कविता होताना!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....
कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?"

असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले. मी एकटीच का वैतागायचं पण लोकांनाही पकवू असं म्हणून जे झालं ते स्टेटसमधे टाकलं ते असं
"अचानक इथे हे असे काय झाले
रेखीले पान माझे विखरून गेले.....

माझा फेबु डिस्प्ले गंडलाय अचानक...."

लोकांना वाटणार मी कविता पाडतेय. लोक वाचणार आणि शेवटची ओळ वाचून त्यांचा पचका होणार. फालतू जोक म्हणून लोक चरफडणार इत्यादी इत्यादी वाटून मला जामच मजा आली. कसलं काय.. कोणी ढुंकून सुद्धा पाह्यलं नाही माझ्या स्टेटसाकडे. माझ्या विनोदाची फुलं अशी पार चुरगळली गेली... (इथे कमालीचे नाटकी हुंदके!)

पण तसं नव्हतं. मैत्रिणीला तरी वाटलं होतं मला कविता होतेय म्हणून. म्हणून तर हे फर्मान.
मला तर काडीचं काही सुचत नव्हतं. पण बेटी सांगायची ते आठवलं.
"शब्दखेळ करत रहा. त्यातूनच येईल एखादी भली कविता."
म्हणलं चला खेळून बघू शब्दखेळ. लगे हाथो मैत्रिणीच्या फर्मानाला मान पण दिल्यासारखं होईल.. Happy

गप्पा पाऊस आणि ढगाच्याच चालू होत्या. केला शब्दखेळ...

"कसला ढग न कसलं काय...
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय! "

मैत्रिण हसली आणि बहुतेक मला मनातल्या मनात कोपरापासून हात जोडून गप्प बसली.
इथे माझ्या डोक्याला किल्ली बसली होती ना पण. शब्दखेळ पुढे सुरू केला.

जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्‍यात कायच सापडत नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

कोपरा न कोपरा लख्ख केला
डोक्यामध्धे कायच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

असं काहीतरी निघालं डोक्यातून बाहेर. भली अशी नाही पण कविता तर झाली. बांध तर फुटला. तुम्हीही पकलात. सध्या मला इतकंच पुरे आहे.. Happy

कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते... Happy

-नी

प्रकार: 

श्यामले,
आता पकली असशील तर कोपरापासून नमस्कार कर स्वतःलाच, आवडलं असेल तर पाठ थोपटून घे... ये तेराही कियाधरा है!! Proud

bumrang Wink

अनुल्लेख केला तर लेख मरतो. शिव्या घातल्या वा ओव्या गायल्या काही केलं तरी लेख वरतीच दिसत रहातो हे तंत्र लक्षात घ्या.

कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते..<<<<:अओ:

म्हणजे चांगलं लिहिणं बंद करणार की काय?? Uhoh

अक्षर कोलाजः

जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्‍यात कायच सापडत नाय
काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय

लक्ष मुळी लागतच नाय (पण)
ताल कध्धी चुकतच नाय...

भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय

शून्याचा पाढा घोकत जाय
ताल कध्धी चुकतच नाय...

पसार्‍यात कायच सापडत नाय
डोक्यामध्धे कायच नाय
कोपरा न कोपरा लख्ख केला
उनच्चुन घामच्च्घाम
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय...

Lol
तरी मी सान्गत अस्तो, उन्हातानात उघड्या डोक्याने फिरू नये म्हणून!
आता झाला ना परिणाम? Proud

जया मस्त रे!! Happy

मुटे, राग बिग नाही वो... जमायला तर पायजे ना. दरवेळेला ह्या असल्या शब्दखेळापलिकडे काय घडत नाही.

दक्षे, नको इतके उद्योग आहेत त्यामुळे काहीच सुधरत नाहीये...

लिंब्या,
>>आता झाला ना परिणाम? <<
अजून? शक्यच नाही. माझ्या डोक्यावर परिणाम होऊन होऊन ते पार न्यूट्रल झालेय. आता काय परिणाम होणार डोंबल!!

बुमर्यांग
>>>अहो नाही काही.... ते अतिशय दर्जेदार आणि वैविध्यपुर्ण आहे >>>>>>
हे असं का टोमणे मारयच्या भाशेत लिहलय... ? आवडालं तर आवडलं म्हना आणि नाही तर सोडुन द्या, हवं तर टीका करा पन हि भाषा कशासाठी ? तुम्हाला चालेल का असं ?

नी, फेबु वर वावरुन माणसाचं असं होतं???? बरं झालं, मी फेबु वर नाहीये ते... नाहीतर ऑलरेडी परिणाम झालेलं माझं डोकं परत परिणाम होऊन सिधं व्हायचं आणि मग इथे माबोवर वाट्टेल तशी जीभ सैल सोडता यायची नाही. Wink

मंजे.... डो वर पर्णाम हे काय मायनस मायनस नाहीये क्यान्सल व्हायला. ते चक्रवाढव्याजाप्रमाणे वाढतं...
तस्मात फेबु वर यंट्री मारच. Happy

Pages