क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !

Submitted by Unique Poet on 12 May, 2011 - 04:44

हा एक प्रयत्न आहे.... मराठी खेळगीत { Marathi Cricket Anthem } लिहीण्याचा,... माझ्या प्रिय मित्र अमित पाटील ने सतत माझ्या मागे लागून मला पटवून दिले की हिंदी , इंग्रजी खेळगीत लिहीली जाऊ शकतात तर मराठी का नाही.........मराठी खेळगीत लिहीण्याची कल्पना त्याची आहे. मी यापुर्वी इतर भाषांमधील खेळगीतांचा , कोणत्याही खेळगीताचा अभ्यास केलेला नाही.... त्यामुळे हे स्वतंत्र खेळगीत आहे ... यावर कुठलाही प्रभाव नाही..... आपल्याला आवडेल अशी आशा करतो............ Happy

ता . क. : हे खेळगीत लिहीले आणि नेमका भारताने विश्वचषक जिंकला.... या बादरायण संबधाने का असेना भारताच्या विजयात आमचाही हातभार आहेच असा आमचे ठाम म्हणणे आहे.... बीसीसीआयने आमचेही मानधन दिले तर बरॆच आहे Wink ......

धगधगल्या रक्‍तातील ज्वाळा
पुन्हा एकदा उठल्या पेटून
घोर क्रिकेटच्या युध्दासाठी
देश उतरले येथून तेथून
प्राण पणाला खेळू रेटून
क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! धृ !! H3ECAN2RWFJCASF30UACATD22OWCA66FUBECA94T061CAXWYNKHCAG4L0JWCA1LLGJDCAZ2C1BSCAS6NBJZCAKGHF6GCA3M0FVKCA8WXA8PCAA86HH2CANQKOZHCAW9GFCGCA13B3VYCA6Q65P9CABQ9OIM.jpg

ईर्षा नाही ध्यासच केवळ
विजीगिषेचे अखंड कीर्तन
क्षणाक्षणाला रंग पालटे
अनिश्चिततेचे सदैव नर्तन
परतीचे ते दोरच कापून
क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! १ !!

नियतीचा चेंडू जरी असला
मैदानाच्या बाहेर उडवा
करू सामना, क्रिकेट जीवन
कितीही असू दे चेंडू फसवा
पाय आमचे घट्टच रोवून
क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! २ !!

बूडवून शाळा, कॉलेज, ऑफिस
टीव्हीपुढे त्या ठोकून मांडा
कितीकसारे दांड्या मारून
तिकीटासाठी लावीत रांगा
इतर सर्व बाजूला सारून
क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! ३ !! F1WCASPRLZFCAW20SWBCA3GBVZVCAI99PG1CA9ZICTTCA37S3HCCA6VB6DHCAKBWS2KCAWG3OA6CATMDBYYCA1D1PGICAFLEUNUCA7AMYSOCAZXW90OCA9F07C3CA63ZF6TCA3MOR6JCAG5OVZVCA5D5GWA.jpg

नवोदित जरी अनेक संघ
लढावया ते परजून उठले
गुगली,षटकारांची अस्त्रे
स्टंपा, चेंडू कितीजरी फुटले
प्रतिस्पर्ध्यांच्या नांग्या ठेचून
क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! ४ !!

कोटी , अब्ज त्या श्रध्दा पाठी
ध्येयाच्या परिपुर्तीचा क्षण
खिलाडूवृत्ती ठेवू जागृत
गाजगाजवू क्रिकेट रणांगण
यशरस्ते ते सीमोल्लंघून
क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !! ५ !! images.jpg

- समीर पु.नाईक

गुलमोहर: