आपण सगळे सतत काहीतरी काम करत असतो.
पण कोणीही असो. कितीही झालं तरी, त्याला / तिला...........
नेमेचि येतो... "कंटाळा!" §
कंटाळा आल्यास इथे लिहा. कसला कंटाळा आलाय?
इतर लोकांच्या कंटाळ्याबद्दल वाचा...
रिफ्रेश व्हा आणि परत लागा कामाला!!!
पण आम्हाला खात्री आहे, तुम्ही जरुर परत याल.
कारण.... नेमेचि येतो.. ?
सर्व कंटाळलेल्या जीवांचे इथे स्वागत... §
माझ्या ओळखीतील एका कुटुंबाचा सिंगापूरला स्थायिक होण्याचा विचार आहे. Finance क्षेत्रातील नोकरी / व्यवसाय करण्याच्या दॄष्टीने त्यांना सिंगापूर योग्य वाटते. खालील विषयांवर जर कोणाला प्रकाश टाकता आला तर उपयोगी ठरेल.
मुलांचे शिक्षण, राहणीमान, कार्यसंस्कॄती, socialising, infrastructure, सिंगापूरचे भारताशी असलेले संबंध इ. इ.
जर कोणी सिंगापूर स्थित माबोकर असतील, तर त्यांचे मार्गदर्शन फारच मोलाचे ठरेल.
बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला. 
देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!

सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या.. 

सिंडीने आणलेल्या जिलब्या..
आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर ही एक अशि सेवाभावी संस्था आहे जी स्त्रिया आणि मुले यांच्या वर होणाय्रा घरगुति हिंसाचाराच्या विरोधात काम करते. तसेच या वर्गाच्या समुपदेशनाचे काम करते. स्त्रिया आणि मुले यांच्या साठि सुरक्षीत आणि मुल्याधारित समाजाची निर्मीती हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्या साठी आम्ही दु. १२ ते सा. ६ अशी एक फोन लाईन चालु (Warm Line) सुरु केलेली आहे.
कोणतेही चांगले काम सुरु करण्यासाठी समाजाच्या मदतीची अतिशय गरज असते.
आम्हाला पहिले प्रोत्साहन दिले, "क्लब नोस्टाल्जिया" यांनी. क्लब नोस्टाल्जिया हे सामाजिक कार्याला स्फुर्ती म्हणुन निधी संकलनासाठी संगीत रजनीचे आयोजन करीत असतात.
कधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब्द दिसायला लागतात.
त्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की "ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल." मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.
मग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन!
आम्ही इथे न्युयोर्क ला रहातो, अगोदर न्युजर्सी ला अपार्टमेन्ट मध्ये झुरळे होती, तिथे खालच्या अपार्टमेन्टला रहाणार्या देसी लोकान्कडून वर यायला सुरुवात झाली, मग घर काही दिवस बन्द होते, त्यामुळे ती खूप वाढली. तिथून न्युयोर्क ला अपार्टमेन्टला आलो तिथे तर खूपच झालि , प्रोफेशनल terminex ची मदत घेवून ही कमी झाली नाही. सगळेजण सान्गत होते की अपार्टमेन्ट मध्ये झुरळे होतात , म्हणजे शेजारच्या अपार्टमेन्टमधून येतात.
ही माझी कथा नाही, पण तुम्हांसगळ्यांबरोबर शेअर कराविशी वाटली वाचल्यानंतर, म्हणून टाकतीये.
एक मुंगी होती. ती रोज सकाळी लवकर उठून काम सुरु करायची. खूप काम करणं आणि आनंदी राहणं हा तिचा स्वभाव होता. त्या मुंगीचा बॉस होता एक सिंह. एकदा सिंहाच्या मनात आलं, की मुंगीच्या कामावर कुणाचं लक्ष नसतानाही ती इतकं काम करते, तर सुपर्वायझर नेमला तर ती किती काम करेल!