अनुभव

लाख मोलाची गोष्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

लाख मोलाचे क्षण.
खरच असे लाख मोलाचे क्षण.....
२६ जुलैच्या पावसात असे लाखमोलाचे क्षण नाही तर अनेक तास मे अनुभवलेत. पण सगळ्यात लक्षात राहीली ती केवळ २७ जुलैची संध्याकाळ. मुंबईत पाउस झाला तो २६ ला पण आमच्या कळव्यात मात्र त्याचा फटका बसला २७ ला.

विषय: 
प्रकार: 

अनुभूती रंगांची

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.

हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.

आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.

विषय: 
प्रकार: 

दुबई-शारजाह- गटग

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दुबई-शारजाह गटग

Sharjah GTG1.jpg

प्रकार: 

कविता होताना!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....
कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?"

प्रकार: 

मी गाठलेली २१ किलोमीटरची अर्ध-मॅरेथॉन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिनींनो, मी २१ किलोमीटरची अर्ध-मॅरेथॉन पुर्ण केली. मला माझा अनुभव.... माझ्या भावना इथे शब्दबद्ध करायची ईच्छा होत आहे अगदी स्वच्छंदीपणे...
---------------------------------------------------------------------------------

विषय: 
प्रकार: 

फ्रेंड्स !

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!

त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्‍या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!

प्रकार: 

खबरदार जर......

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

२००५ चा डिसेंबर. ५० मुलं, प्रत्येकाबरोबर एक किंवा दोन्ही पालक, आणि त्यांचे नॄत्यशिक्षक असे सगळे ताफा घेऊन भारतात गेलो होतो. शिवाजीमंदीर, दिनानाथ पार्ले, बोरिवली अश्या ठिकाणी सात कार्यक्रम होते. पहिला वहिला कार्यक्रम अर्थातच शिवाजीमंदीर दादर.

प्रकार: 

दुनियादारी: गेला मित्र कुणीकडे....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नुकतेच दुनियादारी हे श्री सुहास शिरवळकर यांचे पुस्तक वाचले.... सुरुवात टु शेवट... लै भारी! Happy एकदम कालीजच्या दिवसांची याद आली!
कॉलीजला असताना लै दुनियादारी केली .... त्यातली काही तर कॉलीजनंतर अनेक वर्षे निस्तरण्यात गेली! अश्याच एका दुनियादारीत एक जण भेटला, तो पुढे मित्र झाला....पुढील ८ वर्षे तो मित्र म्हणुन वागत होता, पण "तुम्ही एखाद्याला सर्वकाळ मुर्ख बनवु शकता, तुम्ही सर्वांना काही काळ मुर्ख बनवु शकता, पण तुम्ही सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवु शकत नाही" ह्या उक्तीनुसार काही काळाने त्या मैत्रीचा बुरखा फाटायला सुरुवात झाली..

प्रकार: 

डीसी गटग : धृतराष्ट्राच्या पट्टीमागून

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मला डीसी गटग ला जाता आले नाही. पण संजयाच्या दिव्यदृष्टीमुळे मला बसल्या जागेहून हे गटग बघता आले. तर या "महाग गटगचा" हा चक्षुर्वैसत्यम (संजयाचे चक्षू) वृत्तांत. गटगला प्रत्यक्ष न जाताही अहवाल लिहण्याचा उत्साह, अपराध आणि पायंडा मी पहिल्यादाच पाडला असावा. द्विरुक्तिचा मोह टाळून इतर वृत्तांतात आलं नाही, ते सांगायचा प्रयत्न करतो.

इती धृतराष्ट्र.

संजय उवाचः
गटगला सुरवात झालेली आहे. मंडळी जमली आहेत. फुटकळ खाणे, पेय पान सुरु आहे. गप्पा रंगायला लागल्या आहेत.

cartoon_1.jpg

विषय: 
प्रकार: 

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...

या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.
तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अनुभव