वेंको प्रॅक्टिस ॲप

Submitted by चंपक on 1 December, 2023 - 10:21

असाध्य ते साध्य, करिता सायास!
कारण अभ्यास, तुका म्हणे !!

नीट, जेईई, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, सर्व राज्यांचे लोकसेवा आयोग, रेल्वे, बँकिंग, शॉर्ट सर्विस कमिशन, विमा, संरक्षण दलातील विविध स्पर्धा परीक्षा, इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य अन सीबीएसई / आयसीएसई बोर्ड परिक्षा..... स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासासोबतच परिक्षा देण्याचा सराव हा तितकाच महत्त्वाचा असतो!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं, कि येणाऱ्या खर्चाची जुळवाजुळ करावी लागते. आपल्याच गावांमध्ये राहून आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो का? याचा विचार करत असताना, आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन कसे होईल हा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो. कारण गावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण नसते, आपल्या भोवती स्पर्धेची तयारी करणारी विद्यार्थी नसतात, आणि त्यामुळे आपण स्पर्धेत नक्की कुठपर्यंत पोहोचलो आहोत? हे कळायला मार्ग नसतो.

या प्रश्नावर उत्तर म्हणून व्यंकटेश एज्युटेक, पुणे च्या माध्यमातून वीस लाखा पेक्षा जास्त बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असलेले *www.tests.venko.in* हे पोर्टल आणि Venko Practice App अ‍ॅन्ड्रॉईड / आय.ओ.एस. अ‍ॅप् उपलब्ध केले आहे. App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.app.testseries.venkopr... शहरी किंवा ग्रामीण भागात कुठेही असला, तरी तुमच्या अभ्यासाचे मूल्यमापन करणारी व्यवस्था आता उपलब्ध आहे.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि भारतातील तज्ञ लोकांनी तयार केलेले प्रश्न, त्या प्रश्नांना दिल्या जाणाऱ्या उत्तराचे एनालिसिस, जर आपल्याला वार्षिक दोनशे ते पाचशे रुपयांमध्ये मिळू शकत असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते एक वरदान ठरेल!

*वेंको प्रॅक्टिस ॲप* आणि *टेस्ट्स.वेंको.इन* हे पोर्टल भरतातील 1554 हून अधिक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि एक लाखाहून अधिक प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध करत आहे. आपल्या परीक्षेला किती कालावधी आहे? त्यानुसार आपल्याला अभ्यासाला वेळ किती मिळणार आहे? तेवढ्याच वेळा करता आपण या पोर्टल किंवा ॲपवर सबस्क्रीप्शन घेऊ शकता. उदाहरणार्थ आपल्या परीक्षेला 30 दिवसांचा वेळ असेल तर आपण फक्त 30 दिवसांसाठीचेच पैसे या पोर्टलला द्यायचे आहेत. संपूर्ण वर्षाचे पैसे देण्याची गरज नाही. त्यामुळे किमान दोनशे रुपये ते कमाल 600 रुपये एवढ्या कमी खर्चामध्ये आपण आपल्या अभ्यासाचे मूल्यमापन करू शकता,

नीट, जेईई, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, सर्व राज्यांचे लोकसेवा आयोग, रेल्वे, बँकिंग, शॉर्ट सर्विस कमिशन, विमा, संरक्षण दलातील विविध स्पर्धा परीक्षा, इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य अन सीबीएसई / आयसीएसई बोर्ड परिक्षा, इत्यादी अशा एकूण 25 प्रकारातील १५५४ प्रकारच्या परीक्षा या ॲपमध्ये उपलब्ध आहेत.

गुगल अ‍ॅप स्टोअर वरुन आपण ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल टाकल्यास आपणाला ईमेल द्वारे एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी मिळाल्यानंतर लॉग इन करवे. त्यानंतर आपल्याला हवी ती परीक्षा निवडून त्या परीक्षेसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी उपलब्ध होतील.

वेंको. . . स्मार्ट बना दे!

पोर्टल : www.tests.venko.in
Venko Practice अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप् : https://play.google.com/store/apps/details?id=com.app.testseries.venkopr...

सर्वांना परीक्षेच्या तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप चांगला उपक्रम. मी गावात राहते, ह्या लेखाची लिंक व माहिती माझ्या व्हाट्साप स्टेटसवर शेअर केली आहे.

आठवीपासून म्हणजे इतक्या उशीरा?>>>>>>>>

स्पर्धा परिक्षा म्हणजे फक्त एम पी एस सी / यु पी एस सी किंवा तत्सम नोकरी या अर्थाने न घेता, शालेय स्तरावरील स्कॉलरशिप, ऑलिंपियाड, आदि स्पर्धा लक्षात घ्याव्यात.
+++

नोकरी संबंधीत स्पर्धा परिक्षा हा विषय आता समाजिक प्रश्नच झालेला आहे.