महागाई

सुस्त सम्राट

Submitted by Santosh zond on 17 August, 2021 - 00:03

कष्ट कमी त्याला फळ
घाम गाळणाऱ्याला मात्र पळ
कुठला न्याय कुठली सत्ता
रास्ता रोके भोके कुत्ता

जितके पैसे तितके लबाड
पहीले गोड नंतर थोबाड
पांढरी टोपी काळे घोडे
पाय विकून आंधळे दौडे

खोट्याची कमाई भल्याची सोंगे
गल्लो गल्ली नुसतेच भोंगे
कुणाचे दात कुणाचे ओठ
हाताची घडी तोंडावर बोट

आमची लढाई तुमची शक्कल
महागाई पोटी विकली अक्कल
स्वार्थी खोकडे विचारात खोट
मामाच्या खिशात फाटकी नोट

जगाची मौज जगाचा बोजा
उन्हात माझा शेतकरी राजा
सुस्त सम्राट मखमली गादी
पायात बाटा अंगात खादी

महागाई च अर्थकारण आणि नोकरदार वर्ग

Submitted by अननस on 10 March, 2018 - 21:21

दिवसें दिवस महागाई वाढत असल्याचे वाचतो. नेहमी प्रमाणे याचे खापर तत्कालीन सरकारच्या डोक्यावर सामान्य जनता, प्रसार माध्यमे आणि विरोधीपक्ष यांच्या कडून फोडले जाते. महागाई वाढण्यासाठी अनेक कारणे असतील त्याचा उहापोह अर्थतज्ञ करत असतातच परंतू यावर फारसा वाचनात न आलेला मुद्दा डोक्यामध्ये घोळत होता.

सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरतेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2017 - 13:04

सरकार म्हणजे भारत सरकार समजून ईथे चर्चा अपेक्षित आहे. ती देखील लोकशाही मार्गाने.

अशी कशी ही म्हागाई

Submitted by पाषाणभेद on 23 September, 2011 - 20:51

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली
माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ||

नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू
गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू;
पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१||

दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं
पोरं झालीत वाळून बारीक रोड;
पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२||

राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल?
ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना;

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

Submitted by पाषाणभेद on 22 May, 2011 - 18:50

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||

हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||

ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

महागाई

Submitted by चाऊ on 27 December, 2010 - 10:16

सिनेमाची तिकिटे चढत्या भावानीही संपतात
रस्त्यावर सोनारांची दुकानं रोजच वाढतात
हॉटेलात सुटीला जेवा-खायला जागा नाही
तरीही म्हणायचं, काय ही महागाई !

कांदा झाला शंभर तरी खायचा सोडणार नाही
शाळेची फ़ी लाखभर, मग काय झालं भाई?
वर पैसे खर्चून क्लासला घालायची घाई
तरीही म्हणायचं, काय ही महागाई !

मॉल, उघडून तोंड म्हणतो एक नको चार घ्या
शेजार्‍याचं घर कसं, त्याहुन छान घ्या
तीन वर्ष झाली फ़र्नीचरला, तसाच कसा राहू?
तरीही म्हणायचं, काय ही महागाई !

गरज असो वा नसो, गाडी घेतलीच पाहीजे
लागला सेल, गेलं, साडी घेतलीच पाहीजे
सुट नाही, निदान चांगला कुडता तरी घेई
तरीही म्हणायचं, काय ही महागाई !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

Submitted by पाषाणभेद on 30 September, 2010 - 23:20

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||

दोडके गिलके भेंडी मटार
शेवगा भोपळा वाल गवार
सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज
कसली भाजी करू मी आज ||१||

बटाटे आणले सगळेच संपले
फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले
काय! चिकन करू म्हणता ताजं?
कसली भाजी करू मी पतिराज ||२||

८० रुपये किलो आहे तुरदाळ
असलीच महाग झाली मुगदाळ
महागाईने केला कसला हा माज

गुलमोहर: 
Subscribe to RSS - महागाई