कविता

पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...

Submitted by बागेश्री on 10 March, 2011 - 06:48

पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...
बिलगून गेल्या "वडाला", नाजूक जाईच्या वेली....
आठव क्षणाची तुझी ही, कडा पाणावून गेली...
मी थांबून "तिथेच" आहे, युगे निघून गेली.....
पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...

जाणवली का कधी रे, अस्वस्थता ही शिगेची?
अंगणात तुझ्या सख्या "ही", पणती तेवत राहिली.....
आससून जगत राहिले मी, वळला नाहीस कधीही,
मरणे कित्येक माझी, मी ह्या डोळ्यांनी पाहिली.....

वेगळ्याच असतात वाटा रे, अन वाटसरू ही वेगळे.....
उरतो फक्त मृद्घंध, अन ती नजरा नजर पहिली ....
उन्मळला वड एकदा, अन कोमेजून गेल्या वेली...
पाहवला का ते तुजला, तू दे मला कबुली....

गुलमोहर: 

तु

Submitted by कारागिर on 10 March, 2011 - 05:33

घट्ट मिठितील गंध तुझा
भान माझे हरपुन जातो
मि पण मग पोरका होउन
त्या गंधाला बिलगुन घेतो.

आठवणितला स्पर्श तुझा
शब्द माझे पळवुन नेतो
मि पण मग कावरा होउन
पुढचा घोट हाळूच घेतो.

जरी आज नाही सहवास तुझा
दिल्या क्षणास्तव ऋणि राहतो
मि पण मग अरशासमोर
स्वता: मध्ये तुला पाहतो.

गुलमोहर: 

वड....

Submitted by उमेश वैद्य on 10 March, 2011 - 04:00

वड... (वृत्तबद्ध)
डोंगरमाथ्या वरी संपते वाट जिथे अवघड
एकाकी हा उभा कधीचा तरुराज योगी वड ||१||

पर्णांचा संभार हरित तो घेऊनी माथ्यावर
पारंब्या करड्याच केशिका लोलंगती भूवर ||२||

तोलोनि घरकुले खगांची फांद्यावरी निश्चल
पांथस्था वरी धरी कुणीअसो हा सावली शीतल ||३||

फळे लाल गोमटि देतसे पक्षा पिला खावया
पारंब्या-सूर मौज लुटविसि पोरांसी खेळावया ||४||

जेष्टाच्या मासात येतसे हरसाल वटपौर्णिमा
गाती सुवासिनी पतिव्रता सावित्रिचा महिमा ||५||

वर्षाकाळी कधी चमकते आकाशी विद्युल्लता
एखादी ती पडे तव शिरी देई तुला छीन्नता ||६||

ऐसा तू स्थितप्रज्ञ भोगिसी सुखदुख:सम भावना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वजाबाकी..

Submitted by मी मुक्ता.. on 10 March, 2011 - 00:43

जगात सगळीकडेच अर्धा अधिक अर्धा एक होतो..
तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..
क्वचितच कोणीतरी पुर्ण एक असतो
आणि आपलं गणित जरा वेगळं ठरलेलं ना..
ठरवलेलं आपण,
आपला एक अधिक एक पण एक..
आणि एक वजा एक पण एकच असेल..
.
.
.
.
.
.
पण वजाबाकीच करायची होती का?

गुलमोहर: 

प्रेमभाव तुकोबाचा......

Submitted by पुरंदरे शशांक on 10 March, 2011 - 00:24

प्रेमभाव तुकोबाचा.....

चिपळी वाजतसे करी
वीणा शोभे खांद्यावरी
नेत्री भक्तीभाव झरी
मुखे विठ्ठल उच्चारी ||

ऐसे शोभले बरवे
ध्यान तुकोबाचे साचे
वाचे उच्चारिता तुका
विठू आनंदला देखा ||

चित्तामाजी होय सुख
गाथा वाचूनिया देख
कंठी तुकाचे अभंग
हरिखला पांडुरंग ||

व्हावी विठ्ठलाची कृपा
वाटे जीवाचिया जीवा
तरी ध्यावे तुकोबाते
ध्यान तेचि विठोबाचे ||

सांठवोनि तुका आंत
गावे तुकोबाचे गीत
त्वरे येईल धावत
विठू सोडोनि वैकुंठ ||

गुलमोहर: 

उठवू नका मज आता

Submitted by निनाव on 9 March, 2011 - 17:33

उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही
करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही

उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही
सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही

कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही
नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही

भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही
तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही

रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही
दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही

गुलमोहर: 

रान हिरवे

Submitted by उमेश वैद्य on 9 March, 2011 - 10:38

रान हिरवे

रान हिरवे दोन्हि बाजू
मधे तांबडी रुळ्ली वाट
तुझेच स्मरले केस मोकळे
भांग मधोमध ते घनदाट

सळसळती वार्‍याने जेंव्हा
फांद्या पाने मुक्त लकेरी
सखे कपाळि तुझ्या हलते
चुकार अवखळ बट सोनेरी

आणि पाहिला पश्चिमेकडे
अस्त रविचा रंगीत गोळा
भालप्रदेशी भिवयांमधुनी
रोज लाविसी कुम्कुम टिळा

उतारावर पहा वाहती
जीवन शिंपित अवखळ पाट
भूल पाडिती नसते विभ्रम
थरथरणारे तुझेच ओठ

दूर चमकती घुमट कशाचे
तिरिप उन्हाची वर सोनेरी
याद कशाची मजला येई
उरोजांची तुझ्या उभारी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तोच मी

Submitted by उमेश वैद्य on 9 March, 2011 - 09:27

शब्द फुलांना बहर येता
मीच फुले वेचणारा
पश्चिमेकडे सांज भेटता
तिच्या वरती उधळणारा

या उघड्या माळावरती
मीच वारा पिसाटणारा
याच येथल्या मातीवरती
थेंब नभीचा टपटपणारा

रुधिरा संगे मीच 'त्याच्या'
धमनी मधुनी सळसळणारा
सर्द 'तिच्या' डोळ्यांमधुनी
गालावरती ओघळणारा

मीच आईच्या स्तनांमधुनी
दूध होऊनि पाझरणारा
अग्नी होऊनि तुझया चितेवर
मीच आहे वावरणारा......

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मन...

Submitted by poojas on 9 March, 2011 - 09:09

थकते मन का कधी कुणाच्या आठवणीने व्याकुळ होऊन..
का गजबजते अन्तर्यामी जुन्या स्मृतीन्चे गोकुळ होऊन..?

शिकते मन का नात्यामधल्या हिशोबातली गफलत पाहून ..
घाव सुखाचे सत्यामधले.. सहज उरावर अलगद साहून..?

निघते मन का .. अडखळल्यावर पुनःप्रवासी अलिप्त राहून...
का गदगदते अश्रूसन्गे कोपर्‍यात एकाकी राहून..?

कळते मन का कधी कुणाचा नितळ निरागस चेहरा पाहून..
अनुभव घेतो निर्णय सारे... आयुष्याच्या समिधा वाहून...!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

महिला दिन

Submitted by वर्षा.नायर on 9 March, 2011 - 08:47

(हि कविता नाही
केवळ काल महिला दिना निमित्त सुचलेल्या काही ओळी आहेत)

मला देवत्व देवु नका
मला मखरात बसवु नका
पण मला हिणवु देखिल नका
मला अबला, असहाय्य समजु नका
मला फ़क्त माणुस म्हणुन जगु द्या
अगदी तुमच्या सारखच

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता