अजून त्याची नाही चाहूल..

Submitted by पुरंदरे शशांक on 16 March, 2011 - 03:13

अजून त्याची नाही चाहूल

रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततचि ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल

नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल

दर्पणी बघता तूचि तिथे रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल

समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल...

गुलमोहर: 

छाया, अंजली, उमेश, चातक.......
सर्वांना मनापासून धन्यवाद......

"समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल......"

.... छान

भिडेकाका, स्नेहांकुर......मनापासून धन्यवाद.

नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल>>>>
मस्तच,
खुप आवडली.