पिंजला रे पिंजला आकाशतंतू पिंजला
ओटीत स्वरमय स्फटिकजळ; मेघात पाउस झिंगला
तिमिरात सळसळली वने; विरहात विकल शकुंतला
मनक्लांत वेडी रोहिणी; झुलव्यात वारा गुंतला
ओलांडुनी भववेस ही कैदेत बावरली उन्हे
हृदयात गुदमर कुंद अन एकांत व्याकुळ तापला
नभथेंब आतुर; गगनही; खग आर्त; विफल वसुंधरा
दे छंद ओघळ ओंजळी; भंगून दे जड शृंखला
.......................अज्ञात
कसा आहेस?
आज काल भेटत नाहीस पुर्वीसारखा...
त्याने खांद्यावर हात टाकत विचारलं
तसा सुस्कारलो हलकेच...
एक स्तब्ध नि:श्वास टाकत म्हणालो,
वय झालं रे आता...
नाही जमत पहिल्यासारखं वारंवार यायला,
वेडा की काय?
अरे असं वय वगैरे कधी असतं का ?
त्या व्याधी देहाच्या...
मनाच्या हिरवेपणाला कसलं आलय वय?
कायरे...
आपल्या भेटीला स्थळकाळाची बंधनं कधीपासून पडायला लागली?
आणि तूला कुठेही यायची किंवा जायची गरजच काय?
अलगद, अगदी हळुवारपणे, पण मनापासून
आपल्याच मनाच्या कुठल्याही कोपर्यात डोकवायचं...
सुटका
दुपारची शांतता एखाद्या गुहेसारखी
खिडकीबाहेर झुलणाऱ्या गव्हाच्या लोम्ब्या,
तू तेथे बसली आहेस शांत जुन्या कोपऱ्यात,
माझे मन भरकटत शेतात,
घराच्या सर्व खोल्या पार करीत
गुहेचा थंड गार काळोख ओंलांडत
सभोवतीचे सूर्यप्रकाशाचे तुकडे उचलून हातात
मी धावत सुटतो मोकळ्या माळरानात, उजाड तेकड्याभोवती
निळे आकाश खेचत जाते मला
वारा ढकलत जातो मला
तुझ्यापासून दूर... दूर...
पण प्राचीन आठवणीतून बाहेर येत
जेव्हा तू साद घालतेस खिडकीतून
जो तो येतो मारून जातो
जो तो येतो मारून जातो,
जो तो येतो त्याला खेळून जातो,
बोलत नाही गरीब बिचारा मुका
तो तर तेव्हा करतो काय?
जेव्हा बॉलला बॉलर लावतात थुका ||धृ||
तो हातात धरून जोरात चोळतात
त्याला वरती फेकून खाली झेलतात
पायी घासून घासून
पायी घासून घासून
रंग त्याचा जाईल बरका! ||१||
त्याला पकडाया सगळे पुढेच पळती
हाती घ्यायला सारेच जोरात धावती
सोडू नका हो कुणीही त्याला
बोलती होणार्या धावा रोका ||२||
तो पहा बॉलरने बॉल आता बघा की हो टाकला
बघा बॅट्समनने अस्सा फटका त्याला हो मारला
जोरात फटका लागला त्याला
अजूनही ऐकतोय तुला आवडणारी चार गाणी
एखाद्या निवांत संध्याकाळी
आणि झोकून देतो स्वतःला भूतकाळाच्या गडद
अंधारात
आठवणींच्या चांदण्या मोजण्यासाठी...
मग बोलत रहातात फक्त श्वास
घरभर पसरलेल्या शांततेशी
आणि मन बधिर होऊन झेलत रहातं
त्या चांदणसरी...
छमकन समोर यायचीस
मैत्रीणींच्या घोळक्यातून
अन् धूसर होत जायचा सगळा आसपास
आतून-बाहेरून..
कँटीनकडे वळणारी तुझी पावलं
खिशातल्या खिशात
माझं गणित पक्क करायची
अन् क्षणाक्षणाला ओढणी सावरणारे तुझे हात
तर माझी घसरणारी नजर
सतत एकमेकांच्या विरोधात..असायची
ज्या वयानं तुला शहाणं केलं
त्याच वयानं सैरभैर झालेला मी
हा मद्याचा प्याला
उबडा का ठेवला
अर्क शीशीतला,
माणुस मीशीतला, ओठातच हसला
एक मद्याचा प्याला
अर्काने भरला
हलकेच झलकला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला
घोट नरडिचे घेत,
अर्क सोडिला पोटात
लागला डोलायला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला
कोम्बडी केली फस्त
ढेकरही दिली मस्त
समतोल सावरावयाला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला
पाहुनी उबडा प्याला
तो दु:खाने हसला
का! चाखले जहालाला ?
म्हणुन माणुस मीशीतला, ओठातच हसला
सांजसंध्येचा हात घट्ट पकडून
तू निघालीस तेव्हा..
तुझा तो लाजरा पदर
माझ्या हातून सोडवताना
सहज म्हणालीस.. हि वेळ नाहीये रे वेड्या !
तेव्हापासून आजपर्यंत फक्त
असंख्य वेळेच्या वेड्या संज्ञा आणि तू,
माझ्या शब्दात कितीदा मिरवल्या मी..
कितीतरी वेळा चांदण्यांचं आकाश,
बेभान सरींचा तो गलका,
रंगवला असेल तुझ्या शुभ्र पदरावर..
पण माझ्या तळहाताचे ठसे,
केवळ किनारीवरच दिसतील तुला..!
ते पुढे सरकावेत असं कितीही वाटलं तरी,
तुझ्या ओठांवरच्या त्या 'वेळेच्या' वेशीचं लांबणं,
तेव्हापासून तु अडवून धरल्याचं आठवतयं मला...
काल सहज ती अडवणूक..
लांघावी एकदाची असं ठरवूनच
मी दाराची चौकट ओलांडली तर..
तू,
उरून राहिला आहेस, माझ्यात
भिनून, श्वासातल्या कणाकणातून
रंध्रातल्या अणुअणूमधे,
तूच माझे स्पंदन, तूच माझे श्वास
तूच माझे मिलन आणि तूच..
माझा विरह
तुझ्यातच झाले आहे एकरूप
माझ्या आत्म्यातले; तुझेच
जुळे 'मी'पण, तुझ्यात
तू साकार, तू जाणीव
तू स्पर्श आणि तूच
समाधीआधी शेवटच्या क्षणापर्यंत
माझा निर्विकल्प आनंद
तूच माझा जन्म
आणि तूच
जन्माचे कारण
तूच माझे हास्य, आणि
तूच माझे अश्रू
तूच देतोस अनुभूती
शरीरापलीकडल्या प्रेमाची; भरीव
आणि
तूच वाहतोस माझ्या
तृप्त रितेपणातून
तूच देतोस दृष्टी
माझ्या स्वप्नांना
स्वर्गीय, गुलाबी
आणि तूच होतोस व्यक्त
माझ्या प्रत्येक कृतीतून
बस,
सुकून गेलेल्या कळ्यांत
फुलं शोधण्यात राम नाही.
नापीक जमिनीत बीजं अंकुरायाची
स्वप्नं पाहण्यात राम नाही.
दोन ध्रुवं सांधायाच्या
तुटेपर्यंतच्या प्रयत्नात राम नाही.
मधुशालाच सुखदुखात साथी तर,
मधुबालाच्या आसेत राम नाही.
या जिंदगीतून तूच वजा झाली
आता या जिंदगीत काही राम नाही.
रामालाच अवतरायला जागा सापडेना,
त्याचं नाव घेण्यात ही राम उरला नाही.
आकाशाचं अन् मनाचं
नक्कीच काही नातं असतं,
आकाश दाटून येतं तेव्हा
मन सुध्दा भरून येतं...!