Submitted by सांजसंध्या on 13 May, 2011 - 12:10
ही शेवटचीच कविता असेल..
पावसात वाहून गेलेले
कांही शब्द मी शोधून आणीन
गच्च ओलेत्या कागदांना
उष्ण उच्छवासाची ऊब देईन
अंगात भिनलेला पाऊस
डोळ्यांतून बरसत असेल
तेव्हां कदाचित.....
ही शेवटचीच कविता असेल..
आठवांना चुचकारत
लेखणी हातात घेईन ..आणि
चुकार आसवांचे थवे
डोळ्यांत दाखल होतील
माझ्या डोळ्यांदेखत जी
पुसटशी होत जाईल
कदाचित.....
ही शेवटचीच कविता असेल
धुक्याच्या किनखापी पडद्याआडून
किन-या बोच-या हास्याच्या, लकेरी येतील
माझी क्रौंचकाहीली.. वाढत जाईल
एव्हांना जांभळ्या छटांचे नर्तन सुरू होईल
कृष्णसावल्या जमा होत असतील
तेव्हांच.. लेखणीही थिजलेलीशी होईल
मी.........................................
रक्ताच्या शाईने जी लिहून काढीन
कदाचित.....
ती शेवटचीच कविता असेल
संध्या
गुलमोहर:
शेअर करा
शेवटचं कडवं खास!! बादवे,
शेवटचं कडवं खास!!
बादवे, आसवांचा उल्लेख दोनदा झाल्यामुळे प्रभाव कमी वाटत नाहीये का?
)
(नसेल तर अर्थात, मला कळला नसेल अर्थ
आजच्या फ्रायडे द १३ निमित्तची
आजच्या फ्रायडे द १३ निमित्तची स्पेशल कविता आहे .
हॉण्टेड ३डी ला जायचा बेत आता रद्द.... खूपच भीती वाटली..
आनंदयात्री... आसवांचा दोनदा
आनंदयात्री... आसवांचा दोनदा उल्लेख नाही. त्यातला एक शब्द आठवांचा असा आहे...
जंतू... हॉरर वाटली का कविता
अंगात भिनलेला पाऊस डोळ्यांतून
अंगात भिनलेला पाऊस
डोळ्यांतून बरसत असेल
आणि
चुकार आसवांचे थवे
डोळ्यांत दाखल होतील
याबद्दल बोलत होतो मी..
अच्छा ! ते मी कसं ठरवणार ?
अच्छा !
ते मी कसं ठरवणार ? आता वाचकांच्या ताब्यात गेलीये कविता. ते म्हणतील ते प्रमाण
कवितेची संकल्पना आणि शेवटचे
कवितेची संकल्पना आणि शेवटचे कडवे आवडले.....
chaan aahe..... shevat sunder
chaan aahe..... shevat sunder aahe...
bye bye..... pudhchya janmi lavkar yaa.....
मी...........................
मी.........................................
रक्ताच्या शाईने जी लिहून काढीन
कदाचित.....
ती शेवटचीच कविता असेल >> बहुदा पहिल्यांदाच असे शब्द प्रयोग झाले असावे एखाद्या काव्य रचनेत!
अभिनंदन!
हि शेवटची कविता मस्तच आहे..
हि शेवटची कविता मस्तच आहे.. पण ज्या अजूनही कुठेही, कधीही न मांडल्या गेलेल्या भावनांचं काय? त्यांनाही कुठेतरी जागा मिळवून द्यायला हवीच ना? बरंच बाकी आहे .. तेवढं पुर्ण करून लिहा शेवटची कविता..
आवडली कविता.
आवडली कविता.
@उदयवन ...जगलो वाचलो तर भेटू
@उदयवन ...जगलो वाचलो तर भेटू आपण नक्कीच
@शामली थँक्स ग, @चातक., समीर नाईक ...धन्स.
नादखुळा.......नक्की नक्की. . भापो. खूप खूप आभार
आवडली कविता.
आवडली कविता.
1 ka....mahinyat jar jagalis
1 ka....mahinyat jar jagalis tar bhet.....
mag tuzi pudhachi kavita POSITIVE hoil....
प्रत्येक कविता, निर्मिती
प्रत्येक कविता, निर्मिती शेवटची समजूनच लिहावी खरं तर...
.... छान शेवटच्या ७-८ ओळी
.... छान
शेवटच्या ७-८ ओळी मस्तच.
!
दोस्तांनो थॅ़क्स... उदयवन
दोस्तांनो
थॅ़क्स...
उदयवन
@उदयवन ...जगलो वाचलो तर भेटू
@उदयवन ...जगलो वाचलो तर भेटू आपण नक्कीच>>>>>>>>>>> तुच बोललीस ना भेटु.......म्हनुन म्हणालो की पुढिल १ महिना जर जगलीस तर नक्कीच भेट...........who knows तुझी पुढची कविता सकारात्मक असेल........
कविता छान आहे, पण ही शेवटची
कविता छान आहे, पण ही शेवटची कविता अजिबात नको! आणखी खूप लिही.
ही शेवटचीच कविता
ही शेवटचीच कविता असेल......>>>>>>
देव करो, हेच खरे होवो.
अफाट..!
अफाट..!
जियो........
जियो........
खूप छान....
खूप छान....
कवयत्रीच्या भावना समजल्या.
कवयत्रीच्या भावना समजल्या. छान प्रयत्न.
हॉंटेड ? हं.
हॉंटेड ? हं.
सांजसंध्या, रानभूल काय एकेक
सांजसंध्या, रानभूल काय एकेक सुंदर नावं सुचतात पोरींच्या नावाने फेक अकाउंट्स काढायला नाही?
येडझव्या वैद्यबुवा, तुझ्या
येडझव्या , तुझ्या आईच्या नव-याची साईट आहे का रे वैद्यबुवा ?
तू बिथोवन बनून क्या महिलांना शिव्या दिल्यास, त्यांना अश्लील भाषा वापरलीस त्या महिला ख-या आहेत. तुझी मानसिकता आणि मानसिक स्थिती दोन्ही सध्या चांगली नाही. किती आयडींना त्रास देत सुटलायेस ? बायको बियको शोजा-याचा हात धरून पळाल्यासारखं करायला लागलंय.
तू वैद्यबुवा या तुझ्या मूळ रूपात ये आणि बोल ना महिलांना घाण घाण. बघू आहे का हिंमत.
वेबमास्टर, या आयडीला कोपच्यात घेऊन समजावून सांगा नाहीतर मायबोलीच्या खर्चाने मानसोपचार तज्ञाकडे तरी पाठवा.
सांजसंध्या ड्युआयडी असल्याचे
सांजसंध्या ड्युआयडी असल्याचे त्या आयडीने गप्पागोष्टी या धाग्यावर जाहीर केले होते ही गोष्ट मला माहीत आहे. तिथल्या काही जणांना ही गोष्ट माहीत होती. कुणाचा ड्युआयडी ते सुद्धा माहीत होते. समजा माहीत जरी नसते तरी या आयडीने वाईट वंगाळ काम काही केलेले नाही. फिमेल आयडी बनवणे हा काही गंभीर गुन्हा नाही. जर असा आयडी बनवून कुणाला धमकावले, जाळ्यात ओढले, बदनामी केली किंवा पैसे लाटले तर गुन्हा होईल.
गुन्हा इतर सर्व महिलांना सरसकट फेक आहेत असे समजून अश्लील शेरेबाजी करण्याने होतो. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. कुणीही केलेला का असेना. निव्वळ फेक आयडी बनवणे आणि अश्लील भाषा वापरणे यातला फरक समजत नाही का या आयडीला ? इतकीच नैतिकतेची चाड होती तर सरळ महिलांना अश्लील शेरेबाजी होत असताना पुरूषार्थ दाखवायचा होता. तेव्हां शेपूट घालून का बसले होते हे ?
या फिल्मी नामक आयडीने मी सहजराव आहे असे तारे तोडले आहेत. प्रत्येक ठिकाणी माझे नाव घेत सुटलेले आहेत. इग्नोर करणे अशक्य झाल्याने कालपासून मी या आयडीला उत्तरे दिली आहेत. आज इग्नोर केले. मात्र तरीही या आयडीने माझे नाव घेणे चालूच ठेवल्याने आत्ता नाईलाज झाला.