Submitted by क्रांति on 15 May, 2011 - 05:54
कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
गुलमोहर:
शेअर करा
जबरदस्त गेयता आहे....काय
जबरदस्त गेयता आहे....काय नादमाधुर्य आहे संपूर्ण कवितेत !!
सूचना :झर्याला खळाळून लोभावणारे...इथे लुभावणारे कसं राहील ? आगाऊपणाबद्दल क्षमस्व
अतिसुंदर शब्द रचनेत ढळलेली
अतिसुंदर शब्द रचनेत ढळलेली सुमधुर-सुंदर कविता.
खरेच छान वाटले वाचुन.
कधी चांदण्याला तुझी आस
कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
सुंदर
व्वा... वा... वा..
व्वा... वा... वा.. अप्रतिम...!
छान झाली आहे.प्रत्येक कडवं
छान झाली आहे.प्रत्येक कडवं सुरेख..
नेहमीप्रमाणेच सुंदर
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.
“निजेच्या क्षणी ……. तुझे भास होते”
हे सर्वात जास्त आवडलं.
अप्रतिम कविता.... कधी
अप्रतिम कविता....
कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते >> झक्कास.........
(No subject)
अ फा
अ फा ट ! ! !
मस्त.. अन हे म्हणजे जानलेवा
मस्त..
अन हे म्हणजे जानलेवा ..
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता-----
वा ! वा ! अप्रतिम सुंदर !
वा ! वा ! अप्रतिम सुंदर !
खूप आवडली
खूप आवडली
सुंदर! आवडली गं.
सुंदर! आवडली गं.
वा वा क्रांती काय मस्त,
वा वा क्रांती काय मस्त, कुर्बान या कवितेवर
आ हा हा हा हा......सुमधुर...
आ हा हा हा हा......सुमधुर...
क्या बात है..
क्या बात है..:)
समेला जशी दाद उस्फूर्त
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता>>>
व्वा व्वा क्रान्ती!
सगळीच कविता सुंदर आणि स्पेशल 'क्रान्ती स्टाईल" ही!
(अवांतर - आयुष्यात जे हवे ते न गवसल्याचे आणि ' काहीसे ' निराश झाल्याचे भाव आपण अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने मांडता. पण एक बोलू का? म्हणजे आपला एक सह-कवी म्हणून! हे भाव आपल्या गझलेत, कवितेत अनेकदा आले. आणि हे वाचून असे वाटते की 'जेव्हा आयुष्यात सप्तरंग होते आणि त्यातला एकेक रंग 'वजा' व्हायला लागला' त्या कालावधीतील कविताही आपण इतक्याच समर्थपणे द्याल आम्हा वाचकांना! वाचाव्याश्या वाटत आहेत आपल्या 'साकारात्मक' रंग असलेल्या कविता!)
अधिक उणे बोललो असल्यास मनापासून माफी !
पण मला यावेळेस तुमचा मुद्देसूद प्रतिसाद हवाच आहे. हा हवे तर आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसाचा बाल - आग्रह समजावात!
-'बेफिकीर'!
व्वा !
व्वा !
समेला जशी दाद उस्फूर्त
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता-----
जियो तायडे !
खूप सुंदर!! सारीच कविता
खूप सुंदर!! सारीच कविता अप्रतिम!! कळ्यांचे खळे ही किती सुंदर कल्पना!!
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता>>>>व्वा!!
कविता नेहमी प्रमाणेच अप्रतिम
कविता नेहमी प्रमाणेच अप्रतिम !
गझलेनं सोडलं नाही ना? दिली
गझलेनं सोडलं नाही ना?
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते...खुपच प्रामाणिक!!!!
क्रांति.... लाजवाब!
क्रांति.... लाजवाब!
व्वा छानच..
व्वा छानच..
वाह ! सुंदर ! अप्रतिम !
वाह ! सुंदर ! अप्रतिम !

अप्रतिम! अतिशय रेखीव...
अप्रतिम!
अतिशय रेखीव...
आवडली.
आवडली.
क्या बात है... क्या बात
क्या बात है... क्या बात ...
अप्रतिम .. !