वंदे गणपतीम् : उपासक (प्रीती ताम्हनकर)

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:41
2010_MB_Ganesha3_small.jpg
जय हेरंब!
मंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

गेल्या वर्षी, श्री गणरायाच्या कृपेने, कु. प्रीति ला प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांनी शिष्या म्हणून स्वीकारले!

वीणाताईंनी शिकवलेली ही संस्कृत गणेश वंदना मायबोली गणेशोत्सवात आपणा सर्व रसिक भक्तांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

यामधे प्रीतिला तबला साथ केली आहे 'विकास येंदलुरी' या बे एरियातील गुणी युवा तबला वादकाने. श्री. अतुल वैद्य यांनी रेकॉर्डिंग केलंय आणि श्री. अजय जोगळेकर यांनी, परत एकदा वेळात वेळ काढून mixing करून पाठवले आहे. या सर्वांना धन्यवाद!

श्री चरणी ही सेवा आपणा सर्वांनाही भावेल अशी आशा!

-उपासक
http://www.jayheramb.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! प्रीतिची गाणी ही वार्षिक पर्वणीच आमच्यासाठी. Happy एकदम मस्त.
एकच छोटीशी सूचना- 'फल' चा उच्चार मराठी 'फ' (ओष्ठव्य)असा यायला हवा का? इंग्रजी F सारखा नाही. प्रीति इतकी सुंदर सादर करते की अशा साध्या गोष्टींने तीट लागायला नको.

अप्रतिम! फारच सुंदर! प्रीतिला खूप खूप शुभेच्छा...भरपूर गाणं शिक आणि आम्हाला असाच तुझ्या गाण्याने आनंद देत राहा.

कसला गोड आवाज आहे गं तुझा प्रिती !!!!!
मागच्या वर्षी तुझा आवाज ऐकून तुझी अजून गाणी ऐकायला मिळावी असं वाटलं होतं ..... ती इच्छा तू पूर्ण करते आहेस......खूप खूप धन्यवाद Happy
तुझ्या या सुरेल वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!
गाणं अप्रतिम झालंय !!!!!!!

क्या बात है ! प्रीतिला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद Happy
सुरेल तर ती आहेच पण आता लगावही जाणवतोय सुरांना. तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो !

सुरेख, सुरेख. नेहमीप्रमाणे सुंदर गायले आहे प्रीतीने. आवडले. Happy
अजून तिची काही गाणी असतील तर नक्की ऐकवा.

धन्यवाद मंडळी! प्रीति ला शुभेच्छा कळवतो आहे.
रैना, बरोबर आहे तुमचं. मान्य.
परत एकदा धन्यवाद!

वा, प्रीती.. छान जमलंय!

ही composition बहुतेक वीणाताईंचीच आहे. अजून एक गंमत म्हणजे मी या भजनाबरोबर वीणाताई आणि प्रीती या दोघींना वेगवेगळ्यावेळी live कार्यक्रमांत टाळ साथ केलेली आहे. Happy (या recording मध्ये नव्हे, हा टाळ mixing मध्ये add केलेला electronic टाळ वाटतोय.) वीणाताईंनी हे भजन "तिलक कामोद" च्या "तानोम् तनन तादीम् तनन" या तराण्यानंतर लगेचच सुरू केले होते आणि लय थोडी अजून जास्ती ठेवली होती. तानांचे नुसते सट्टे चालू होते. ६ वर्षे झाली या गोष्टीला, पण अजून सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.. केवळ अप्रतिम!

प्रीतीला पुढच्या सांगितीक प्रवासासाठी अजून एकदा शुभेच्छा!

फारच छान.. शास्त्रीय संगीताचा लगाव जाणवतोय.. गळ्याला फिरतही छान आहे.
प्रीतीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

अभिनंदन प्रीती! खूपच छान!
तुझा आवाज गोड आहे आणि तू गातेही खूप सुरेल !!
आमच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
गण्पती बाप्पा मोरया !!!!

मंडळी,
परत एकदा सर्वांना धन्यवाद!
@अभिजित, होय, टाळ नंतर add केलेला आहे, हे तुझ्या तीक्ष्ण कानांनी बरोबर हेरले आहे.
आणि live टाळांची मजा वेगळीच! आधी नमूद केल्यानुसार, आम्हाला फार थोड्या वेळात हे रेकॉर्डिंग करावं लागलं, त्यामुळे तशा काही गोष्टी राहून गेल्या..
मंडळी आधीचं अभिजित बरोबरचं live रेकॉर्डिंग इथे उपलब्ध आहे..
http://www.youtube.com/watch?v=2WAb1oXy0QU

जय हेरंब!