डोळ्याविनाही 'बघू' शकता खग्रास सूर्यग्रहण २०१७

Submitted by अमितव on 11 August, 2017 - 19:51

safety_2.JPG
Image Credit: Rick Fienberg, TravelQuest International and Wilderness Travel

येत्या २१ ऑगस्टला सकाळी संपूर्ण उत्तर अमेरिकेतून सूर्यग्रहण दिसणार आहे. पश्चिम किनाऱ्याच्यावेळेनुसार साधारण सकाळी ९ ते १२ आणि पूर्वकिनारी वेळेनुसार साधारण दुपारी १ ते ४ हे नाट्य खुल्या आसमंतात रंगेल. सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येऊन चंद्रामुळे सूर्य झाकला गेल्याने सूर्य ग्रहण होते हे आपल्याला माहीतच आहे. ग्रहण कसं होतं, कधी होणारे, कुठून खग्रास दिसेल, बाकी प्रदेशातून किती टक्के सूर्य झाकला जाईल, हे ग्रहण सुरक्षितपणे बघण्यासाठी काय काळजी घ्यावी इ. माहिती खालील नासाच्या वेबपेज वर मिळेल.
https://eclipse2017.nasa.gov/eclipse-who-what-where-when-and-how

globe_inset_v3.png
Image Credit: NASA’s Scientific Visualization Studio

safety_map_bw.pngeclipsesHOW.pngTable 1.png

हे ग्रहण नुसत्या डोळ्यांनी बघू नये, ISO 12312-2 प्रकारच्या चष्म्यातून हे ग्रहण बघणे हा एक सुरक्षित उपाय आहे. या आणि इतर सुरक्षे विषयी इथे वाचा. https://eclipse2017.nasa.gov/safety

glasses.png

आपण सर्वांनी आत्ता पर्यंत एकतरी ग्रहण नक्कीच बघितलेलं असेल. त्यामुळे ग्रहणात काय होतं हा अनुभव आपल्यासाठी पूर्णपणे नवा असणार नाही, पण ह्या सृष्टीच्या विलोभनीय सोहोळ्यापासून अंध व्यक्ती सर्वार्थाने दूर असतात. ग्रहणात काय होतं हा प्रश्न जेव्हा खगोलभौतिक शास्त्रज्ञ Henry “Trae” Winter यांना एका अंध व्यक्तीने विचारला तेव्हा त्यांनी, ग्रहण सुरु झाल्यावर संपूर्ण अंधार पसरतो आणि रातकिडे किरकिर करायला लागतात ही गोष्ट सांगितली आणि त्या अंध व्यक्तीचा चेहरा उजळून गेला. हीच प्रतिक्रिया आणखी लोकांच्या चेहेऱ्यावर कशी आणता
येईल असा विचार ते करू लागले. थोडक्यात अंध व्यक्तिना सूर्यग्रहण कसं 'बघता' येईल? यावर काही अ‍ॅप तयार करता येईल का? अंध व्यक्तींसाठी खगोल आणि खगोलभौतिकीची दार जवळजवळ बंदच आहेत. ते काम करत असलेल्या स्मिथसोनिअन संस्थेच्या म्युझियम मध्येही ठेवलेल्या गोष्टींची नावे ब्रेल लिपीत लिहिणे या व्यतिरिक्त काही अ‍ॅक्सेसिबल ( मराठी?) सुविधा उपलब्ध नाहीत.

ज्याला दिसत नाही त्या व्यक्तींसाठी आवाज हे सुर्यग्रहणाचा अनुभव घेण्यासाठी सगळ्यात शक्तिशाली माध्यम असेल. कारण ग्रहणामुळे निशाचर प्राणी जागृत होतील तर दिवाचर प्राणी दिवस संपला समजून डिश वॉशर लावतील... आपलं अचानक शांत होतील. ग्रहण संपून दिशा उजळायला लागल्या की सकाळची पक्षांची किलबिल इत्यादी ऐकू येऊ लागेल. हे सगळं जर अंध व्यक्तीला ऐकवता आलं तर त्याला काही अंशी ग्रहण अनुभवता येईल असं त्याच्या टीमला वाटलं. त्यामुळे ग्रहण काळात विविध ठिकाणी अशी ध्वनीमुद्रणे करण्यात येणार आहेत. अर्थात ती लाईव्ह ह्या app मध्ये अनुभवता येणार नाहीत पण व्यक्तीच्या ठिकाणानुसार त्यावेळी असलेल्या ग्रहण परिस्थिती नुसार समालोचन ऐकता येईल.

सौरस्पर्श : ह्या 'एकलिप्स साउंडस्केप' app मध्ये रंबलमॅप असेल ज्यात स्मार्टफोनच्या स्क्रीन आणि व्हायब्रेशनचा उपयोग करून घेण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीन वर वेगवेगळ्या ग्रहणस्थितीत सूर्य दिसेल आणि त्याला बोटाने स्पर्श केला की बोटाखाली असलेल्या ग्रे स्केल प्रमाणे कमी अधिक प्रमाणात फोन कंप पावेल (व्हायब्रेट होईल). काळ्या भागावर हात नेला की कंपने पूर्ण थांबतील आणि हात जसा जसा जास्त जास्त उजळ भागावर येईल तशी कंपन संख्या वाढून ग्रहण 'दिसू' शकेल.

अधिक माहितीसाठी : http://eclipsesoundscapes.org/

ही अर्थात ह्या प्रकारच्या app ची सुरुवात असेल. ह्या app मधून मिळणारी माहिती ओपन सोर्स मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. हे app अर्थात २०१९ ला चिले येथे होणाऱ्या आणि २०२४ ला मध्य अमेरिकेत होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणात पुन्हा वापरावयाचा मानस आहे.

तुम्ही ग्रहण बघण्यासाठी ग्लासेस घेतले नसतील तर लगेच शोध सुरु करा. नासाने दिलेल्या वेबसाईट वरील बहुतेक ठिकाणी ते संपलेले आहेत. मला अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट वरील 'फ्राईज इलेक्ट्रोनिक्स' नावाच्या स्टोर मध्ये परवा मिळाले. जवळच्या लायब्ररी/ सायन्स सेंटर मध्ये ही हे वाटण्यात येत आहेत का याची चौकशी करू शकता.
नाहीच मिळाले तर पिन होल कॅमेरा करून सुरक्षित ग्रहण बघणे हा आणखी एक मार्ग आहे.

वरील सर्व प्रकाशचित्रे नासाच्या साईट वरून घेतली आहेत. धन्यवाद. नासला प्रॉब्लेम असेल मी काढून टाकेन. बहुतेक नसावा. पण इमेजेस स्टॉक आहेत का नाही याचा सर्च मी अजुन केलेला नाही. वेळ मिळाला की करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय.... अ‍ॅप ची माहिती/ कल्पना आवडली. लोकान्ना अभ्यास करायची अजुन एक सन्धी, ग्लासेस मिळतात का बघावे लागेल.

छान विषय.... अ‍ॅप ची माहिती/ कल्पना आवडली.
मी २४/१०/१९९५ चे खग्रास राजस्थानातून पाहिले होते. सुंदर अनुभव. 'युवाशक्ती' बरोबर गेलो होतो. बरोबरील सर्व लोक हे विज्ञाननिष्ठ होते. अशा समूहाबरोबरची सहल खरोखर दुर्मिळ व आनंददायी असते.
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावेच असा प्रसंग असतो.

मला अंध व्यक्तींबद्दल खूप सहानुभुती वाटते.सध्या बायोनिक आय इंम्प्लांटने काही प्रमाणात दृष्टी परत मिळवता येते.येत्या काही वर्षात जग अंधमुक्त होईल याची खात्री बाळगा.
लेख छान आहे.

मी २४/१०/१९९५ चे खग्रास राजस्थानातून पाहिले होते. सुंदर अनुभव. 'युवाशक्ती' बरोबर गेलो होतो. बरोबरील सर्व लोक हे विज्ञाननिष्ठ होते. अशा समूहाबरोबरची सहल खरोखर दुर्मिळ व आनंददायी असते.
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावेच असा प्रसंग असतो. >>> मी पण. खूप छान अनुभव होता. डॉ. प्रकाश तुपे बरोबर होते.

भारतात आता कधी आहे सूर्य ग्रहण?

मी त्यादिवशी गच्चीवर झोपून उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहिले. पण सतत एकटक पाहिल्याने डोळे चुरचुरायला लागले. की मला तसा भास झाला. मध्येच मग ढगही येत होते पावसाचे Sad

येनीवेज, बाकी सूर्यग्रहणाची मजा काही औरच असेल नाही. चष्म्यातून काळेसावळे दिसते का? त्यात मजा येत नसेल मग तितकी..
आणि त्या दिवशी शाळांना सुट्टी असते का आपल्याकडे?
1995 वाल्यांनी आपले अनुभव शेअर करा ना.. राजस्थानला मुद्दाम का जायचे होते. तिथून परफेक्ट दिसणार होते का?

ऋ, ठीक आहे. लिहितो १९९५ बद्दल.

१. ‘खग्रास’ (म्हणजे ९९% अंधार) चा भौगोलिक पट्टा हा मर्यादित असतो. अन्य लांबच्या ठिकाणाहून ते खंडग्रास दिसते.
२. म्हणून एकटे जाण्याऐवजी माहितगार चमू बरोबर जावे. युवाशक्तीचे अभ्यासू लोक तारखेच्या आधीच इच्छीत ठिकाणाची पाहणी करून येतात.
३. त्यामुळे आमचे राहण्याचे ठिकाण हे त्या मैदानापासून अगदी जवळचे निवडले होते.

४. जे एकटे दुकटे लोक फत्तेपूर सिक्रीला राहिले होते त्यांना त्या सकाळी हॉटेल पासून जाम एकही वाहन मिळत नव्हते. ग्रहण आपली वेळ कधीही चुकवत नाही !!! तो निसर्ग आहे, माणूस नव्हे ! त्यामुळे अशा लोकांचे सहलीचे पैसे अक्षरशः पाण्यात गेले.

५. ते ग्रहण सकाळी ८ वा होते. त्यामुळे अंधाराचे प्रमाण ७०% च्याआसपासच राहिले. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता.

६. पण, त्यावेळेस पक्षी घरट्याकडे परतू लागले . तसेच बारीक थंडीही वाजू लागली. खग्रास काळ ३ मिनिटेच होता. जास्तीत जास्त तो साडेसात मिनिटेच असू शकतो.

७. खास चष्म्यातून सूर्याचा ‘करोना’ पाहिला. डोळ्यांचे पारणे फिटते.

८. त्या मैदानावर फक्त आमचा चमू होता. तेथील खेडवळ लोक जमले होते पण त्यांना याबद्दलचे काहीच ज्ञान नव्हते. फक्त आम्ही ४० जण असल्याने त्यांनी पटकन शेगडी आणून चहाचा धंदा करून घेतला.

९. एकून खग्रास पैकी बरीचशी समुद्रावर होतात. त्यामुळे आपल्याला जमिनीवरून पाहायला फार थोडी उरतात.

१०. १९९९ चे गुजरात मधून दिसले होते. ते पावसाळ्यात होते त्यामुळे दिसण्याच्या आशा नव्हत्या. पण मस्त दिसले असे वाचले होते. रस्त्यावरच्या ट्रकना दु. ३ वा. दिवे लावायला लागले होते.
११. आता भारतातून ५०-६० वर्षे तरी बहुतेक नाही. ज्या ठिकाणी ते होते तिथेच पुन्हा व्हायला अंदाजे ३५० वर्षे लागतात.
१२. अजून काही लाख वर्षानी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी मधली अंतरे बदलतील. त्यानंतर मात्र ‘खग्रास’ बंद होतील. फक्त खंडग्रास राहतील.