Submitted by नादखुळा on 24 May, 2011 - 00:01
त्याचं असं दूर जाणं,
भेटू केव्हातरी असं सांगून,
कुठेतरी नव्या क्षितिजांवर,
ओल्या देहानं मातीसवे
दरवळत राहणं.. चालायचंच !
आज तो परतणार आहे,
हो हो आज तो येणार आहे,
कालची थंडगार आभाळाची सावली,
हेच तर सांगत होती..
हळू हळू ओल्या चाहूलीची गर्दी,
अगदी शिवार ओलांडून पांगत होती..
पण आता तीच्यावाचून तो म्हणजे,
जुन्या जखमांवर ओली शिंपडच,
अन एकेका थेंबासोबत विरघळत जातो,
तो माझ्या हजार स्वप्नांचा खच..
बहाल मर्जीचा राजा तु,
आता तुला काय ते अडवावं,
पण निदान यंदाच्या मौसमात तरी,
परतीचा सोबती म्हणून तू मला निवडावं...
-नादखुळा
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे रे! मला आवडली..
छान आहे रे! मला आवडली..
बहाल मर्जीचा राजा तु, आता
बहाल मर्जीचा राजा तु,
आता तुला काय ते अडवावं,
पण निदान यंदाच्या मौसमात तरी,
परतीचा सोबती म्हणून तू मला निवडावं...>>> अगदी अगदी.
येणार...येणार....... पण
येणार...येणार.......
पण तिच्याशिवाय असेल तर कोरडाच जाणार
“कालची थंडगार आभाळाची
“कालची थंडगार आभाळाची सावली.....
....................
अगदी शिवार ओलांडून पांगत होती..”
... छान
आभार्स.
आभार्स.
आवड्या
आवड्या
व्वा! आवडली
व्वा! आवडली
पण निदान यंदाच्या मौसमात
पण निदान यंदाच्या मौसमात तरी,
परतीचा सोबती म्हणून तू मला निवडावं...
नचिकेत, नी, लाजो धन्स. .
नचिकेत, नी, लाजो धन्स. :स्मित:.
क्लास....
क्लास....:)