Submitted by पल्ली on 16 March, 2011 - 03:19
गाव रिकामं झालंय
इतके ओळखीचे चेहरे
तरिही एकटेपणा
संवाद करायला
तो एक शब्द हवाय....
'मित्रा'
सवयीच्या गप्पा,
तोच तो आवडीचा कट्टा...
तीच ती छेडाछेडी
त्या उगीचच्या खोडी...
हम्म, अन आता हा दुरावा,
सगळे पक्षी दूर उडून गेलेत.
माझं गाव तिथंच आहे.
कुण्णाशी बोलायला मनच नाहीये,
कुणी काही बोलायला आलं तरि
माझ्याकडे कुठला विषयच नाहीये.
इकडे आलात तर नक्की भेटा,
गाव रिकाम झालंय.......
गुलमोहर:
शेअर करा
आवडली.! कुण्णाशी बोलायला मनच
आवडली.!
कुण्णाशी बोलायला मनच नाहीये,
ही ओळ जरा खटकतेय..
ती
कुणाशी बोलावसंच वाटत नाहीये.
अशी केली तर.. अर्थात आपली इच्छा.
मनापासुन आवडली कविता!
मनापासुन आवडली कविता!
खुप छान.....
खुप छान.....
माते, आता आपण पुन्हा एकदा
माते, आता आपण पुन्हा एकदा भेटणं खुप गरजेचं झालय बहुदा......
अप्रतिम आहे कविता. निवडक १०
अप्रतिम आहे कविता. निवडक १० मधे गेली. नेहमीच मी 'गावं रिकामं झालयं' हे वेशीवर उभा राहून म्हणायचो. पण आत्ता कळलं कि गावात उभा राहून म्हणण्याचा खरा अर्थ काय आहे ते.
छान..!
छान..!
आवडलीच!
आवडलीच!
चांगली जमलिये. पुलेशु!
चांगली जमलिये.
पुलेशु!
आवडली
आवडली
अजुन येवुदे.....
अजुन येवुदे.....
पल्ली, खुप छान! खरं तर
पल्ली, खुप छान! खरं तर एकाकीपणाच्या वेदना इतक्या प्रभावी पणे उतरल्यात, की खुप छान असे कवितेला म्हणणे चुकीचे ठरावे!
भिडली कविता..
भिडली कविता..
आभारी........................
आभारी....................................... या एकदा गप्पा मारायला... गाव रिकामं झालंय.............
माणुसवेडी माणसं...!!!
ए पल्ले काय झालं गं? चांगली
ए पल्ले काय झालं गं? चांगली गावं रिकामी होत नाहित कधी.
सम्या, आभारी. तुमच्यासारखे
सम्या, आभारी. तुमच्यासारखे हृदयीक मित्र असल्यावर गाव रिकामं होणं शक्यच नाही! जियो
मी अजूनतरी इथेच आहे. तुझ्या
मी अजूनतरी इथेच आहे. तुझ्या गावातच वस्तीला.......
धन्स, सखीप्रिया....
धन्स, सखीप्रिया.... चंदनासारखाच दरवळ आहे तुझ्या प्रतिसादात