मराठी जनतेचीची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका
"खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे. ह्या जाहीरनाम्यातील सूचनांबद्दलच्या शासनाच्या कार्यवाहीचे येत्या काळात मूल्यमापन करून मराठी माणसाने शासनाचे प्रगतिपुस्तक भरावे आणि त्यातील कामगिरीवरूनच पुढील निवडणुकीच्या वेळी ह्याच शासनाला पुन्हा प्रवेश द्यायचा की बोटाला धरून बाहेरची वाट दाखवायची ह्याचा निर्णय घ्यावा."
’मराठी+एकजूट’ उपक्रमाद्वारा सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचना पाठवण्याबद्दल केलेल्या जाहीर आवाहनास ’मराठी+एकजूट’ मित्रपरिवाराकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांचे संकलन करून शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीस पाठवलेल्या सूचनांबद्दलचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/03/23/मराठी-जनतेचीची-राज्याच्य/