तिचे रुप
घरातली भांडी
दाण्यावीना उबडी
आनले दाणे
पोरांयचे गाणे
उतु जाई भात
हसले पिवळॆ दात
ओलं सरपण
घरभर घरपन
मनभर धन
कणभर वरण
वरणात आरसा
दाण्याला पारखा
मोहरीचा दाना
एकच भेटला
थेंबभर तेलात
टनटन नाचला
प्रेमाच्या फ़ोडणीत
मिरचीचे भरीत
घरात धुर
मायेला पुर
एका घासात
ढेकर निसट्ला
आजच्या रातीचा
प्रश्नच मिटला
सौ कल्पी जोशी