आणखी काय हवंय आयुष्यात?
ते कसं मिळवता येईल?
काय करावं लागेल?
किती सोसावं लागेल?
अपेक्षापुर्ण करताना भंगलेल्या,
प्रयत्नांना किती काळ पोसावं लागेल?
मनासारखं करताना मनाविरुद्ध
असं किती वागावं लागेल?
वाटेत येईल त्याला जवळ करता करता,
शत्रुंच्या मैलदगडांनाही किती आशेनं पहावं लागेल?
मी चुकतो आहे हे सांगणार्यांची फौज,
मोठी असेल कि तुझंच खरं असं सांगणार्यांची टोळी?
आयुष्यात मोठा होईल कि मोठेपण मिळेल?
अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवत मिळवत
काल उराशी आत्मविश्वास अन गाठीशी बक्कळ कष्ट
बांधून झोपलो होतो.
तेवढ्यात दारावरचा कडी-कोयंडा
थरारला आणि आवाज आला,
"मी 'मृत्यु' ! अखेरचा सवाल म्हणून मीच आलोय
तुझ्यासमोर."
नियतीला खाडकन झापड बसली तेव्हा,
'मी'पण जागीच सुन्न व्हायला हवे होते, होय ना?
छे ! त्याच्या अखेरचा सवाल असेलही,
पण माझं उत्तर तर अखेरचं नव्हतं.
कारण 'झुंज' द्यायला आणि त्याला
आणखी ताटकळत उभं रहायला लावणारी
जिद्द माझ्या रक्तात केव्हाच भिनली होती...
आता एवढं तर मी नक्कीच मिळवलयं !
- न्नादखुळा
नाद खुळ्या, शेवटीही प्रश्न्
नाद खुळ्या, शेवटीही प्रश्न् चिन्ह् लावलासच..!
असो, असे सवाल सहजासहजी सुटत नसतात...! लेख आवडला.
अपेक्षापुर्ण करताना भंगलेल्या,
प्रयत्नांना किती काळ पोसावं लागेल?
मनासारखं करताना मनाविरुद्ध
असं किती वागावं लागेल?>> या सवालांचा जबाब मिळाल्यास मलाही कळव...!
नक्की कळवतो.
नक्की कळवतो.
आवडली रे नाद्या
आवडली रे नाद्या
पहिला भाग खुप लांबलाय, त्याचं
पहिला भाग खुप लांबलाय, त्याचं काही करता येतं का बघ ना....
शेवट नेहमीप्रमाणे छानच पण पहिली लांबण जरा जास्तच लांबलीय