अबॅकस

Submitted by मी अमि on 9 August, 2017 - 04:49

अबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.
या बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अबॅकस मध्ये मण्याची पाटी वापरून आकडेमोड करतात हे तर माहीतच असेल बहुतेकांना. सुरुवातील पाटी वरील मणी वापरून आकडेमोड करणे शिकवले जाते. त्यानंतर मुलांना पाटी न वापरता ती आकडेमोड VISUALIZE करून करायला शिकवतात. मी माझ्या मुलाला ४ वर्षाचा असताना अबॅकस ला घातले होते. त्याने ६ लेव्हल दोन वर्षात पूर्ण केल्या. त्यानंतर चाराकडी संख्यांची गणितं करायची शिकवलं पण त्याची बौद्धिक पातळी तेवढी वाढली नसल्याने आणि शाळेचा अभ्यास सुद्धा वाढल्याने आम्हालाही ते पुढे सुरु ठेवणं जमलं नाही. पण अबॅकस मुले त्याचं गणित इत्तर मुलांच्या मानाने चांगलं आहे.
आमच्या शेजारच्यामुलाने अबॅकस पूर्ण केला पण तो पाचवी नंतर चालू केला होता त्याने.
अबॅकस शीकवणारे सांगतात जेवढा लवकर मुलांना शिकायला सुरु करायला तेवढा जास्त शिकतात पण मला वाटलं मी जरा लवकरच टाकला होता त्याला.

@ मी अमि
प्रामाणिक सल्ल देते.
अबकस एखादे स्कील म्हणुनच बघा. जसे की एखादी कला.
मुल शाळेत जावु लागले की शाळेतील मेथड आणि अबकस पुर्णपणे वेगळी असु शकते. मुलांचा गोंधळ होवु शकतो. तेंव्हा एक कुठले तरी नावडते होते आणि शाळेतील नावडते होवुन चालणार नाही.
मुल खुप चंचल असेल, एकजागी बसवुन अकड्यांची गोडी लावायची असेल तर हरकत नाही.
आमच्या केस मधे- अबकस छान यायला लागले. एकच लेवल केली..पण शाळेतील गणिते सुरु झाल्यवर अबकस नावडते झाले, मग थांबवले.
घाबरवत नाहिये पण स्वानुभव सांगावासा वाटला.

मला तोच प्रश्न पडला होता . अबॅकस किती फायदेशीर आहे ?
सध्या एका ठिकाणी mental maths आणि vedic maths ची चौकशी करून आलो .
त्यात आणखी गोंधळ वाढला .

UCMAS ला घालणार नाही या विचारावर ९०% ठाम आहोत . अजून १०% विचार करतोय .
या सगळ्याचा खरच काही फायदा आहे का? केवळ मार्क्स च्या दॄष्टीने नाही , पण जनरली विचारतेय .

अबकस एखादे स्कील म्हणुनच बघा. जसे की एखादी कला. <<< अनुमोदन. अबॅकसचा गृहपाठ टाईमपास म्हणून दंगा-मस्ती करत करावा, असे मी सुचवतो. त्याचा फार महत्त्वाचा आणि त्यात गणित विषय म्हणून बाऊ न करता, जास्त टेन्शन न घेता/देता ते होऊन जाते. (त्याचे महत्त्व कमी आहे असे म्हणायचे नसून, त्याचा बाऊ करण्याची आणि टेन्शन घेण्याची गरज नाही असे म्हणायचे आहे.)

जेवढे लवकर अ‍ॅबकसला सुरुवात कराल तितकी चांगली.मी खूप उशीरा (१०वर्षाचा असताना) घातला.त्याच्या वर्गात जी लहान मुले होती,त्यांच्या शाळेतील मार्कांमधे चांगला फरक पडला असे त्यांच्या आया म्हणत.मी त्याच्या कडून होमवर्क करून घेताना कमी पडले/कंटाळा केला.नंतर खूप वाईट वाटले त्या गोष्टींचे.तरी ४ लेव्हल झाल्या. अ‍ॅबकसला घालताना कॉन्सनट्रेशन वाढते असे वाचल्याने या एकमेव उद्देशाने घातला होता.पण माझ्या मुलाच्याबाबत सफल झाला नाही.

जेवढे लवकर अ‍ॅबकसला सुरुवात कराल तितकी चांगली.मी खूप उशीरा (१०वर्षाचा असताना) घातला.त्याच्या वर्गात जी लहान मुले होती,त्यांच्या शाळेतील मार्कांमधे चांगला फरक पडला असे त्यांच्या आया म्हणत.मी त्याच्या कडून होमवर्क करून घेताना कमी पडले/कंटाळा केला.नंतर खूप वाईट वाटले त्या गोष्टींचे.तरी ४ लेव्हल झाल्या. अ‍ॅबकसला घालताना कॉन्सनट्रेशन वाढते असे वाचल्याने या एकमेव उद्देशाने घातला होता.पण माझ्या मुलाच्याबाबत सफल झाला नाही.