B. Des - डिझाईन इन्स्टिट्यूटची माहिती हवी आहे.
नमस्कार. माझी भाची यंदा बारावी झाली, रिझल्टची वाट बघतोय आता. तिला डिझाईनमध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. ती पुण्यात रहात नाही पण तिने हायब्रिड मोड वापरून पुण्यातल्या प्रसिद्ध "गुरूमंत्रा" क्लासमधून १ वर्षं डिझाईनचा क्लास केला आहे. NID, युसिड, पारुल विद्यापीठ (अहमदाबाद) वगैरे ठिकाणच्या एंट्रन्स एक्जाम्स पणा देऊन झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाची यंदाच चालू झालेली डिझाईन सीईटी पण दिली आहे. NID शॉर्ट्लिस्ट नाही झाली पण ऑल इंडिया रँक ३०४ आहे त्यामुळे काही ठिकाणी तिला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे. पण काही गोष्टींचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाहिये म्हणून धागा काढलाय.