सूर्य आणि बाप ...
माझे आणि सूर्याचेही डोळे उघडण्याआधी
बाप गेलेला असायचा डोंगराच्या पलीकडे
भाकरीचा सूर्य शोधण्यासाठी ...
अंगणात सूर्याची किरणं यायची
पण त्या आधीच बापानं सोडलेलं असायचं अंगण
अन धरलेला असायचा रस्ता..
अशा वाड्यांचा,
जिथे आजही उघड्या अंगाने
स्वागत करतात माणसं,
उगवणा-या प्रत्येक सूर्याचं..
बापापुढे हार खाल्लेले हिवाळे, पावसाळे
माणसांचे प्रवास रखडवतात
हे खरं वाटत नसायचं तेंव्हा,
जेंव्हा कोणत्या ही ऋतूत सुर्याआधी
सुरु व्हायचा बापाचा प्रवास
आणि संपायचा तो ही सूर्यानंतरच...
चार चौघांमध्ये,
चारचौघांसारखं जगण्याची, आणि
आम्हालाही जगवण्याची धडपड
शांतच बसू देत नव्हती त्याला..
या प्रवासात बापानं केळी विकली,
पाव विकले,
अंडी, कोंबड्या, किराणाही विकला
त्याचं ना भाकरीचं वेळापत्रक होतं,
ना पगाराचं गणित
आयुष्यात किती दिवस सुखाने झोपला कोण जाणे?
पण सुखाची नुसती स्वप्नं बघायला सुद्धा
त्याने डोळे झाकलेले
पाहिले नाहीत मी कधी..
एरवी बाप आणि सूर्यात
मला फरक वाटत नव्हता
सारखाच नित्यनियम,
सारखीच धडपड
एकाची धरेसाठी आणि एकाची घरासाठी
पण त्या दिवशी अचानक कळाला
बाप आणि सुर्यातला भला मोठा फरक...
की, सूर्याचा कधी अपघात होत नाही
की, त्याचा पाय मोडत नाही खुब्यात
आणि येत नाही डोळ्यात पाणी घरासाठी...
सूर्य पाहत नाही आशाळभूत नजरेने
भेटायला येणार्या माणसांकडे
आणि अगतिकतेने, लंगडत-लंगडत चालत नाही पुन्हा
त्याचं प्रवासासाठी....
-शाम
अशक्य... ___/\___ मुजरा...!
अशक्य... ___/\___ मुजरा...!
वाह!!!!!!!
वाह!!!!!!!
मुक्ता आणि नचिकेत्..आभारी
मुक्ता आणि नचिकेत्..आभारी आहे!...
व्वा...
व्वा...
शब्द नाहीत मित्रा वर्णन
शब्द नाहीत मित्रा वर्णन करायला इतकी अप्रतिम कविता.....
विशाल आणि शशांक्...आपले खूप
विशाल आणि शशांक्...आपले खूप खूप आभार!!!!!!
छान तरी कसं म्हणू या
छान तरी कसं म्हणू या कवितेला?
एक कष्टाळू आणि स्वत:च्या कुटुंबाकरिता झुंजणारा बाप सुरेख रंगवलायंत..
नि:शब्द झाले मी वाचून.
पुलेशु!!!
शाम , क्या बात है !
शाम , क्या बात है !
अप्रतिम !!
अप्रतिम !!
दक्षिणा,देसले सर, आणि
दक्षिणा,देसले सर, आणि निवडुंग्.....थँक्स!!!!!!
जबरदस्त्..टचिंग
जबरदस्त्..टचिंग
व्वा..
व्वा..
छान ... अगदि काळीज पिळवटून
छान ... अगदि काळीज पिळवटून टाकणार लिहितोस.....
व्व्वा रे मित्रा... बात है
व्व्वा रे मित्रा... बात है तुम्हारेमे... लिखते रहो !
सानीका, रोहित, मयुरेश्,गिरीश
सानीका, रोहित, मयुरेश्,गिरीश आणि फुल्या......आभारी आहे दोस्तांनो''
ओह्ह.. कविता वाचुन बेचैन
ओह्ह..
कविता वाचुन बेचैन झालं मन..
खुप छान
खुप छान
श्याम... काय लिहू, काय
श्याम...
काय लिहू, काय प्रतिसाद देऊ...
शब्द तोकडे पडतील..
शाम, इतकी सुंदर कविता आणि
शाम, इतकी सुंदर कविता आणि इतके कमी प्रतिसाद
सारीका म्हणते तसं शब्द तोकडे पडतील काही बोलायला गेलो तर.
कविता हृदयस्पर्शी आहे....
कविता हृदयस्पर्शी आहे.... शेवट मनाला चटका लावून जाते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर
इतकी सुंदर कविता आणि इतके कमी प्रतिसाद >>>
मंदार,
कविता सुंदर असली म्हणजे प्रतिसाद भरपूर मिळतातच असं काही नसतं; हे एव्हाना माबोवरच्या अनुभवावरून लक्षात यायला हरकत नसावी. अशा आणखीही काही कविता जेमतेम प्रतिसाद मिळून कुठल्यातरी कोपर्यात धूळ खात पडल्या असतीलही. प्रतिसाद संख्या आणि कविता चांगली असणे/नसणे याचा संबंध असतो किंवा प्रतिसाद संख्या हा कवितेच्या दर्जाचा मापदंड असतोच असं नाही. (अनेकदा ही चर्चा झालेली असावी)
थोडक्यात सांगायचं तर, बीजगणिताप्रमाणे
चांगली कविता = भरपूर प्रतिसाद
असं समीकरण मांडता येत नाही किंवा
भरपूर प्रतिसाद = चांगली कविता
हे भौमितिक प्रमेयासारखं व्यत्यासाने सिद्ध करता येत नाही.
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम्....किती वेळा लिहू....
_/\_
_/\_
खरोखर सुंदर खूपच छान
खरोखर सुंदर खूपच छान