मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
बालसाहित्य
"मी सुसुंगगडी!"
१९ मे म्हणजे माझ्या आज्जीचा वाढदिवस. ती आज असती तर एकोणनव्वद वर्षांची झाली असती. आम्ही लहान असताना आज्जी आम्हांला खूप गोष्टी सांगायची. रोज दुपारी, रात्री झोपताना गोष्टी ऐकून मगच झोपायचो . तिच्याकडून मी आणि भावाने ज्या गोष्टी ऐकल्या, त्या पुढे भावाच्या मुलांनीही ऐकल्या. माझी मुलगी रिया सव्वा महिन्याची असताना आज्जी गेली त्यामुळे रियाला मात्र त्या गोष्टी आज्जीकडून (म्हणजे तिच्या पणजीकडून) ऐकायला मिळत नाहीत. आम्ही आठवतील तश्या सांगत असतो पण ती सर काही येत नाही. ही सुसुंगगड्याची गोष्ट रियासकट आमच्या सर्वांच्या आवडीची.
सुट्टी संपत आलेली
दिवाळीची सुट्टी संपत आलेली,
फराळाचे डबे पण पार तळाशी गेलेले
शाळा आता सुरु होणार २-३ दिवसातच
दादू आणि पिकलपोनी भानावर आलेले
एक म्हणून वही पूर्ण नाही केलेली
१७, १९ चे पाढे पण पाठ नाही झालेले
सुट्टी द्यायचीच कशाला ना,
जर एवढा अभ्यास द्यायचाय? - ( पिकालपोनी)
मुकाट उरका तो अभ्यास
का आईचा ओरडा खायचाय?? - ( बापू)
"पुढच्या सुट्टीत न तुम्ही बघाल,
मी सगळ पहिल्यांदाच केलेलं " - ( पिकालपोनी)
दात विचकून दादा म्हणतो,
"मागच्या सुट्टीत पण असंच ऐकलेलं"
मायबोली गणेशोत्सव २०१४ : गणोबा आमच्या गावात (उपक्रम)
छोट्या दोस्तांनो, आता लवकरच तुमच्या घरी, घराजवळच्या मंडळात आपल्या सगळ्यांचा लाडका दोस्त येणार आहे आणि एकटाच नाही काही, त्याच्यासोबत 'स्टुअर्ट लिटील' सारखा एक पिटुकला उंदीरही असणार आहे. ओळखा पाहू कोण? अहो तोच जो फार फार गुणी आहे, १४ विद्या आणि ६४ कला ज्याला येतात आणि ज्याला तुमच्या इतकीच मज्जा, धम्माल आणि मस्ती करायला आवडते. ओळखलंत ना? आमचा तुमचा लाडका गणपती बाप्पा!!
एक "दे" बोलगाणे
थेंब थेंब मुरू दे
माती मधे जिरू दे
बी त्यात रुजू दे
कोंब त्याला येऊ दे
कोंब असा वाढू दे
पान त्याला फुटू दे
माझ्या उंची येव्हढी
फांदी त्याची वाढू दे
फांदी फांदी नटू दे
फुलांनी हसू दे
थोडी फूलं देवाला
थोडी मला मिळू दे
(लेकीला - बी ते झाड हा सायन्स मधला पाठ शिकवताना गंमत म्हणून रचलेली कविता. ही म्हणून बघता बघता तिच्या पटकन लक्षात राहिली आणि मग तो प्रश्न आमचा फार प्रयास न करता लक्षात राहिला.)
(पूर्वप्रकाशीतः बालनेटाक्षरीचा ई दिवाळी अंक - धम्म धमाका -२०१३)
चाऊ माऊ आणि इतर गोष्टी- वाघ शाकाहारी झाला आणि.....
एक जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी- पक्षी रहायचे. ससे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे, घुबड, चिमण्या, खारुताई असे सगळे प्राणी- पक्षी मिळून मिसळून रहात असतं. त्या जंगलात पिंट्या नावाचा एक वाघ होता. छान पिवळ्या रंगाचा, त्यावर काळेभोर चट्टे-पट्टे असलेला पिंट्या वाघ जंगलाच्या उत्तरेकडे असलेल्या गुहेत अगदी आरामात रहायचा. सकाळी उशीरा उठायचं. जवळच्याच ओढ्यावर तोंड धुवायचं. मग दुपारी, रात्री आणलेल्या शिकारीतुन काही उरलं असेल तर खायचं. आणि मग एक छान वामकुक्षी घ्यायची. आणि रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचं. असा त्याचा दिनक्रम असायचा.
चाऊ माऊ आणि इतर गोष्टी- वाघ शाकाहारी झाला आणि.....
एक जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी- पक्षी रहायचे. ससे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे, घुबड, चिमण्या, खारुताई असे सगळे प्राणी- पक्षी मिळून मिसळून रहात असतं. त्या जंगलात पिंट्या नावाचा एक वाघ होता. छान पिवळ्या रंगाचा, त्यावर काळेभोर चट्टे-पट्टे असलेला पिंट्या वाघ जंगलाच्या उत्तरेकडे असलेल्या गुहेत अगदी आरामात रहायचा. सकाळी उशीरा उठायचं. जवळच्याच ओढ्यावर तोंड धुवायचं. मग दुपारी, रात्री आणलेल्या शिकारीतुन काही उरलं असेल तर खायचं. आणि मग एक छान वामकुक्षी घ्यायची. आणि रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचं. असा त्याचा दिनक्रम असायचा.
स्नबीची शेपूट
स्नबी नावाचा एक छोटासा गिनिपिग होता. केसाळ, अंगावर काळे छोटे ठिपके असलेला स्नबी खुपच गोड आणि गुबगुबीत होता. राजूच्या घरी स्नबी अगदी आरामात रहायचा. सकाळी उठायचा. भराभर न्याहारी करायचा, मग राजूबरोबर चांगलं दोन तास बागेत खेळायचा आणि त्यानंतर छानपैकी ताणून द्यायचा. स्नबीचा तर हा दिनक्रमच असायचा. राजूने तर स्नबीसाठी एक छानसा गुबगुबीत असा पलंगही तयार केला होता. त्यावर स्नबी चांगली दोन तीन तासाची वामकुक्षी घ्यायचा. अशा रितीने स्नबीचं आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं. त्याला कशाची म्हणजे कशाचीही चिंता नव्हती.
कोंबडा आरवतो -
कोंबडा आरवतो
कुकूऽऽच कूऽक
ऊठ बाळा आता
झोप झाली खूऽप |१|
कावळा करतो
काव काव काव
हास बाळा आता
आईला बोलाव |२|
चिमणीची चाले
चिव चिव चिव
सरकत बाळा आता
बाबांना शिव |३|
मोत्या भुंकतो
भो भो भो
बाळ आलं रांगत
बाजूला हो |४|
पोपट बोलतो
मिट्टूऽऽमिया
दुडुदुडु बाळ चाले
बघायला या |५|
मनीमाऊ म्हणते
म्याऊ म्याऊ
बाळाच्या गंमती
बघायला जाऊ |६|
केल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका)
मूळ साहित्याचे शीर्षक: Page d’écriture
लेखक: झॅक प्रीव्हेर ( Jacques Prévert )
भाषा: फ़्रेंच
-----
"बे दुणी चाssर
चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
"पुन्हा एकदा!" बाई म्हणतात
"बे दुणी चाssर
चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
.
.
पण या इथे मुलाला दिसतो
आकाशातून उडत चाललेला
एक गाणारा पक्षी
"एय! मला बाहेर काढ इथून.
खेळ नं माझ्याशी"
.
तेव्हा त्या मुलाशी खेळायला
गाणारा पक्षी खाली उतरतो.
"बे दुणी चार.."
.
"पुन्हा एकदा!" बाई म्हणतात
मूल पक्ष्यात दंग.
पक्षी मुलात दंग.
"चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
"सोळा आणि सोळा?- काय चाल्लंय तिथे?"
Pages
