Submitted by श्यामली on 11 May, 2011 - 08:22
कधी उगाचच असे वाटते व्हावे सुरेल गाणे..
कधी उगाचच कसे वाटते व्हावे उदासवाणे?
कधी उगाचच कशी पडावी जगावेगळी स्वप्ने?
कधी उगाचच बरे वाटते भ्रमात ऐसे जगणे
कधी उगाचच वाटे असे की, जवळ कोणी असावे
कधी उगाचच वाटे असे की दूर स्वत:ला न्यावे;
कधी उगाचच हवी वाटते ग्रीष्मामधली तृष्णा
कधी उगाचच जाळत रहातो चांदण्यातला उष्मा
कधी उगाचच कसे रुणझुणे पायातील पैंजण
आणि उगाचच असे वाटते भेटून गेला साजण..
कधी उगाचच असे वाटते चंद्र लपेटून घ्यावा..
कधी वाटते आकाशातल्या ता-यावर झोका घ्यावा
कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी
कधी उगाचच डोळा पाणी सांजभारल्या वेळी..
कधी उगाचच...कधी उगाचच...
गुलमोहर:
शेअर करा
>> कधी उगाचच झूठ वाटती
>> कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी
कधी उगाचच डोळा पाणी भरदुपारच्या वेळी..
व्वा!!
कधी उगाचच असे वाटते चंद्र
कधी उगाचच असे वाटते चंद्र लपेटून घ्यावा..
>>
गुलजार ओळ.
सुंदर!! आवडली!!
सुंदर!! आवडली!!
ए श्यामली, किती हळूवार, सुंदर
ए श्यामली, किती हळूवार, सुंदर भाव आहेत तुझ्या कवितेत... मनातली अनिश्चितता, सैरभैरपणा मस्त शब्दबद्ध केला आहेस. लय पण छान आहे कवितेची.
उगाचच ..... एका स्वछंदी
उगाचच ..... एका स्वछंदी कलाकाराचा मनस्वीपणा समर्पक शब्दात व्यक्त झाला आहे.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
कधी उगाचच झूठ वाटती
कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी
कधी उगाचच डोळा पाणी भरदुपारच्या वेळी..
वावा!!!
कधी उगाचच जाळत रहातो चांदण्यातला उष्मा असं ना? की चांदण्यातही सुद्धा चालेल?
चुभुद्याघ्या.
श्यामले
श्यामले
वा, सुंदर...
वा, सुंदर...
नचिकेत, बरोबर रे, बदल
नचिकेत, बरोबर रे, बदल करत्ये...धन्यवाद
वाह!
सुंदर
सुंदर
सुंदर !!
सुंदर !!
सह्ही ! जियो...... !!
सह्ही !
जियो...... !!