पहिला पाऊस

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 May, 2011 - 06:42

************************************************************

राहवणार नव्हतंच त्याला !
कुणी इतका वेळ दूर राहू शकतो का?
जिवाभावाच्या दोस्तांपासून !
तो तर अगदीच माणुसवेडा..
माणसाच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधणं,
खुप... म्हणजे खुपच आवडतं त्याला,
माणूस दु:खात असला की तो अश्रु बनून कोसळतो,
सुखात असला तरीही आनंदाश्रु बनुन येतोच...!
मग येताना येतो घेवुन सोबत..
सुगंध प्रियेच्या पहिल्या स्पर्शाचा !
मोकळा होतो अलगद मग गुदमर...
तिच्या विरहात घालवलेल्या एकाकी रात्रींचा !

तसा तो आजही आला...
मी येणार आहे लवकरच,
हळुवारपणे गालावर टिचकी मारत,
ग्वाही देवून गेला... !

चला...
माळ्यावरची सतार खाली काढायला हरकत नाही!

************************************************************

तळटिप : आज सकाळी अचानक दोन मिनीट भुर भुर पावसाने हजेरी लावली आणि........

विशाल

गुलमोहर: 

सतारीला माळ्यावर ठेवलंस माणसा. कुठशी फेडशील हे. तसाही तो आला कि सतारही फिकीच पडते रे. त्याचं गाणंही नेहमीसाठी वेगळंच आणि संगितही.

त्याने टिचकी दिली तुला? श्या.. एखादी सर तरी यायला हवी होती. आता तो आणि टिचकी म्हणजे.. Proud बटा वगेरे नाहित ना त्याला Light 1

मस्त लिहिली आहेस. तो येतो आहे आणि तो कोसळणार.

बटा कसल्या येड्या आमच्या मुंबईत तो येतो तेव्हा त्याला जटा असतात Wink म्हणून तर आजचं त्याचं येणं टिचकीसारखं वाटलं ना.... !
ठमे धन्स गं !

सतार माळ्यावर ला मोठ्ठ प्रश्नचिन्ह Happy

आवडली कविता....यंदा पावसाआधीच पाऊसकवितांची सुरवात....अच्छा है!

धन्यवाद मंडळी !
श्यामलीताई, अगं सतार हे एक प्रतिक म्हणून वापरलय आनंदाचं, समाधानाचं. मोस्टली आपण (विशेष्तः मुंबईकर) कसे वर्षभर घड्याळाशी बांधले गेलेलो असतो. घर, ऑफीस, नोकरी , बॉस, टार्गेट्स हजार समस्या, ते ताण तणाव यात जगत असतो. त्या ठराविक कालावधीपुरती मनाची सतार (जी मनाला आनंदी ठेवते, समाधानी ठेवते) कळत, नकळत कुठेतरी कोपर्‍यात, माळ्यावर ठेवली जाते. पण पावसाळा आला की कसं एकदम सगळं रिलॅक्स होवून जातं. मग ते ताण-तणाव, त्या रोजच्या कटकटी नको वाटतात. मग त्यांच्यापासून काही क्षणापुरती का होइना सुटका करून घ्यायची. अर्थात नाईलाजाने माळ्यावर ठेवून दिलेली सतार खाली काढायची. काही दिवस का होइना पण एक मस्त, आनंदी आयुष्य जगायचं. नंतर परत आहेच की जगण्याचं रहाट गाडगं !

“येताना येतो घेवुन सोबत..
सुगंध प्रियेच्या पहिल्या स्पर्शाचा !”
.... क्या बात है !
-----------------------------------------------------
माळ्यावरून सतार काढलीच आहे विशाल,
तर आता सुरू होऊ द्या ... दिड् दा दिड् दा

अहा...... मस्त !!

माळ्यावरची सतार मात्र पटली नाही तुझ्या स्पष्टीकरणानंतरही !! दुसरं काहीतरी काढ ना माळावरुन.... !! किंवा सतारच काढायची असेल तर ती हॉलच्या कोपर्‍यातून पण काढू शकतोस की Wink

अगं जयुताई, प्रगल्भता आलीय त्याला आता. आता अशा वेळी मनातला मोरपिसारा सांडतांना बघायचे सोडून दूरदर्शनवरचे सतारवादनच ऐकायची वेळ आलीय त्याच्याकडून!

माणसाच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधणं,
खुप... म्हणजे खुपच आवडतं त्याला,
माणूस दु:खात असला की तो अश्रु बनून कोसळतो,
सुखात असला तरीही आनंदाश्रु बनुन येतोच...!

क्य बात है .. ! मस्त ...!! Happy

वा ! Happy

seriously सतार माळ्यावर ला offence आहे
बाकी...पावसाच्या कवीतांचे सदर उघडायला हर्कत नाही!

Pages