बालकविता

महाराज (महाराणी)

Submitted by पुरंदरे शशांक on 17 July, 2012 - 07:28

भुर्भुरते जावळ नि
छान छोटे नाक
बसत नाहीत अजून जरी
तोच केवढा धाक

रडून सांगतात महाराज (महाराणी)
आई ऊठ ऊठ ऊठ
कसे कळते आईला
लागलीये यांना भूक

जर्रा जवळ जाताच
कसे हात काढतात
भुर्रर घेऊन चला जरा
हुकूम थेट सोडतात

दुपटं जरा ओलं होता
बिघडून जातो नूर
घरदार डोक्यावर
काढतात महा सूर.....

गुलमोहर: 

ओ बाजीराव....(मुलगा व्हर्जन)

Submitted by पुरंदरे शशांक on 17 July, 2012 - 00:43

ओ बाजीराव....

टकामका टकामका
बघता काय राव
चळवळ ती कित्ती कित्ती
ओ बाजीराव

काळेभोर डोळे छान
तरतरीत नाक
जरा उभा र्‍हाउं दे
म्हणाल जॅकी श्रॉफ

बोळक्यातून हस्ता कसे
ओ टकलूभाय
उडतील जेव्हा झुल्पे
तेव्हा फुल स्मार्ट गाय.....

("गोब-या गोब-या गालाची" हे बडबडगीत वाचून अनेक मॉम्स नी मुलगा व्हर्जन मागितले - ते हे - 'बडबडगीत' - जमलंय का जरुर सांगा..... मागणी वाढल्यामुळे जरा फाष्टंम फाष्टंम करावं लागलं .......)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी कुठे ????

Submitted by पुरंदरे शशांक on 13 July, 2012 - 05:31

मी कुठे ????

लग्नामधल्या अल्बममधे
आईबाबा कस्ले नटलेत
आजीआजोबा तर माझे
अग्दी क्यूटी क्यूटी सजलेत

मावशी आत्या काकू मामी
भारी भारी साड्यांमधे
ईशाताई चिनुदादा
दिस्तात केवढे छोटेसे

स्टेज कसले सजवलेय
माळा काय नी फुले काय
काका, मामा सगळे सगळे
बूट, कोट नि वर टाय

कित्ती वेळा पाह्यला हा
अल्बम मी उलटून पाल्टून
एकपण फोटो माझा
यात नाही जरा म्हणून

कित्ती वेळा विचारलं
आईबाबा नि आज्जीला
सगळे हसत म्हण्तात कसे
कित्ती होतास तू झोपलेला ......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गोब-या गोब-या गालाची - बडबडगीत

Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2012 - 01:54

गोब-या गोब-या गालाची
मस्त नकट्या नाकाची
एक भावली आहे कुठे
ही काय इथे इथे....

कुरळे कुरळे केस मऊ
कश्शी दिस्ते मनी माऊ
अस्स पिल्लू गोडुलं
घरात या मिळालं...

हस्ते गोड राणी कशी
खळी किती नाजुकशी
कोकरु एक मऊसं
रांगतंय जरा जरासं...

http://www.maayboli.com/node/36466 (मुलगा/ बॉय व्हर्जन)

गुलमोहर: 

गोड पावसाचे गाणे

Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2012 - 03:23

गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे

पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे

थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे

पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......

गुलमोहर: 

नव्वा ड्रेस नव्वे बूट

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2012 - 03:19

नव्वा ड्रेस, नव्वे बूट
नव्वा टिफीन कसला क्यूट

कसली भारी वॉटरबॅग
मस्त एकदम माझी सॅक

नव्वा आणलाय हेअरबँड
मिक्कीचे हे रायटिंग पॅड

उद्याच शाळा आहे सुरु
सगळे मिळून गंमत करु

दिया, निना नि कौसल्या
भेटतील मग सा-या सा-या

म्हणेल सारा एकटीला मला
कित्ती मिस् केलं तुला !!!

अश्शी कर गं हेअरस्टाईल
टीचर (मिस्) वळून देईल स्माईल

का रे डॅड, हस्तोस असा
चिडवतोस मला सारखा सारखा ??

तुला दुसरा उद्योगच नाय
'पोपट पोपट' म्हण्तोस काय ???

चिडवशील जर सारखे मला
पापी देणार नाह्हीच तुला....

गुलमोहर: 

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2012 - 07:12

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं
बॅग, टिफिन काही नाही
मजेत खेळत बसलेलं

टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालत नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."

"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"

"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."

जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन

सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून

शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरातच दंगामस्ती

माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती

गुलमोहर: 

काव काव...

Submitted by पुरंदरे शशांक on 2 July, 2012 - 02:08

काव काव...

"आई भूक - काव काव...
आई भूक - काव काव..."

"देतेच मी - काव काव..
जरा थांब - काव काव.."

"आई भूक - काव काव..."

"कित्ती कटकट - काव काव...
गप्प बस - काव काव..."

एवढं सगळ बोलणं तुमचं
कसं कळतं तुम्हा राव ??

बरंय तुमचं कावळे राव
एकच बोली काव काव...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चिव चिव चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 2 July, 2012 - 00:04

चिव चिव चिव चिव नाचे चिमणी
चिव चिव चिव चिव गाते चिमणी

चिव चिव चिमणी नाचत नाचत
बाळाची मंम्म हासत हासत

चिव चिव चिमणी अंगणभर
दाणे टिपते भराभर

चिव चिव चिमणी नाजुक छान
बाळ पाही वळवून मान

चिव चिव चिमणी उडाली भुर्र...
गा गा (गाई) करा ढाराढुर्र.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माकडाची फजिती

Submitted by ग्लोरी on 29 June, 2012 - 05:09

एक होते माकड
त्याने खाल्ला पापड
कडम कडम कडम
पापड होता गरम
तोंड त्याचे पोळले
उड्या मारायला लागले
फजिती झाली खूप
हूप हूप हूप...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता