तुझ्या माझ्या ...

Submitted by vaiddya on 15 May, 2011 - 01:04

तुझ्या माझ्या डोक्यावर
आपापलं हे
वेगळं होत गेलेलं
आकाश ..
अजूनही चमकतात त्यावर
आठवणींच्या प्रकाशाचे तारे !

तुझ्या माझ्या
विलग विलग
क्षितिजांवर
अजूनही उगवतात
जुनेच चंद्र !

तुझ्या माझ्या
वेगवेगळ्या दुनियांचे
अजूनही स्पर्श एकमेकांना
जेव्हा वाहातात
जुन्या संदर्भांचे वारे !

गुलमोहर: 

आवडली.
शान्ताबाईंची 'या आभाळाचे काही नाते असेल का त्या आभाळाशी?
दोन्ही आभाळे भेटत असतील कधी कोणत्या खुणेपाशी?' अशी एक कविता मला सतत आठवत राहते. आज पुन्हा तुमच्या कवितेमुळे आठवली.