कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले

Submitted by कल्पी on 18 March, 2011 - 23:38

कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले
वेड लाविले
हातातले काम विसरुन ध्यान लागले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले

रासलिला खेळताना रंग सांडले
रंग
भिजलेल्या काया माझी जग विसरले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले
वेड लाविले

नको ना तु छळु असा छुनछुन वाजले
नादात मी पावलाच्या ताल लावले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लावीले
माझ्या मध्ये राहुनी तु मी तुझी जाहले

केशरी त्या रंगामध्ये चिंब जाहले
खेळताना तुझ्यासवे मी लाजले
लाजताना ओढणीने नेत्र झाकले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लावले
वेड लावले
कल्पी जोशी
१८/०३/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: