अनुभव

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय - मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/19/तेलुगूमधील-सहीविणा-पगारव/

- अमृतयात्री

प्रकार: 

एकलव्य शिक्षण आणि आरोग्य न्यास

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"तुला रेणु ताईंना भेटायचय?" वाडेश्वरच्या कोपर्‍यातल्या टेबलवर माझ्या समोर बसलेल्या यशोदा न(अवचट) मला विचारल. हा प्रश्न विचारला जाइपर्यंत मी रेणुताईंना भेटु शकते/भेटण्याचा प्रयत्न करायला हवा हे माझ्या लक्षातच आल नव्हत.'आमचा काय गुन्हा?' ने इतक झपाटुन टाकल होत कि बाकि काहि सुचलच नाहि. त्यामुळे यशोदाने विचारल्यावर उगाच त्यांना भेटुन त्यांचा वेळ घेण योग्य आहे का हा प्रश्न मनात आला. पण त्यांना भेटु शकले हि माझ्या दृष्टिने माझि ह्या भारतवारितलि सगळ्यात महत्वाचि उपलब्धि. रेणुताईंनि मायबोलिकरांसाठि एक मुलाखत देण्याच कबुल केलय, त्यामुळे त्यांचि ओळख वगैरे करुन देण्याचा माझा प्रयत्न नाहि.

विषय: 
प्रकार: 

वाढदिवस स्मृतीतला ....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या लहानपणी वाढदिवस साजरा करणे म्हणजे, आईने घरी माझ्या आवडीचा पदार्थ करणे [पाकातले चिऱोटे Happy ], मला नविन फ्रॉक शिवणे. आणि त्यानिमीत्ताने, 'आवश्यक' असलेली एखादी वस्तु गिफ्ट म्हणुन आणणे. माझ्या वर्गातल्या ज्या एखाद्या मैत्रिणीच्या लक्षात असेल ती संध्याकाळी घरी येत असे, मग आई काहीतरी मस्त खायला करायची, एवढेच.

प्रकार: 

करायला गेले गूळपोळी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

साहित्य: सारणासाठी- दोन वाट्या किसलेला गूळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, एक वाटी बेसन, १/४ जायफळ
पारीसाठी- दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, एक कणी मीठ, एक डाव तेल

विषय: 
प्रकार: 

गैरसमज कि खरी ओळख..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझी एक चित्तरकथा.....

विषय: 
प्रकार: 

क्लीनबोल्ड

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तशी ही काही पहिलीच वेळ नव्हती. पुर्वीही असं झालय. पण हा अनुभव कालचाच आहे. म्हटल शेअर करावा.
परवा रात्री जेव्हा विरारला पोहोचला तेव्हा एका जुन्या मित्राचा फोन आला.
"कुठे आहेस ? "
"आत्ताच उतरलोय विरारला."
"स्वागतवर ये पटकन." स्वागत म्हणजे एक साध, सरळ, कळकट, मळकट चहाचं दुकान. सध्याच्या दिवसात परवडणारं, हक्काचं असं मिटींगपुरतं ठिकाणं. साखरेचे भाव पहाता काही दिवसात तेही परवडेल की नाही ही नवीच शंका !
पोहोचलो. मित्रवर्यांबरोबर एक बुटकेसे गृहस्थ उभे.
"हाच तो." मी दचकलो. "लेखक आहे." शिवी घातल्यासारखं वाटल क्षणभर. "मायबोलीवर लिहीतो." नशीब त्याला नेमकी जागा माहीत होती. हस्तांदोलन झालं.

विषय: 
प्रकार: 

रडं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मी एक अत्यंत खमकी बाई आहे. सहसा धीर (धूर नव्हे) सोडत नाही. आमचे बाबा नेहमी आमच्याविषयी 'मुली खंबीर आहेत' असे म्हणतात आणि आई आम्हाला 'पाषाणहृदयी' म्हणते. पण तरी काही घटना, प्रसंग, कोणाची नुसती आठवण, फोनवर ऐकलेला आवाज ह्या गोष्टी अशा असतात की कितीही दात-ओठ खाल्ले तरी डोळे जुमानत म्हणून नाहीत. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा Everybody has a weak moment. असे अशक्त क्षण अनेक येतात आयुष्यात. कधी तेव्हढ्या पुरतं वाईट वाटणं असतं तर काही प्रसंग काही म्हणता पाठ सोडत नाहीत. कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाविषयी, जडणघडणी विषयी शंका यावी असं.

प्रकार: 

हाफ डोम

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काही वर्षांपुर्वी असच काहीतरी लिहिल होतं की खूप कंटाळा आला आहे. आणि आयुष्य म्हणजे नुसत रहाट्गाडगग्याला जुंपल्यासारखं वाटतं आहे. त्यात एक मी लिस्ट पणं टाकली होती की पुढच्या काही वर्षात मला हे हे सगळ करायच आहे. सगळ तरी नाही जमल तरी काही गोष्टी केल्या. म्हणजे लिस्ट मधे नसलेल्या देखिल काही गोष्टी केल्या जसं लग्न :P, नोकरी बदलणे, घर घेणे वगैरे.. हाफ डोम त्याच लिस्ट मधे होता.

विषय: 
प्रकार: 

माझी १/२ मॅरेथॉन यात्रा!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कालचा रविवार मी पाठींबा देत असलेल्या संघांना जरी वाईट गेला (कोल्ट्स सुपरबोल हरले Sad आणि भारताच्या क्रिकेट संघाने अर्ध्या कसोटीतच 'हे राम' म्हटलं) तरी वैयक्तिकदृष्ट्या माझे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो.

विषय: 
प्रकार: 

झ्येंडा !!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.

सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.

शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अनुभव