
फुललेला कांचन
ठाण्याचा गावदेवी भाग स्टेशनच्या जवळ असल्याने कायम गजबजलेला, गाड्या, बसेस रिक्षा, यांचे आवाज, त्यांचे वाजणारे हॉर्न, धुळीचे प्रमाण साधा श्वास घेताना ही जाणवेल इतके जास्त , कायम ट्रॅफिक जॅम, सिग्नल चा पत्ता नाही त्यामुळे जीव मुठीत धरून चालणारी माणसं, तिथेच ठाण मांडून धंदा करणारे फेरीवाले, वाहतुकीच्या नियमांचा कायमच बोजवारा उडवणारे पादचारी आणि वाहनचालक, , रस्त्यावरच टपऱ्या , त्यांचा कचरा , त्यांचं सांडपाणी, रस्त्यावर टाकलेल्या पानाच्या पिचकाऱ्या वगैरे वगैरे..
वरच वर्णन वाचून नवख्याना त्या भागाची थोडी कल्पना येईल . प्रतिकुल परिस्थितीत निसर्ग चक्र चालूच राहत. तो फुलतो, बहरतो. त्यामुळे सभोवती असं वातावरण असताना ही तिथला एक कांचन नखशिखान्त फुलला आहे. असंख्य गुलाबी फुलं आणि हिरवीगार पानं ह्यामुळे देखणा दिसणाऱ्या त्या कांचन वृक्षाला दुर्लक्षून पुढे जाणं अशक्यच आहे.क्वचित कधी कुरूपतेतही सौंदर्य जन्माला येतं ते असं. त्याच्या फुलण्याचं , बहरण्याचं कौतुक केल्याशिवाय पुढे जाताच आलं नाही मला. पाच मिनिटं थांबून मन भरेपर्यंत कौतुकाने त्याला न्याहाळत राहिले. नजरेनेच त्याला कुरवाळलं आणि मग फोटो ही काढला.
ठाण्यात जे राहत आहेत त्यांनी शक्य झालं तर गावदेवी बसस्टॉप च्या समोरचा तो कांचन अवश्य बघून यावं. तसेच आपण अनुभवलेले असे क्षण ही इथे लिहा.

वाह!! सुंदरच. असे मोजके
वाह!! सुंदरच. असे मोजके क्षण जरुर टिपावेत ममो. छान लेख.
मस्त लिहिलेस…. कांचन खुप
मस्त लिहिलेस…. कांचन खुप आवडता आहे.
कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी निसर्ग आपला दिनक्रम चुकवत नाही.
हा माझ्या घराजवळ फुललेला
हा माझ्या घराजवळ फुललेला कांचन ...
काय सुंदर दृश्य आहे.
काय सुंदर दृश्य आहे. नैसर्गिक कव्हर्ड पार्किंग मिळालंय.
सुंदर बहरला आहे कांचन. छान
सुंदर बहरला आहे कांचन. छान लेख.
अहाहा
अहाहा
फारच सुंदर.
सध्या बऱ्याच ठिकाणी फुलला आहे.
पिंचि मध्ये सुद्धा काही ठिकाणी याची रस्त्यालगत ओळीने झाडे आहेत.
"अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा"
संदिपनी मुनी आश्रम, उज्जैन
संदिपनी मुनी आश्रम, उज्जैन
इथे फुललेला कांचन
वाह, सर्वच आहाहा.
वाह, सर्वच आहाहा.
पुण्याचं गटग, वाड्यातल्या
पुण्याचं गटग, वाड्यातल्या गप्पा ह्यात सांगायला उशीर झालाय पण, किल्ली अश्विनी छान आहेत तुमचे फोटो.
आमच्याकडे कोकणात ही आहे कांचन पण पांढरा आहे, तो पण छान दिसतो. देवांवर शोभून दिसतात फुलं.
सर्वांना धन्यवाद...
असाच अजून एक कांचन आहे तो
असाच अजून एक कांचन आहे तो वंदना टॉकीजच्या दारात. त्या रस्त्यावरून सहसा पायी जाणे होत नाही आणि वाहन चालवताना वरती बघणे होत नाही. त्यामुळे त्याला फुललेला क्वचितच बघितले होते. पण मग तो फ्लाय-ओव्हर झाला. आता खोपटकडून तीन पेट्रोल पंपाकडे येताना तो फुललेला कांचन रोजच्या कामाच्या व्यापात सुखाचे चार क्षण देतो. ठाण्यातले अनेक फ्लाय-ओव्हर चुकीचे बांधले आहेत, त्यातला हाही एक आहे. पण जेंव्हा कळले की त्या फ्लाय-ओव्हरमुळे तो बहरलेला कांचन नेहमी बघता येणार आहे तेंव्हापासून तो फ्लाय-ओव्हर आवडायला लागला मला.
माधव, छान प्रतिसाद, जाऊन बघते
माधव, छान प्रतिसाद, जाऊन बघते तो कांचन.
असं काही बघितलं की आजुबाजूच्या प्रतिकूल वातावरणाचा तेवढ्या पुरता विसर पडतो , छान वाटतं.
काल असच स्टेशन आसपासच बाजूला मटणाच ऑर्डिनरी दुकान त्याच्या बाजूला कोंबड्या, अंडी विकायला, त्यांचे ते टिपिकल वास, बाकी रिक्षा पानाच्या पिचकाऱ्या वगैरे होतंच पण तिथेच फुललेला सीता अशोक पाहिला आणि मस्त वाटलं. असो.
वाह!! सुंदरच. असे मोजके क्षण
वाह!! सुंदरच. असे मोजके क्षण जरुर टिपावेत ममो. छान लेख.>>> +१
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
कांचन वृक्ष किती वेळा वाचनात आले होते पण हाच तो माहिती नव्हते. आम्ही याला कचनार म्हणून ओळखतो.
कॉलेजच्या बाईंनी "कचनार काय? पर्पल ऑर्किड नाव आहे त्याचंं" अस सांगितले होते.
इथे अजून कोणी लिहिल नाही पण
इथे अजून कोणी लिहिल नाही पण कुणाला "कच्ची कली कचनार की तोड़ी नहीं जाती..." कसं नाही आठवलं.
जाई, एक लेखक धन्यवाद.
जाई, एक लेखक धन्यवाद.
ऋतुराज, कांचन म्हटंल की नाही पण कचनार म्हटलं की कायम कच्ची कली म्हटलं जातच.
सुंदर! कांचनाच्या फुलांचा
सुंदर! कांचनाच्या फुलांचा गुलाबी रंग अगदी आवडता!
सुंदर बहरला आहे कांचन. छान
सुंदर बहरला आहे कांचन. छान लेख. >>>> +९९९९
वर्षा, शशांक धन्यवाद...
वर्षा, शशांक धन्यवाद...
व्यस्ततेत स्वस्थता, गदारोळात
व्यस्ततेत स्वस्थता, गदारोळात शांतता आणि कुरूपतेत सौंदर्य शोधण्याचा आणि कौतुक करण्याचा हा गुण आवडला.
फुललेला कांचन आवडला.
त्यानिमित्ताने आठवल की त्या रस्त्याला खूप मोठी मोठी झाडे आहेत का? म्हणजे गावदेवी मार्केट, बाग, शुभंकरोती हॉल या पूर्ण परिसरात.
इतके वेळ जाऊनही नीटसं आणिबाणी आठवत नाही,.
माधव त्या रस्त्यावरूनही खूप वेळा येणे जाणे होत असे.. पण कधीही जाणवलं नाही.
मीस्वच्छंदी, धन्यवाद..
मीस्वच्छंदी, धन्यवाद..
बरोबर , गावदेवी मार्केटच्या बागेकडील भागात मोठी रेन ट्री ची झाडे आहेत. दुपारी ही ऊन नाही लागत . त्याची विरुद्ध बाजू उजाड आहे.
माधव, परवा अचानकच बघितला तो कांचन , अर्थातच तुमची आठवण आलीच.
छान लेख .
छान लेख .
घणसोली स्टेशन च्या बाहेर वाशीच्या दिशेने रांगेत बरेच कांचन वृक्ष आहेत आणि आता सगळेच फुलले आहेत. बस मधून फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट आला नाही.
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा