गेला जन्म
पाप पुण्याचा ठोकताळा....
सहसा टाळेबंद होतो....
उरल्या सुरल्या फरकाला आपण...
गेला जन्म कारण मानतो!
पाप पुण्याचा ठोकताळा....
सहसा टाळेबंद होतो....
उरल्या सुरल्या फरकाला आपण...
गेला जन्म कारण मानतो!
तू साथ दिली नाहीस माझी....
असं मी म्हणू शकत नाही....
बहुरूपांनी भेटलास मला...
मीच तुला ओळखलं नाही....
मूव्ह ऑन! ...
तसं सोप्पं आहे म्हणायला आणि वागायलाही!
काळ्या गर्द ठसठसणार्या रात्रींना हे रोज समजावण्याचा प्रयत्न करतोय मी!
त्यांची समजूत काही अजून पटलेली नाहीये!!
आठवणींच्या झुंडी आठवड्याच्या बाजारासारख्या
आजही त्यांच्या प्रहरांवर टोले देत असतात..
ते हल्ले सोसून दिवसा मूव्ह ऑन व्हायची सवय
आत्ता कुठे लागते आहे!
नवे वसंत, गालिचे, काटे, झरे, निखारे, पाऊस, सावल्या...
दिवस संपतो आणि पुन्हा बाजार भरतो रात्री - जुन्या फुलांचा..
सुकलेल्या फुलाला, मुकलेल्या वसंताला,
हुकलेल्या प्रेमाला आणि चुकलेल्या रात्रीला
सोडून पुढे जाण्याची हिंमत नसली की मग
सुविचारांना मिळंतं नेहमी....
थोडंसंच अंगण....
कारण दिशाहीन विचारांना...
नसतंच कुंपण....
वैभव वैराग्याचे
नको जाहली प्रेमकहाणी
गुळगुळीत झिजलेली नाणी
आज नका ऐकवू कुणीही
आर्तआर्तशी तीच विराणी
नकोत त्या पुष्पांच्या गोष्टी
झरे - निर्झरा नकोच दोस्ती
गर्द तुरे पानांचे ते ही
ऐकुनिया का होई कष्टी
निखळ कोरडे तरिही हसती
पत्थर छाती काढुनि पुढती
रोमातुनही निथळत होती
बेदरकार जिण्याची मस्ती
पर्जन्याच्या धारा झेलित
तप्त तेज सूर्याचे पेलित
उभे ठाकलो वर्षे अगणित
उन्नत माथा कदा न अवनत
कठीण वाटू जरि वरिवरिसे
अंतरात वात्सल्यचि वसते
मातीला आधारचि होऊ
करे बळकटे जखडुनि ठेऊ
जगणे असले उपेक्षिताचे
कोरडेच अन कठिणत्वाचे
उधारीचे जीणे
(ही कविता ज्या लोकांना असाध्य रोग आहे, त्यांना समोर ठेउन लिहीली आहे)
उधारीचे जीणे जगताना
हिशेब क्षणाक्षणाचा होतो
जगण्याचा भार सोसताना
हिशेब कणाकणाचा होतो
गेलेला क्षण होतो मोठा
आलेला क्षण होतो छोटा
कितीही हिशेब मांडला
खाली उरतो फक्त तोटा
फाटल्या आभाळात
अंधार खोल आहे
क्षण अखेरचे सांगती
जगणे अमोल आहे
आत दोन मने आहेत
हे त्यावेळीच कळते
एक हळू फुंकर घालते
दुसरे जोमाने जळते
रोज उठताना सकाळी
कोवळी पालवी फुटते
झोपताना रात्री मात्र
खोडास वाळवी लुटते
रोजच प्राण गलीतगात्र
रोजच ही अखेरचीच रात्र
दिवस मात्र रोज उजाडे
हाती जगण्याचे भिक्षापात्र
तेच ठिकाण, तीच टेकडी... तो कधीचा तिथे पोहचला आहे, आणि तिला, उशीर झाला आहे. ती निघाली आहे... सारखा फोन, तिचं नक्की येण्याच वचन, तिची धावपळ...आणि दाटून आलेला पाउस.
रंग उधळती संध्याकाळ, सोसाट्याचा वारा, पावसाची चाहुल, मिलनाची ओढ आणि चलबिचल मन... अजुन काय लागतं कविता सुचायला? ही ओळचं एक कविता आहे.
पण आता पाउस आला तर ती कशी येणार? ती येईल नक्की येईल, पण भिजेल ना ती.. इतकी कोमल, इतकी सुंदर... आणि तिला इतका त्रास? आणि इतका त्रास, कुणासाठी? फक्त माझ्यासाठी ...
प्रेम,प्रेम,प्रेम,मनी होता,
एकच ध्यास,
मित्र म्हणले,कशाला लावतो,
उगाच गळ्फास.
मी म्हणालो,भेट्ली आहे,
कोणी खास,
दिसायला आहे ती,
एकदम झकास,
अप्सरा जणू अवतरल्याचा,
होतो भास,
तिला प्रपोज करण्याचे,
ठरवले जवळपास,
पण तो तर निघाला,
दुसर्याचाच घास,
प्रत्येक वेळी असेच होते,
माझ्यासोबत हमखास,
प्रेम करण्याची राहिली,
अपूरी आस,
नाही उरला आता ,
प्रेमावर विश्वास,
म्हणुनच मी घेतलाय,
सतीच्या चालीचा बोल बाला
विधवा विवाह मात्र बंद केला
तोंड्याळ मानस असतात जितकी
त्यांनाच समाज म्हणतात मुकी
पर जातीत विवाह केला
तर समाज बोट उचलतो
विधवा सती जाणार नसल्यास
तिला बळच जाळात ढकलतो
घरातले विचार चौपाटीवर
पोहोचतात तरी कसे
चूक आपली नसते
घरातलाच बाहेर भूकताना दिसेल
आवड गंज खेळाची मुलीला
समाजाची बंधनेही पाळावे लागतात तिला
मग ऑलम्पिकचे पदक जिंकल्यावर
बक्षिसे का इतकी देता तिला?
कवी- सुशिल गणोरे
काल एका हळव्या गोष्टीसाठी
मी स्वतःच माझं
इतकं भरभरून सांत्वन करत राहीलो
आणि अचानक बोध झाला
की आपण आता मोठे झालो....
आमरण एकटेपणाची ओळख
अशीच होते?