Submitted by विदेश on 23 May, 2011 - 01:43
पहिली माझी कविता हो
प्रेयसीने वाचली -
अर्धी लिहिली होती तरी
अय्या कित्ती छान म्हणाली !
दुसरी माझी कविता हो
आईने ती ' पाहिली ' -
कौतुकाने सांभाळूनी
पेटीतच ती ठेवली !
तिसरी माझी कविता हो
बापाने वाच(व)ली -
कागद मागे पुढे बघुन
कोरी बाजू वर ठेवली !
चौथी माझी कविता हो
दुसऱ्याने ती पाहिली -
खो खो हसून तिसऱ्याकडून
तीनशे मित्रात फिरवली !
पाचवी माझी कविता हो
बायकोने वाचली -
काही समजली नाही तिला
रद्दीतच तिने घातली !
सहावी माझी कविता हो
शेजाऱ्याने वाचली -
नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने
तुकडे करून भिरकावली !
सातवी माझी कविता हो
टीकाकाराने चाळली -
त्यालाही ना कळल्यामुळे
'सर्वोत्तम ' कविता ठरली !!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त आहे..कविता
मस्त आहे..कविता

भारीय्यै फक्त प्रेयसी आणि
भारीय्यै
फक्त प्रेयसी आणि आईचा क्रम चुकला असं वाटतंय
मस्तय
मस्तय
आठवी तुमची कविता
आठवी तुमची कविता हो
विभाग्रजाने वाचली,
तुमच्या मनाची घालमेल
त्यांच्यापर्यंत पोहचली.