मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है (स्व-साधर्म्य - भाग १)) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.
परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण
काल सिनेमागृहात जाऊन पाहिला.
एकदातरी पाहायला हवा असा चित्रपट !!
या चित्रपटाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, माझं मत असं आहे :
कथा : सत्यकथा आहे, देशप्रेम जागृत करते , प्रेरित करते
अभिनय: उत्तम
गाणी : सुश्राव्य
जमेची बाजू: देशाने केली अण्वस्त्र चाचणीची यशस्वी कथा !!
खटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो.
- उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग
या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.
खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.
ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्यापैकी येतो.
उदाहरणार्थ,
१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर.
सूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल
स्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.
समोर हिरव्यागार डोंगरांची रांग... त्याच्यापुढे घनदाट झाडांची वर्दळ पसरलेली आहे.... पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत जाताहेत.... एखादा थवा जातो न जातो, तोच दुसरा लगेच मनाला गुदगुल्या करणारा आधीपेक्षाही मधुर किलबिलाट करत जातो.... त्यांच्या किलबिलाटानेच सिद्ध होतं कि बाहेरचं वातावरण किती आल्हाददायक असेल...
असं वाटतं कि लगेच खिडकी उघडावी आणि बाहेरील वातावरणाचा मनसोक्त श्वास घेऊन आस्वाद घ्यावा...
मंडळी, धाग्याचं शीर्षक वाचून तुम्ही कदाचित वेगळ्याच अपेक्षेने हा धागा उघडला असेल. कदाचित 'मायबोलीवर ह्या विषयावर अजून एक धागा आला की काय'
असंही तुम्हाला वाटलं असेल. पण ह्या धाग्याचा विषय वेगळाच आहे! हा धागा वेगळ्याच 'वर्ग'वारीमध्ये मोडतो. आता इथवर आलाच आहात, तर मागे न वळता चला माझ्याबरोबर पुढे. एकदा बघू तरी काय प्रकार आहे हा.
नैसर्गिक संख्या आणि वर्गसंख्या - गुणोत्तर/घनता किती?
.

.