अचानक नकळत कशा उठल्या ह्या समुद्राच्या पोटातून कळा ...!! [बदलून ]

Submitted by प्रकाश१११ on 17 March, 2011 - 10:39

अचानक नकळत कशा उठल्या ह्या समुद्राच्या पोटातून कळा
कशा अंगात आल्यागत उठू लागल्या ह्या लाटां
गुदगुल्या करीत खेळतायत असे वाटता वाटता
कशा उन्मत होऊन गेल्या
नि बरबाद करून गेल्या ह्या लाटा.......

म्हणता म्हणता कशा उत्कट वेगाने उसळून गेल्या
नि घरे दारे कवेत घेऊन
रस्ते गाड्या बरबाद
नि माणसाचे आयुष्य
मिटवून
होत्याचे नव्हते करून गेल्या ह्या प्रचंड त्सुनामी लाटा

नाग जेव्हा सरपटतो तेव्हा खरेच नाही कळत तो साप आहे की नाग
फणा काढतो तेव्हा त्याचा बघावा बेफामपणा
तशा ह्या प्रचंड लाटा ....

टीवी वर बघायला हे सगळेच भन्नाट
रोमहर्षक
भयंकर वाटते
थरकाप होतो काळजाचा
हे सगळे ह्या वयात निर्जीपणे बघत असतो तो
त्याचा पोरगा असतो बोटीवर
काळजाचा ठोका चुकतो
क्षणभर अंधार …!
घट्ट जीवघेणा ..!!
पण सुखरूप ऐकून जीव भांड्यात पडतो

कालच मला भेटला त्या मुलाचा बाप
मुलगा सुखरूप म्हणून आनंदून गेला होता
डोळ्यातला थेंब खूप काही सांगून गेला होता
डोळ्यातला थेंब पुसत
आणि हे चालायचेच असे म्हणत होता ..
माझ्याकडे बघता बघता उर भरून आला होता
माझा मुलगा वाचला ह्यात खूप सुख आहे
बाकीच्यांचे काय झाले
कुणास ठाऊक …?
डोळे बंद करून
त्यांच्या साठी प्रार्थना करतो आहे ...!!

गुलमोहर: 

अत्यंत खेदजनक प्रसंग आहे. मुटे जीं ह्यांस अनुमोदन. खरेच लिहिले आहे त्यांनी. खेळच झाला आहे हा लाटांचा...

खेळता खेळता खेळ झाले
होते ते सारे नाहिसे झाले

डोळे उघडे, शब्द बुडाले
अंतरी विश्वास नष्ट झाले

असे कसे हे सगळे झाले
का बरे मनी त्याचे आले

उरले अश्रु न उरळे डोळे
कळे न कुठले स्पर्श झाले

गेले सारे न उरले काही
जे उरले सारे पोरके झाले!

प्र१११,
तुमच्या काव्यातुन सद्यस्थितीत तुमच्या मनात चालले हळवे विचार प्रखरपणे स्पष्ट होत आहेत.
निनाव, आपल्या द्विपदी ही छानच.