नव कवयित्री......

नव कवयित्री

Submitted by सखीप्रीया on 14 May, 2011 - 00:48

कवयित्री.....
शब्दाला शब्द....
यमकांचा अलंकार....
...की झाली कविता असे नाही,
जाणीव आहे मलाही.
मी नव्हे कुणी श्रेष्ठ कवयित्री
...पण मनातून कोसळणार्‍या शब्दधारांचे काय?
शेवटी त्यांनाही कागदजमीन हवीच हवी.
मग त्याला उच्च प्रतीची कविता म्हणोत,
किंवा नुसतेच कागद काळे म्हणोत.
माझी सृजनशीलता, काव्यप्रतिभा वाहू देते,
या चुकत्-माकत केलेल्या काव्य प्रयत्नाने.
तेव्ह्ढीच मन्-मोकळीकता, शांतता !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नव कवयित्री......