Submitted by विशाल कुलकर्णी on 12 May, 2011 - 02:18
दहावी, बारावी,
इंजीनिअरींग.........
मग असंख्य इंटरव्ह्युज...
शेकडो नकार पचवल्यानंतर,
पदरात पडलेली अनपेक्षीत नोकरी!
मग सुरू झालं नवं चक्र...
रिपोर्टस् , टार्गेट्स, कोटेशन्स
अधुन मधून फसवी इन्क्रिमेंटस्....
.......
.........
...........
नाहीच आठवत आता मला...
घोंगावणार्या वार्याबरोबर पुढे जाताना,
मागे बसलेल्या तुझ्या, ओढाळ केसांचा तो मादक गंध...
शेवटचं कधी गेलो होतो गं आपण फिरायला?
गेल्या कित्येक दिवसात मी अनुभवलीच नाहीये..
मज्जा तुझ्या रुसव्यातली...
तुझा रुसवा घालवताना तुझ्या हट्टासमोर मान तुकवण्यातली...
माझं...
माझं "मोरपिस" हरवलंय बहुदा कुठेतरी !
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
मोरपीस घरातच आहे. आपण हरवलोय
मोरपीस घरातच आहे. आपण हरवलोय
(No subject)
अरेरे
अरेरे
खरय अज्ञातजी ! १००% सत्य....
खरय अज्ञातजी ! १००% सत्य....
घालमेल कळली!
काय म्हणू.. सुंदर...
आर्या, मुक्ताई मनःपूर्वक
आर्या, मुक्ताई मनःपूर्वक धन्यवाद !
तु आणि मोरपीस?
तु आणि मोरपीस?

दक्स.... नशिब माझं ! मला
दक्स.... नशिब माझं !
मला वाटलं झेपली नाही म्हणतेस की काय!
सरप्राईझ सुट्टी टाक आणि रपेट
सरप्राईझ सुट्टी टाक आणि रपेट मारुन ये जरा बाईक वरुन जोडीने
मोरपीस घरातच आहे. आपण हरवलोय
मोरपीस घरातच आहे. आपण हरवलोय >>>> खरय अगदीच..
कवे, धन्स पिल्लु ...,
कवे,
धन्स पिल्लु ..., बर्याच दिवसानंतर ? होतीस कुठे?
(No subject)
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच परत कधीच मिळत नाही!
छान.
छान.
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच परत कधीच मिळत नाही!
तो नविनच शोधतोय.
(No subject)
:d
मस्तच. नत्या ते अगदी 'वन
मस्तच.
ते अगदी 'वन मोअर' सारखं झालं.
नत्या
(No subject)
पर्या , तू भेटलाहेस आमच्या
पर्या , तू भेटलाहेस आमच्या मोरपिसाला ! तूला वाटतं ? नवं शोधणं एवढं सोपं आहे म्हणून?
धन्यवाद सगळ्यांचे !
छान कविता.... सरप्राईझ
छान कविता....
सरप्राईझ सुट्टी टाक आणि रपेट मारुन ये जरा बाईक वरुन जोडीने>>
मस्त मोरपिस.. धनेषने बाईक पण
मस्त मोरपिस..
धनेषने बाईक पण आणलिये.. आता घेच मनावर रपेटीचं..
विशल्या एकटाच हसतोय अजूनही
विशल्या एकटाच हसतोय अजूनही
धांदरटासारख्या वस्तू इकडे तिकडे टाकतोस आणि मग हरवल्या म्हणून बोम्ब मारतोस ?
एकच पीस कसल शोधतोयस ? अख्खा मोरपिसारा जमव की.
धनेषभाय, बाईक आणलीत बरं केलात; पण त्यावरच्या बदकांना मोरपीसं कशी उगवायची ?
विशालजींच मोरपीस असु शकते तर
विशालजींच मोरपीस असु शकते तर मग बदकांना का नाही... <<माझं "मोरपीस" हरवलंय बहुदा कुठेतरी !>>
मस्त.. आवडलं.. मोरपिसं आणि
मस्त.. आवडलं..
मोरपिसं आणि त्या आठवणी हरवण्याचं दु:ख निराळंच..
छान.
छान.
जोक्स अलाहिदा...कवितेच्या
जोक्स अलाहिदा...कवितेच्या मूळाशी असलेलं सत्य पटलं!
पण मोरपिसं हरवण्या साठीचं असतात...
अन कधीतरी अनपेक्षीत सापडण्या साठीही....
खरी मजा त्यात तर आहे!
पण मोरपिसं हरवण्या साठीचं
पण मोरपिसं हरवण्या साठीचं असतात...
अन कधीतरी अनपेक्षीत सापडण्या साठीही....
खरी मजा त्यात तर आहे!>>>>
येस्स...!! म्हणूनच मी सगळ्या जुन्या वह्यादेखील जपून ठेवतो. मग भले लोक त्याला पसारा का म्हणेनात! कोण जाणे पुढे कधीतरी त्यांचंही मोरपिसात रुपांतर व्हायचं............
सगळ्यांना मनःपूर्वक आभार !
तू चक्क चक्क सायलीला लोकं
तू चक्क चक्क सायलीला लोकं म्हणण्याची हिंमत केलीस? मगाच पर्यंत मोरपीस होती ना ती?

>> तूला वाटतं ? नवं शोधणं
>> तूला वाटतं ? नवं शोधणं एवढं सोपं आहे म्हणून? >>
:काडी टाकू बाहुली:
विश्ल्या नाईलाजाने गप्प बसलायंस असं जाणवतंय या वाक्यातून. थांब सायलीला फोन करते.
Pages