खग्रास चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन - तातडीची मदत हवी आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2017 - 14:06

तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्‍या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.
नको त्या चुकीच्या समजूतींमुळे अन्नाची नासाडी होत आहे.. आणि हे आमच्या माळ्यावरील सारेच जण करणार आहेत.. प्लीज हेल्प.. कदाचित मी फेकून दिले जाणारे अन्न वाचवू शकेन, कारण ते कोण्या गरजूलाही देण्याची लोकांची ईच्छा नाही Sad

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आज खग्रास चंद्रग्रहण आहे. आज रक्षाबंधन देखील आहे. रक्षाबंधन ग्रहण काळात करावे का आणि केल्यास त्यात काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती हवी आहे. शक्य झाल्यास लवकरात लवकर जेणेकरून उद्या हाल्फ डे टाकून रक्षाबंधनला सटकायचे किंवा नेहमीसारखे कामालाच प्राधान्य देत संध्याकाळी रक्षाबंधन करायचे हे ठरवता येईल.

धाग्याच्या निमित्ताने एकूणच खग्रास चंद्रग्रहणाला काय काळजी घ्यावी हे समजले तरी चालेल. आमच्याकडे वायफाय बंद करा, त्यातून रेडीएशन बाहेर पडतात ईतपत सल्लेसूचना मिळत आहेत.

माहितीबद्दल थॅन्क्स ईन एडवान्स
आणि
मायबोलीवरच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रहणातली बंधन मी कधीच पाळली नाहीत. यापुढेही पाळणार नाही. माझी आजीसुद्धा पाळायची नाही. मी लहान असताना बरेच लोक ग्रहण बघणे पण निषिध्द समजायचे. तेव्हा पण आजी आम्हा नातवंडांना एकत्र जमवून समुद्रकिनारी घेऊन जायची ग्रहण दाखवायला. Happy

उद्या म्हणे सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंतच राखी बांधायची. Uhoh

मला वाटतंय, त्या कबुतरामुळेच मायबोलीकरांना आता असले वैज्ञानिक कम धार्मिक कम आध्यात्मिक कम श्रद्धावान धागे वाचायला मिळणार आहेत... जय हो!
बाकी ग्रहणात विद्या मिळवता येते म्हणतात!.. मला द्याल का कोणी विद्या? Lol

निधी, मागे कुठतरी वाचल्याप्रमाणे सूर्यग्रहण काळात सूर्याचा प्रकाश न पोहोचल्याने काही सूक्ष्म जीवाणू फोफावतात आणि म्हणून त्या काळात काही खायचे नसते. अर्थात हे चंद्रग्रहणाला लागू होत नसावे.

मी सकाळी सहा वाजता बांधणार आहे राखी कारण ६-40 पासुन भद्रा चालु होतेय अन अकरा ते दोनच्यामध्ये बांधायची तर दोघांना सुट्टी टाकावी लागेल जी टाळायचीये
त्यानंतर ग्रहण सुतक, ग्रहण आहे तेव्हा शक्यतो.शुभ काम टाळायचे.

तसे आम्हीसुद्धा ग्रहण पाळत नाही पर ये त्योहार दिल के करीबवाला है, सो....

हो सुर्यग्रहण काळात हवा दुषित होते, हे शास्त्रीय कारण आहे ऋ.
चंद्रग्रहणाबद्दल माहित नाही.. कारण ते बरेचदा आपण झोपलेले असतानाच होऊन जाते.

राहूल, विद्या नव्हे सिद्धी प्राप्त होते. Wink

हो, सिद्धी! विसरलोच...
पण ह्यासाठीची साधना कठिण असते अन् त्या ठराविक काल मर्यादेत व्हायलाच हवी हे निकष असतात.
बाकी ह्या काळात स्वयंपाक करू नये, जेवण करू नये अशा गोष्टी पाळल्या जातात पण ह्यामागची शास्त्रीय कारणे कधीच समजली नाहीत..अजुनही ग्रामीण जिवनमानात ग्रहणांची, श्रद्धा-अंधश्रद्धेची छाया पसरलेलीच आहे.. तंत्रविधींमुळेच लोकांमध्ये ग्रहणाबद्दल गुढ निर्माण झालं असावं. मग कोणी काहीही सांगितलं तर त्यावर चटकन विश्वास ठेवला जाऊन अनेक प्रथा कुठलीही शहानिशा न करता निर्माण झालेल्या असाव्यात असं वाटतं.

हा फार गहन प्रश्न आहे व याचे उत्तर तुम्ही कुठल्या जातीचे, ब्राह्मण असाल तर कोकणस्थ की देशस्थ याच्यावरहि बरेच अवलंबून असते असे म्हणतात. म्हणून हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
आणि अमेरिकेत चंद्रग्रहण दिसत नसल्यास अमेरिकेत रक्षाबंधनावर काही बंधने आहेत का?

अमेरिकेत चंद्रग्रहण दिसत नसल्यास अमेरिकेत रक्षाबंधनावर काही बंधने आहेत का?

>>> जिथे ग्रहण च नाहीय तिथे काय बंधन..

बाकी काही असो, पण हे शुभ-अशुभ आणि मुहूर्त पाळणार्या माणसांमुळे ( आमच्यासारख्या) न पाळणाऱ्या माणसांचा कधीकधी फायदाही होतो याचा आत्ताच अनुभव आला.
इथे मुलांना दिवाळीऐवजी नवरात्रीची सुटी असते. एक ट्रिप आखताना ( नेहमीप्रमाणे) बुकिंग लवकर करायचे राहिले. पण सर्वपित्री आणि घटस्थापना या दोन्ही दिवशी रेल्वे तिकीटेही भरपूर उपलब्ध आणि फ्लाईट्सही स्वस्त! आरामात बुकिंग केले Lol

सूर्यग्रहण काळात सूर्याचा प्रकाश न पोहोचल्याने काही सूक्ष्म जीवाणू फोफावतात आणि म्हणून त्या काळात काही खायचे नसते.
सूर्यग्रहण फक्त काही मिनिटांचे असते त्यातही खग्रास स्थिती फक्त काही सेकंद टिकते, पण दर रात्री कित्येक तास सूर्याचा प्रकाश उपलब्ध नसतो.

पण दर रात्री कित्येक तास सूर्याचा प्रकाश उपलब्ध नसतो.
नवीन Submitted by व्यत्यय on 7 August, 2017 -
>>>>असले काही बोलायचे नाही हो! ते म्हणतायत ना सुक्ष्मजीव वाढतात ,मग वाढत असतील.

बिनधास्त करायचं ते करा. ग्रहणं म्हणजे सावल्यांचा खेळ. त्यामुळे काही दुषीत होत नाही.

वायफाय बंद केलेलं मात्र चांगलं - त्यामुळे उगाच भलते-सलते फॉरवर्ड करण्याऐवजी भाऊ-बहीण एकमेकांशी बोलतील तरी.

बिनधास्त करायचं ते करा. ग्रहणं म्हणजे सावल्यांचा खेळ. त्यामुळे काही दुषीत होत नाही.>> थँक्स. Happy

तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्‍या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.
नको त्या चुकीच्या समजूतींमुळे अन्नाची नासाडी होत आहे.. आणि हे आमच्या माळ्यावरील सारेच जण करणार आहेत.. प्लीज हेल्प.. कदाचित मी फेकून दिले जाणारे अन्न वाचवू शकेन, कारण ते कोण्या गरजूलाही देण्याची लोकांची ईच्छा नाही Sad

ग्रहण पाळायचं जरी ठरवलं तरी अन्न फेकून देणं अजिबात पटत नाहीये.. ऋ, स्वत:च्या बंडखोर वृत्तीचा उपयोग करून घेऊन आपल्या जवळच्या सगळ्यांना अन्न फेकण्यापासून परावृत्त करावं असं सुचवेन आणि तसंही सुक्या अन्नाला असली तांत्रिक(?) कारणं लागू होत नाहीत असं सांगा..

pf Lol

ऋ, स्वत:च्या बंडखोर वृत्तीचा उपयोग करून घेऊन आपल्या जवळच्या सगळ्यांना अन्न फेकण्यापासून परावृत्त करावं असं सुचवेन
>>>>>
त्यांना माहीती आहे माझी वृत्ती बंडखोरी आहे त्यामुळे ते माझे काहीही ऐकून न घेता माझ्यावर सरळ भावनिक अस्त्र चालवतात.
पण काही असेलच अशी माहिती तर द्या. नुसतेच गूगाळायचे म्हटले तर ते देखील मला ग्रहण कसे पाळायचे आणि का पाळायचे याच्या सतरा लिंका दाखवतील.
एखादी तरी अशी लिंक असेल जिथे हे सगळे मिथ आहे म्हणून सिद्ध केले असेल?
की नाहीच आहे असे काही? की आहे?

@ ऋन्मेऽऽष, घरच्यांना अत्यंत शांतपणे विचार. उद्या सकाळी दुकानातून नवीन खाऊ आणावा लागेल ना? तो काय आणू? जो तो आपापल्या आवडीचे पदार्थ सांगेल. मग त्यांना विचार, की हा खाऊ त्या दुकानात ग्रहणाच्या आधीच बनवला / आणला असेल, चालेल ना???

घरच्यांना अजून irritate करायचं असेल तर रात्री १ नंतर पाणी कोणते पिणार? असे विचार. ते म्हणतील, घरातील सगळे पाणी ओतून टाकणार आणि नवीन भरणार. (२४ तास पाणीपुरवठा असलेल्या इमारतीतील रहिवासीदेखील असा बावळटपणा करतात!) मग त्यांना सांग, घरात नवीन पाणी भराल, पण सोसायटीच्या टाकीत तर ते ग्रहणाच्या आधीच आलेलं आहे! ते पण बदलणार का? आणि बदलायचं ठरवलं तर नवीन पाणी कुठून भरणार? कारण महानगरपालिकेकडून येणारे पाणी हे ग्रहणाआधीच तलावात जमा झालेले आहे!!!

वाह विक्षिप्त मुलगा मस्त !
असाच युक्तीवाद करतो आता Happy

फक्त प्रॉब्लेम असा आहे की हा युक्तीवाद ऐकून ते माना डोलावतील, पण सांगितलेले ऐकणार नाही..
प्रोब्लेम असा आहे की त्यांनी कुठेतरी वाचलेले असते की ग्रहण काळात अमुक तमुक करू नये याला शास्त्रीय आधार आहे आणि हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाले आहे... एखाद्या अंध श्रद्धेला या विज्ञानाने सिद्ध झाली आहे किंवा विज्ञानाचा आधार आहे या ओळीची जोड दिली की त्याला तोड देणे अवघड जाते... तरी बघूया.. आपण छान मुद्दे सुचवले त्याबद्दल धन्यवाद. निदान सुका खाऊ तरी वाचेल.. शिजवलेले तसेही शिळेच झालेले समजून मनाचे समाधान करेन

ऋ.. aschig यांची पोस्ट दाखव त्यांना. ते मोठे संशोधक आहेत हेही पटवून दे.
मी ग्रहणाला अशुभ वगैरे मानत नाही. त्यामुळे राखी बांधायच्या मुहुर्ताचा प्रश्नच नव्हता. भावांनीही कसलं काय म्हणून ग्रहणाकडे दुर्लक्ष केले. Happy
आता रात्री मस्त भेळ खात खात ग्रहण बघण्याच्या प्रोग्रामचे आयोजन चालले आहे. Happy

शेजार बदला. Biggrin
सिरियस नोटः तुम्ही चन्द्रग्रहण बघा. शेजारच्या पिंट्याला ते दाखवा. पिंट्याच्या आई वडिल आजी आजोबांना शिकवण्यापेक्षा पिंट्याच्या मनात प्रश्न निर्माण करा.

साठवलेले पदार्थ म्हणजे साठवलेली दारू पण ? बघा सर्व जमा करा .. आणि बघा कि काही चांगला माल आहे का ? स्कॉच वगैरे असेल तर वर्षाविहार २ तुमच्या घरीच साजरा करू .
तसे पण चांगली स्कॉच १२-१६ वर्षे बॅरल मध्ये साठवतात - मग तिने किती सूर्य आणि चंद्र ग्रहणे पहिले असतील ??

मी आणि पिण्ट्या आता खरेच गच्चीवर बसून चायनीज हाक्का नूडल्स खात खात ग्रहण बघत आहोत. पर भाई ये मुंबई मे पोल्युशन बहोत है.

एवढ्यात नको. टाकीवर मस्त वारा लागतोय. मुंबईचा एक फायदा की ईथे मच्छरही नाहीत. विचार करतोय खाली जाऊन चादर घेऊन यावे आणि ईथेच ताणून द्यावे. दोनचार पिंट्या आणि चंद्रासोबत सेल्फी काढून एफबीवर टाकावे आणि स्टेटस अपडेट करावे... एण्जॉयिण्ग चंद्रग्रहण यॅण्ड हाक्का नूडल्स विथ पिण्ट्या एट पाण्याची टाकी.. अंधश्रद्धा दूर करायचा यापेक्षा बेस्ट मार्ग नाही Happy

Pages