उत्तर..! (अतिलघुकथा)

Submitted by पाचपाटील on 13 February, 2022 - 15:09

{ॲन इमॅजिनरी व्हॉट्सअप चॅट लीक्ड Wink }

अंधारात त्याच्या व्हॉट्सअप स्क्रीनवर नवीन मेसेजचं एक ग्रीन वर्तुळ चमकलं..!

"'तूच आहेस का रे तिथे खाली?"'

तिचा मेसेज पाहून थोडा वेळ तो तसाच शांत बसून राहिला.. मग रिप्लाय दिला, होय.!

"'अरे देवा..! कधीपासून बसलायस तिथे? मी आत्ता पाहिलं वर येताना..! तू जा बरं तिथून आधी..'''

आजची तिसरी रात्र..! तू उत्तर दिलं नाहीयेस अजून..

"'अरे पण आत्ता वाजले किती..! आणि हे असं रस्त्यावर नको बसत जाऊस अरे रात्र रात्रभर..! मला त्रास होतो उगाच..!"'

मी काय कुणाला त्रास देणार..! माझा मी शांतपणे बसून आहे फक्त.

"'ओके ओके.. आपण सकाळी बोलू कॉलेजमध्ये..आत्ता तू जा तिथून.. पप्पा आहेत घरी."'

नाही.. उत्तर मिळाल्याशिवाय इथून हलणार नाहीये मी..!'

"'मॅड आहेस का रे तू जरा ? मी नंतर सांगते बोलले होते ना? लगेच इथे येऊन बसायला कुणी सांगितलं होतं तुला?"'

लगेच नाही काही.! दीडशे तास वाट बघितली..! तर तू
दुर्मिळ..! फोनपण उचलत नाही..! लय हाल झाले..! मग काय करणार मी.!

"'होय काs? मग आता अजून किती तास बसणारेस?"'

ते तू ठरवायचंस..! मी कसं सांगणार!

"'बरं.. ऐक.. माझा निर्णय झाला की मग मी लगेच सांगते तुला..! आता तू घरी जा बरं प्लीज..!"'

बरं.. आत्ता जातो मी.. पण तरी साधारण कधीपर्यंत होईल निर्णय?

"'उद्या भेटू.. सांगते मी तुला.. उद्या फोन करते तुला'"

पण आत्ता थोडासा अंदाज दिला असतास तर बरं झालं असतं.. म्हणजे मग आज तरी जरा झोप लागली असती..!

"'तू आता घरी जा पहिल्यांदा.. आणि झोप.. लागते आपोआप झोप.!"'

म्हणजे? होय की नाय?

"'ते सुद्धा मीच सांगायचं का आता?"'

सांग ना..! सांग ना..! मला नाय समजलं.!

"'मर मग तिथेच...! बस तसाच..!"'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न वोह इन्कार करती है
न वोह इक़रार करती है
हमें फिर भी यकीन है वोह
हमी से प्यार करती है

सीमंतिनी, भरत, आबा, च्रप्स..
अभिप्रायाबद्दल धन्यवाद Happy

नानबा,
<<
In either case - झोप लागण अवघडच, नाही का?
>>
होय.! खरंय..! फारच अवघड!
हम तड़पते रहेंगे यहां रात भर
तुम तो आराम की नींद सो जाओगे Uhoh

वावे,
<<
पण मलाही कळलं नाही, 'हो' असेल तर सरळ सांगायला काय झालं तिला?
>>
थोडं फार झुलवत ठेवायची पद्धतच असते म्हणे..!! Proud
बाकी काही काही केसमध्ये जरा जास्तच होतं..!
उदाहरणार्थ..
दिल मेरा ले कर ये जालिम ने कहा
जाओ रस्ता लो तुम्हारा कुछ नहीं