लांब रहात आलोय...
तुझं लेखन म्हणून मुद्दाम वाचायला ईथे आलो...

कसं आणी काय लिहिलंस ते या जन्मात मला कळणार नाही, पण जे काही लिहिलंस ते मात्र खरंच आवडलं...

पण तुझ्या माझ्यातली त्सुनामी..
जीव घेते
पण जिवंत ठेवून,
प्रत्येक वेळी...........

लई बेस.

<<<तुझ्या माझ्या नात्याला कुठे वेगळे मापदंड आहेत ?
चरे इथे ही आहेत, भेगा इथेही आहेत.
फक्त झालेल्या हानीचे मोजमाप शक्य होत नाही,<<<

खुप सुंदर ओळी, कौतुकजी! आवडली कविता!

चरे इथे ही आहेत, भेगा इथेही आहेत.
फक्त झालेल्या हानीचे मोजमाप शक्य होत नाही,
सगळीच खंत शब्दबद्ध करता येत नाही.

कितीही कौतुक कमीच आहे...

पण तुझ्या माझ्यातली त्सुनामी..
जीव घेते
पण जिवंत ठेवून,
प्रत्येक वेळी >>>>> व्वा ! झक्कास..