नमस्कार. माझी भाची यंदा बारावी झाली, रिझल्टची वाट बघतोय आता. तिला डिझाईनमध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. ती पुण्यात रहात नाही पण तिने हायब्रिड मोड वापरून पुण्यातल्या प्रसिद्ध "गुरूमंत्रा" क्लासमधून १ वर्षं डिझाईनचा क्लास केला आहे. NID, युसिड, पारुल विद्यापीठ (अहमदाबाद) वगैरे ठिकाणच्या एंट्रन्स एक्जाम्स पणा देऊन झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाची यंदाच चालू झालेली डिझाईन सीईटी पण दिली आहे. NID शॉर्ट्लिस्ट नाही झाली पण ऑल इंडिया रँक ३०४ आहे त्यामुळे काही ठिकाणी तिला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे. पण काही गोष्टींचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाहिये म्हणून धागा काढलाय.
१. तिची तब्येत नाजुक आहे, दम्याचा त्रास तिला अधूनमधोन होतो. त्यामुळे जास्त ताण आला की तिला झेपत नाही.
२. आर्थिक तजवीज केलेली असली तरी MIT किंवा तत्सम संस्थांची फी ४.५ लाख + हॉस्टेल-मेस + प्रोजेक्टसाठी लागणारं सगळं मटेरिअल (जे या कोर्ससाठी चांगल्या दर्जाचं = जास्त किमतीचं) घ्यावं लागतं. त्यामुळे वार्षिक खर्च ७ लाखाच्या वर जातोय. अशी ४ वर्षं.
३. स्कॉलरशिप ही पहिल्या वर्षी मिळताना एंट्रन्स एक्जामच्या मार्कांवर मिळते, पुढे ती फक्त तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही तितकं चांगलं पर्फॉर्म करून
फर्स्ट क्लास टिकवता. आजकाल या गोष्टीचा खूप ताण मुलांना येतो आणि हिची तब्येत बघता हे चॅलेंज आहे.
४. एकदा अॅडमिशन घेतली की स्कॉलरशिप असो किंवा नसो, फी तर ४ वर्षं भरावीच लागेल (यात चुकूनसुद्धा नापास/ year down ही शक्यता अजून गृहीत धरलेली नाही, पण जी दुर्दैवाने अचानक येऊ शकते). अशा वेळी ७-८ लाख खर्च कमी वाटत नाही.
५. हा सगळा विचार करून, जरी चांगला रँक असला तरी बहुतेक पुण्याबाहेर जाता येईल असं वाटत नाही म्हणून पुण्यात D Y Patil Akurdi आणि MIT आळंदी हे पर्याय विचारात घेत आहोत. MIT लोणी खूप छान आहे पण तिथे NID score गृहीत धरत नाहीत त्यामुळे स्कॉलरशिप नाही. आणि फी खूप आहे जी परवडणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.
मुख्य प्रश्नः D Y Patil आणि MIT आळंदी (MIT WPU कोथरूडसुद्धा विचारात आहे) यांची माहिती इथे मिळाली तर हवी आहे. त्यांच्या प्लेसमेंट्स, चांगल्या कंपन्या येतात का, पॅकेज साधारण किती (यातली काही माहिती वेबसाईटवर आहे), कॉलजात खरंच चांगलं वातावरण आहे का... (खरी चांगली माहिती वेब.वर मिळतेच असं नाही). हे सगळं कळावं अशी अपेक्षा आहे.
तिला textile किंवा फॅशन
तिला textile किंवा फॅशन डिझाइन मध्ये इंटरेस्ट असेल तर पुण्यात SOFT चा पर्याय आहे.
एम आय टी आळंदीचे माहित नाही
एम आय टी आळंदीचे माहित नाही पण भाची लोणीला होती. तिथे मस्त प्लेसमेंट्स होत्या त्या वेळेस (८-९ वर्षांपूर्वी). आळंदी पण चांगले आहे असे ऐकून आहे.
मी इथली सगळी माहिती तिला
मी इथली सगळी माहिती तिला पोचवते आहे.
तिला visual communication मधे जास्त रस आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/82847
पूर्वीच्या चर्चेचा धागा. उपयुक्त आहे.
अगदी स्पेसिफिक माहिती नाहीये.
अगदी स्पेसिफिक माहिती नाहीये.
एका ओळखीच्याच्या मुलीने iit जबलपूर येथे डिजाईन साठी ऍडमिशन घेतले आहे.
तिथे खाजगी संस्थे पेक्षा फी कमी असेल.
काही IIT मध्ये डिजाईन dept सुरू झाले आहेत.
Iit pavai मध्येही चेक करा. मुंबई फार लांब नाही.
तुमच्या केस मध्ये बाहेर जाणे हा option बंद आहे म्हणा.
MIT ची स्वतःची एक इन्ट्रन्स टेस्ट असते engg आणि इतर सर्व.
डिजाईन साठी देखील असेल कदाचित.
त्यात चांगला रँक आला तर काही स्कॉलरशिप नक्कीच असते.
त्यांच्या वेबसाईट वर माहिती आहे सर्व.
शुभेच्छा तिला.
लांब रहायचे पर्याय इतके पटकन
लांब रहायचे पर्याय इतके पटकन (निरुपाय झाल्यामुळे) सोडून द्यावे लागतील असं खरंतर आम्हालाच वाटलं नव्हतं. तिने iit uceed पण दिली पण मार्क्स कमी मिळाले. इन फॅक्ट, आता पुण्यात जमतील तेवढे पर्याय बघतोय. (बर्याच entrance दिल्या तिने आणि जसजसं पुढे जातोय तसतसं वैयक्तिक चित्र स्पष्ट होतंय. )
माझ्यापण भाचीने लोणी मधुन
माझ्यापण भाचीने लोणी मधुन केलं. काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर तिला विचारू शकतो.
गुरुमंत्र चा संचालक माझा खास
गुरुमंत्र चा संचालक माझा खास मित्र आहे.
त्याच्याशी बोलू शकतो.
मला गरज असेल तर ७०२०३२३६७१ वर व्हॉटस् ॲप करा
तो माझा दोस्त आणि सख्खा भाऊ
तो माझा दोस्त आणि सख्खा भाऊ आयआयटी पवई मधून एम देझ झाले आहेत. पण प्रॉडक्ट डिझायनिंग घेवून
नुकतंच SOFT पण बघितलं आहे.
नुकतंच SOFT पण बघितलं आहे. तेही चांगलं वाटतंय.
१) चांगली संस्था आणि विषय दुसर्या प्रायॉरिटीचा (फॅशन/ ग्राफिक्स हे २ नंबरवर. पहिला नंबर विजुअल कम्युनिकेशन होता)
२) विषय पहिल्या प्रायॉरिटीचा पण संस्था ठीकठाक (म्हणजे अगदी NID-IIT च्या तोलामोलाची नाही)
३) फॅशन साठी जर SOFT मिळालं तर चांगली संस्था आणि सध्या तरी खूप चांगलं वाटलेलं कॉलेज. मग विषय थोडा कॉम्प्रमाईज झाला तरी चालेल..
यातलं काहीही एक निवडणं हे चॅलेंज आहे.
विश्वकर्मा युनिवर्सिटीपण ट्राय करणार आहे. त्यांची एंट्रन्स मे महिन्यात आहे.
(मला यातले डीटेल्स फारसे माहितीच नव्हते. भाची स्वतःच सगळं शोधून शंका आल्या की विचारते)